Study Material1
साईट:Programme on School Leadership and Managementकोर्स:Course 1- Perspective on School LeadershipBook:Study MaterialPrinted by:Deepak DambaleDate:सोमवार, 14 मार्च 2022, 8:32 म.नं.
Table of contents
Unit 1: Understanding School Leadership
1.1: Leadership Defined
1.2: Move beyond Administration to Leadership
1.3: Bring Changes in the System: Aim for Effective School Leadership
Unit 2: School as Learning Organization
2.1: What is a Learning Organization?
2.2: Personal Mastery
2.3: Mental Models
2.4: Shared Vision
2.5: Team Learning
2.6: Systems Thinking
Unit 3: Building School Vision
3.1: What do you mean by Vision?
3.2: How do you differentiate Vision from Mission?
3.3: How are Goals and Objectives different from Vision?
3.4: Who should be involved in the process of Vision building?
3.5: Exercise on Vision building
घटक 1 – शालेय नेतृत्व समजून घेणे
शालेय नेतृत्वाची संकल्पनात्मक समज, शाळा प्रमुखाच्या विविध भूमिका आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या वाढ आणि विकासावर पडणारा प्रभाव याची मांडणी हा घटक करतो. निरंतर प्रयोग आणि बदलासाठी व्यासपीठ म्हणून हा घटक शाळांवर लक्ष केंद्रित करतो. चला आपण नेतृत्वाबद्दलची स्वतःची समज अभ्यासू या ! आपण आपल्या स्वतःच्या नेतृत्व पैलूंना कसे पाहता किंवा कसे श्रेणीबद्ध करता ?
तुम्ही पदाने नेता आहात की कृतीमुळे नेता आहात?
दोन प्रकारच्या नेत्यांमध्ये फरक आहे :- पदामुळे मिळालेले नेतृत्व किंवा नेमणूकीने मिळालेले नेतृत्व आणि उदयोन्मुख नेतृत्व किंवा कृतीमुळे निवडलेले नेतृत्व. उदयोन्मुख नेतृत्व किंवा कृतीमुळे निवडलेले नेतृत्व हे समुहातून त्यांच्या कृतीमुळे उदयास येते, ते मोठ्या प्रमाणात लोकांना प्रभावित करतात. त्यांना ध्येयाच्या पूर्ततेकडे घेऊन जातात आणि त्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दृष्टीकोन ज्याद्वारे जे कायम इतरांच्या मनामध्ये स्थान मिळवितात. डॉ. राधाकृष्णन, श्री. अरबिंदो, स्वामी विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या काही राजकीय आणि अध्यात्मिक नेत्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान आपल्याला माहित असेलच. महात्मा गांधी, मदर टेरेसा, अब्राहम लिंकन, नेल्सन मंडेला आणि इतर अनेक प्रमुख नेते त्यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाने ओळखले जातात, की जे आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासंबंधीची बांधीलकी दाखविली.
शाळाप्रमुख/मुख्याध्यापक म्हणून जरी तुम्हाला नियुक्ती मिळाली असेल किंवा सेवा ज्येष्ठतेमुळे किंवा एखादया परिक्षेद्वारे निश्चित कालावधीसाठी नियुक्ती झाली असेल, परंतु आपण इतरांना आपल्या आदेशाचे पालन आणि आपल्या शाळेत बदल घडविण्याची अपेक्षा करण्यापूर्वी एक छोटीशी चिंतनशील कृती करा.
चिंतनशील प्रश्न :
एक नेतृत्वकर्ता म्हणून आपण आपल्या संस्थेमध्ये आणि सहकार्यांमध्ये आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्यात सक्षम झाला आहात काय?
आपल्या सहकाऱ्यांना समजावणे आणि त्याच्यात समन्वय निर्माण करण्याचे आवश्यक कौशल्य आपल्याकडे आहे काय?
निर्णय घेण्यास आवश्यक असे केंद्र आणि राज्य शासनाचे प्रशासकीय, आर्थिक आणि व्यवस्थापनासंबंधीच्या निकषांचे पुरेसे ज्ञान आपणास आहे काय?
सुयोग्य भागीदारीसाठी आपल्याकडे आवश्यक संवाद कौशल्य आणि तयारी आहे काय?
केवळ नियुक्तीप्राप्त नेता याऐवजी उदयोन्मुख नेतृत्वासाठी ज्ञान, कौशल्य आणि दृष्टीकोन या संबंधी शिकण्याची आवश्यकता आहे याविषयी आपणास काय वाटते?
ठळक बाबी -
नेतृत्व हे जन्मजात नसून पदाने सुध्दा प्राप्त होत नाही.
नेतृत्व हे अनुभवात्मक आहे. चुकांमधून सातत्याने शिकण्यातून नेतृत्व घडते.
1.1 पारिभाषित नेतृत्व:
ले मॅन ने परिभाषित केल्याप्रमाणे 'Leadership is understood to be an authority or someone with enough power or influence heading a group of people or organization.'
चला आपण Authority, power †Ö×�Ö Influence या शब्दांना समजून घेण्याचा प्रयत्न करु आणि हे प्रत्यक्षात नेतृत्व परिभाषित करण्यास किंवा पुनर्परिभाषित करण्यास कशी मदत करु शकते ते पाहू.
Power (सामर्थ्य): बक्षिसे आणि शिक्षेचा वापर करुन एखादयाच्या वर्तनात बदल घडविण्याची क्षमता म्हणजे सामर्थ्य होय.
सामर्थ्याचे (power) तीन प्रकार आहेत.
सक्तीचे सामर्थ्य (वैयक्तिक हानी)
परिश्रमिक सामर्थ्य (पैसा)
निकषांधारित सामर्थ्य (निकष, अटी, शर्ती, नियम)
पारंपारिक राजे, सरकारी क्षेत्रातील नोकरशाहा हे त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रात त्यांनी धारण केलेल्या पदाला प्राप्त अधिकाराद्वारे नेतृत्व करतात.
Authority (प्राधिकृत अधिकार): कायदेशीर मार्गाने दिलेला अधिकार जेथे सामर्थ्य ही क्षमता आहे व जेथे प्राधिकृत अधिकार हे योग्य असतात.
Influence (प्रभाव): बक्षीस, शिक्षा तसेच मान्यताप्राप्त अधिकाराच्या वापराशिवाय इतर व्यक्तींच्या वागणुकीत बदल करण्याची क्षमता.
तुम्ही तुमचे नेतृत्व या तीनही प्रकारे उपयोगात आणू शकता. परंतु इतरांना प्रभावित करण्याचा सर्वोत्तम मार्ग प्राधिकृत अधिकाराशिवाय आणि विश्वासपूर्ण वातावरणाची निर्मिती करुन बक्षीस किंवा शिक्षा यांच्या भयापासून मुक्त करणे ही सर्वोत्तम नेतृत्वशैली आहे. प्रभावाचा परिणाम हा अधिक सखोल, दीर्घ व चिरस्थायी असतो. सर्व शाळांच्या परिस्थितीत नेतृत्वाबाबत एक अनुमान काढता येईल की, नेतृत्व ही एक प्रभावाची प्रक्रिया आहे.
ठळक बाबी-
स्वतःला विचारा की, सामर्थ्य, प्राधिकृत अधिकार किंवा प्रभाव यापैकी कशाचा वापर अधिक करता?
1.2 प्रशासनाकडून नेतृत्वाकडे वाटचाल
शाळेत असतांना तुम्ही वेगवेगळ्या भूमिका बजावता. वेगवेगळ्या भूमिका बजावत असतांना कधी - कधी प्रशासकाप्रमाणे तुम्हीही संस्थेच्या जबाबदार्या बघता. कधी-कधी एखाद्या कंपनीच्या प्रमुखाप्रमाणे तुम्ही शाळेत वेगवेगळे विभाग सांभाळत असता आणि त्या सर्व भूमिका शाळेशी जोडलेल्या असतात. परंतु या सर्व उपक्रमांच्या गडबडीत आपण नेतृत्वाप्रमाणे विचार करणे आणि वागणे या बाबी गमावू शकता. आपण केलेले प्रत्येक काम आपल्या शाळेला सुधारणेच्या बाबतीत कुठे घेऊन जाते याची आपण कल्पना करु.
प्रशासक, व्यवस्थापक किंवा नेतृत्वकर्ता म्हणून काम करण्याच्या पध्दतीमध्ये एक मुलभूत फरक आहे. खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा आणि शाळाप्रमुख म्हणून किंवा व्यवस्थेतील पर्यवेक्षकीय घटक म्हणून आपण नेमके कुठे आहोत याचा निर्णय घ्या.

तुम्ही आकृतीत बघू शकता की, कामाची व त्यानुसार कार्यपध्दतीची व्याप्ती वाढलेली आहे. जेव्हा तुम्ही एखादया कार्याची अंमलबजावणी करतांना केवळ अटी आणि नियमांच्या अनुसार काम करता, तेव्हा आपण प्रशासकीय प्रवृत्तीचे प्रदर्शन करीत असता. तुमच्या कामाचा दृष्टीकोन संकुचित असतो. हे नोकरशाही संरचनेत बसणारे आहे. ज्यात कोणीही त्याच्या संरक्षित क्षेत्रातून (comfort zone) किंवा संकुचित मनोवृत्तीच्या बाहेर येण्यास तयार नसतो. बर्याच बाबतीत आपण कृती करण्यासाठी सूचनांची प्रतिक्षा करतो आणि स्वतःच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचा वापर करीत नाही.
जेव्हा आपण आपल्या शहाणपणाचा उपयोग विविध सहशालेय उपक्रम आणि विभागाचे पर्यवेक्षण करुन आपली शाळा सुलभपणे चालविण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा आपण प्रशासनाच्या मर्यादेला ओलांडून व्यवस्थापक म्हणून अधिक काम करायला लागतो. तथापि नेतृत्वाची भूमिका याही पलीकडे जाते.
नेतृत्वकर्ता चांगल्या पध्दतीने संघाची बांधणी केलेल्या प्रेरित संघासह सहयोगी दृष्टीचा (Shared Vision) विकास करतो.
एक असे वातावरण तयार करणे की, जेथे सहयोगी मानवी संबंध प्रोत्साहित केले जातात, संघ बांधणी आणि नेतृत्व संघाद्वारे केलेल्या प्रयत्नांना पाठींबा मिळतो.
नेतृत्वकर्ता जो स्वतःच्या कृतीद्वारे सहयोगी वातावरणाची निर्मिती करुन प्रेरणा देतो.
शाळा प्रमुख म्हणून अनेक भूमिका व जबाबदार्या हाताळतांना तुमच्याकडे ही समज विकसित होण्यास खूप वाव आहे. या सुरवातीच्या चर्चेच्या आधारे आपण शाळा नेतृत्वाबद्दलच्या आपल्या धारणेबद्दल विचार करु.
नेतृत्वकर्त्याने बदलाकरिता सुयोग्य वातावरण निर्मितीसाठी नेतृत्व प्रदान करतांना प्रशासकांनी व्यवस्थापकाच्या भूमिकेच्या पलीकडे जाणे अपेक्षित आहे. एक यशस्वी नेतृत्वकर्ता होण्यासाठी आपल्याला बोल्स आणि जेम्स डेव्हनपोर्ट (1975) यांनी प्रस्तावित केलेल्या घटकसंचामध्ये स्पष्ट केल्यानुसार चार ध्येय प्राप्त करावी लागतात

संदर्भ :- The leadership process in Harold W. Boles and James A. Davenport (1975). Introduction to Educational Leadership, Harper and Row, publishers, New Yark, P. 158.
आपल्या शाळेचे प्रशासन, व्यवस्थापन व सनियंत्रण करत असतांना वरील आकृती दर्शविते की, आपल्याला शाळा प्रमुख/ व्यवस्थेतील पर्यवेक्षकीय घटक होण्यासाठी वरील चारही ध्येये गाठावी लागतील. विद्यार्थी व शिक्षकांची नियमितता आणि वक्तशीरपणा, शिक्षकांकरिता व्यावसायिक विकासाच्या संधी, संदर्भ साहित्यासह सुसज्ज ग्रंथालय इत्यादी शालेय उपक्रम योजना अंमलात आणत असाल तर तुम्ही दावा करु शकता की, ध्येय- 1 व 2 आपण साध्य केलेले आहे.
ध्येय-3 पूर्ण केले असा दावा तेच करु शकतात, जे बदलाकरीता पुढाकार घेतात आणि नवकल्पनांची अंमलबजावणी करु शकतात. ज्यांनी शिक्षक आणि संस्थेच्या (शाळा) व्यावसायिक विकासाच्या आकांक्षा पूर्ण करण्यात यश मिळविले आहे व जेथे हे दोन्ही घटक परस्परपुरक आणि एकाच वेळी प्रगती करीत आहेत, त्या ठिकाणी आपण ध्येय-4 साध्य करण्यात यशस्वी झालात असे म्हटले जावू शकते.
तुमचे प्रयत्न पहिल्या दोन ध्येयापर्यंतच मर्यादित असतील तर तुम्ही प्रशासक आहात. यशस्वी नेतृत्वकर्ता होण्यासाठी तुम्हाला ही रेषा ओलांडलीच पाहिजे. काही जण प्रथम तीन ध्येये साध्य करुन यशस्वी नेतृत्व करत असल्याचा दावा करु शकतात. मात्र ते बहुतेक प्रशासक असतात आणि फारच कमी व्यक्ती ध्येय-4 चे लक्ष्य गाठू शकतात.
ठळक बाबी:
एक नेतृत्वकर्ता हा एक प्रभावी प्रशासक आणि चांगला व्यवस्थापक असू शकतो, परंतु त्याची भूमिका या दोन्हींच्या पलीकडे पहावी लागते.
शाळा आणि शिक्षकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजांची पूर्तता यशस्वीरित्या पूर्ण करणे, नवोपक्रमात पुढाकार घेणे व अंमलबजावणी करणे हे प्राधिकृत अधिकाराशिवाय नेता प्रभाविपणे करु शकतो.
1.3 व्यवस्थेत बदल घडवा: प्रभावी शालेय नेतृत्वाची ध्येये
परिवर्तनशील नेतृत्व असणे
परिवर्तनशील नेतृत्व हे केवळ व्यवस्था आणि कार्य याचेच प्रशासन करीत नाही तर लोकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करते आणि त्यांचे सहकार्य आणि बांधीलकी मिळविण्यासाठी निश्चित प्रयत्न करते. ते सक्रीयपणे शाळेच्या 'संस्कृती' वर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांना स्वतंत्रपणे अध्ययन आणि कार्य करण्यासाठी सतत सहकार्य व सुसंवाद ठेवण्यास प्रोत्साहित करतात. शाळा विकासाच्या प्रक्रियेत यश मिळविण्यासाठी शालेय नेतृत्व नेहमी तत्पर असते. शाळेचा मूलभुत उद्देश हा अध्ययन आहे, तथापि शालेय नेतृत्व हे शाळेच्या फलश्रुती संबंधी, अध्ययन-अध्यापनातील यशस्वीतेबाबत व निश्चिती आणि ती साध्य करण्यासाठीची वैशिष्टयपूर्ण प्रक्रिया यातील संबंध यावर लक्ष केंद्रित करते. अशा अवस्थेत तुम्ही सहमत व्हाल की, एकूणच नेतृत्व ही अशी आंतरक्रिया आहे की, जी प्रभाव टाकते आणि बदल घडविते.
दिलेल्या लींक वर 'प्रेरणा' हे वाचन साहित्य वाचा. ज्यात हिमाचल प्रदेशातील शाळा, केंद्र, गट, जिल्हास्तरावरील परिवर्तनशिल नेतृत्वाबद्दल माहिती सांगितली आहे. NGO’s ने सुध्दा यात ठळकपणे आपले योगदान दिलेले आहे.
प्रेरणा रिपोर्ट
तुमच्यामध्ये परिवर्तनशील नेता विकसित करण्यासाठीची रणनिती.
नाविन्यता, प्रयोगशिलता आणि सहाध्यायी अध्ययनास प्रोत्साहित करा.
सहकार्यांची त्यांच्या विषयाबद्दल विचार व चिंतन, त्यांची कामगिरी आणि एकूणच शाळा सुधारणेसाठी बैठका आयोजित करा
गृहीतकांना आव्हाने द्या, पर्यायी मार्ग सुचवा आणि संवाद घडवा.
शाळेला आकार देणारी दृष्टी, मुल्ये आणि ध्येये यात जाणिवपूर्वक सहकार्यांना सहभागी करा.
व्यावसायिक अध्ययन समुदायाची निर्मिती करा.
शाळेमध्ये चिंतनात्मक संवाद व खुल्या चर्चेसाठी प्रोत्साहित करा.
शिक्षकांच्या व्यावसायिक गरजा जाणून घ्या.
कृतीसंशोधन आणि लघु संशोधनासाठी प्रोत्साहित करा.
शालेय व्यवस्थेमध्ये एक नेता असणे आणि एक प्रभावी नेता असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. एका नेत्याचे प्रभावी नेतृत्वाकडे मार्गक्रमण आणि सर्वसामान्य शाळेचे एका नवोपक्रमशिल शाळेत परिवर्तन हे एखाद्या नेतृत्वाच्या कार्यक्षेत्रात चांगल्या प्रणाली आणि व्यवहार्य कार्यपध्दतीवर अवलंबून असते. नेतृत्व हे एकंदरीत दृष्टी विकसित करण्याशी संबंधित आहे. तथापी इतरही काही कौशल्ये आहेत जसे, निर्णय क्षमता, समस्या निराकरण, वेळेचे व्यवस्थापन, जबाबदारी आणि कामाचे वाटप, सहकाऱ्यांचे उत्तर दायित्व ठरविणे आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेत बहुविध मार्गाचे अनुसरण. प्रभावी नेतृत्वाची खूप मागणी आहे. यासाठी विशिष्ठ ठळक संधीची आवश्यकता आहे. एक प्रभावी नेता होण्यासाठी ज्याचे आपण अनुसरण करु शकता असे काही मार्ग खालील प्रमाणे आहेत.
तुमच्या कामाचे विश्व तयार करा : हे शाळेत बदलाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. याकरीता एखाद्याने उपलब्ध स्त्रोतांचे मूल्यांकन करणे, वार्षिक उद्दिष्टे आणि लक्ष्यांची यादी करणे, रणनीती आणि मूल्यांकन प्रक्रियेची व्याख्या करणे, निकषांची रुपरेषा ठरविणे आणि जबाबदारीचे वाटप करणे महत्वाचे आहे. या सर्व बाबी मुख्याध्यापकांची जबाबदारी पार पाडतांना उद्भवणारे अनावश्यक त्रास टाळण्यास मदत करतील. शाळाप्रमुखांना खालील चार महत्वाच्या बाबीमध्ये स्वतःला सक्रीय करणे आवश्यक आहे.
शाळा विकास आराखड्यावर आधारित वार्षिक, मासिक आणि दैनंदिन लक्ष्ये
प्रगतीचा पडताळा घेण्यासाठी मूल्यांकन प्रक्रिया व यशस्वीतेचे निकष
आर्थिक, प्रशासकीय, शैक्षणिक आणि सामाजिक भूमिका यातील वेळेचे योग्य व्यवस्थापन
भूमिका आणि जबाबदार्यांची निश्चिती आणि कालावधीची निश्चिती.
आपली शाळा समजून घ्या :
प्रत्येक शाळेची स्वतःची माहिती जशी वर्गवार पटसंख्या, उपस्थिती, टिकवणूक, संपादणूक स्तर, आरोग्याची स्थिती, सामाजिक-आर्थिक घटकांवर आधारित प्रत्येक मुलाचा डाटा, विशेष गरजा असणारी मुले, शाळेची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पार्श्र्वभूमी, शैक्षणिक आणि मुलभूत भौतिक सुविधा आणि बरेच काही. हा सर्व डाटा (माहिती) शाळेला समजून घेण्यास आणि त्यासंबंधीच्या गरजा व प्रगतीचे मुल्यांकन करण्यासाठी संदर्भ म्हणून मदत करतो. परंतु बहुतेक वेळा शाळेच्या सुधारणेसाठी या डाटाचा योग्य वापर केला जात नाही. हा शाळाधारित डाटा (माहिती) खालील बाबींसाठी वापरला जावू शकतो.
प्रत्येक मुलांचे इयत्तानिहाय आणि विषयवार संपादणूकीचे मूल्यांकन करणे.
विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अध्ययन-अध्यापनात येणार्या अडचणीबाबत शिकणे.
शाळेच्या आवश्यक शैक्षणिक आणि भौतिक गरजांविषयी नियोजन करणे.
सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक संदर्भ तसेच समुदायाच्या अपेक्षा समजून घेणे.
अशा प्रत्येक मूल्यांकनावर आधारित नेतृत्वकर्ता त्यांचा स्वतःचा प्राधान्यक्रम निश्चित करुन शाळेसाठी ध्येय आणि लक्ष्ये निश्चित करु शकतात.
संघ बांधणी : ही वस्तूस्थिती आहे की, प्रत्येक व्यक्ती विशिष्ट आहे आणि क्षमता व सामर्थ्य यांचे मूर्तिमंत रुप आहे. शालेय नेतृत्वाने त्यांच्या सहकार्यांतील सामर्थ्य स्पष्टपणे ओळखले पाहिजे व त्यांच्या क्षमता व सामर्थ्यानुसार जबाबदारीचे वाटप केले पाहिजे. तसेच त्यांच्या मर्यादांवर मात करण्यासाठी सहाय्य केले पाहिजे.
प्रत्येक सदस्याला समजून घ्या : शाळा व्यवस्थेत उपलब्ध मानवी संसाधनांना जर दुलक्षित केले गेले, तर शाळा सुधारणेसाठी घेतलेला पुढाकार वाया जावू शकतो. शेवटी शाळाप्रमुख हे मानवी घटकांशी आंतरक्रिया करतात, यंत्रांशी नव्हे. प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःची मते, कल्पना, दृष्टीकोन असतील. या विविध मत प्रवाहासह काम करणे, ही एक कला आहे. यासाठी लोकांना समजून घेण्याचे कौशल्य आवश्यक आहे.
चला गृहितके आणि स्वतःला समजण्यासाठी एक चिंतनशील कृती करुयाः
काही व्यक्तींच्या वर्तनाचा मला का त्रास होतो?
माझ्या सहकार्यांसोबत काम करतांना माझ्या वागण्यात किती सहजता असते?
मी माझ्या सहकार्यांमधून काहींशी जवळीक, तर काहींशी अंतर ठेवून का वागतो?
मला काय म्हणायचे आहे, हे मी माझ्या सहकार्यांशी संवाद साधतांना स्पष्टपणे मांडू शकतो का?
एक नेता म्हणून आपले सहाध्यायी, सहकारी आणि वरिष्ठ यांचेशी असलेल्या संबंधांचे मूल्यांकन करुन आपण आपल्या शाळेच्या विकासाच्या धोरणात्मक योजनेस आकार देण्यासाठी अधिक चांगले सज्ज व्हाल.
सामाजिक दृष्टी तयार करणे : कधी-कधी अत्यंत प्रभावशाली नेतृत्व अंमलबजावणीच्या टप्प्यावर त्यांच्या चांगल्या कल्पनांची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी होतो, कारण सहकार्यांच्या सहभागीतेशिवाय एकट्यानेच त्या कल्पना मांडलेल्या असतात. शाळा कर्मचारी, विद्यार्थी आणि समाज यांच्या एकत्रित सहभागातून शाळेविषयीचे व्हिजन तयार करणे सहज शक्य आहे व यासाठी शाळेविषयीच्या स्वप्नांसह समाजाने सहभागी व्हावे याकरीता त्यांना विचारणा होणे आवश्यक आहे. सर्व कल्पना एकत्रित करा आणि स्वप्नांतील शाळा बनविण्यासाठी त्यापैकी प्रत्येकाला कोणती भूमिका करायला आवडेल हे विचारा. याद्वारे प्रत्येकाची जबाबदारी निश्चित होईल व शाळेचे व्हिजन साध्य करण्यासाठी सहभागी प्रत्येक व्यक्ती उत्साहाने कामाला लागेल.
सकारात्मक द्ष्टीकोण दृढ करा : स्वतःमध्ये किंवा संस्थेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी दृष्टीकोन मोठी भूमिका निभावतो. व्यवस्थेत जर काही चुकीचे घडले तर मी राज्य, केंद्र किंवा सरकारला दोष देऊ शकतो आणि इतर काहीच करु शकत नाही किंवा व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माझी भूमिका कुठे आहे ते पहा आणि बदल घडविण्याचा शक्यतो प्रयत्न करा. त्यासाठी पुढाकार घ्या. सरते शेवटी आपला दृष्टीकोन कसा आहे यावर हे अवलंबून आहे. ‘काहीही शक्य नाही’ हे सुरवातीलाच जर स्विकारले, तर कोणीही त्यांच्या संरक्षीत क्षेत्रातून (comfort zone) बाहेर येण्याचा साधा प्रयत्नही करणार नाही. केवळ बदलाची शक्यता लक्षात घेऊन एखाद्याला आढळेल की, त्याला जाणीव नसतांनाही बदल घडत आहे. वेळोवेळी आपल्या सहकार्यांमध्ये स्वतःच्या पुढाकारातून आणि प्रेरणेद्वारा विश्वास निर्माण करणे ही नेतृत्वाची प्रमुख भूमिका आहे.
ठळक बाबी:
एक प्रभावशाली नेतृत्वकर्ता म्हणून विविधस्तरावर शाश्वत असे प्रयत्न आवश्यक आहे जसे की, कामाचे आयोजन, वेळेचे व्यवस्थापन, व्यक्तींना समजून घेणे, संघ बांधणी, सामायिक दृष्टीचे विकसन आणि सकारात्मक दृष्टीकोन दृढ करणे.
घटक - 2 : शाळा एक अध्ययन संस्था
संस्था ह्या अपेक्षेप्रमाणे अध्ययन संस्था म्हणून विकसित होत नाहीत. बदल घडविण्यासाठी काही घटक आवश्यक असतात. विशेषतः स्थापित संस्था या स्वतःत वाढ करण्याऐवजी दैनंदिन कामकाज पूर्ण करण्यात व्यस्त असतात. अशा प्रकारे अनेक संस्था जेव्हा वाढतात तेव्हा ते त्यांची शिकण्याची क्षमता गमावतात व अधिक कठोर होतात. जेव्हा समस्या उदभवतात तेव्हा, त्यांची विचारसरणी अत्यंत पारंपारिक असते आणि मुख्यत्वे कारणे शोधणे आणि त्याकरीता समाधान शोधणार्या टिमचा भाग बनण्यापेक्षा प्रणालीला दोष देणे याकडे भर असतो. यामुळे या प्रयत्नांची तसेच परिणामाची जबाबदारीही बदलते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संस्थेची पुनर्रचना करणे, सकारात्मक स्पर्धेचे वातावरण व संधी तयार करणे आणि भागधारकांचा सहभाग असणारी संस्कृती विकसित करणे आवश्यक आहे. हा घटक मुख्याध्यापकांना शाळा एक अध्ययन संस्था म्हणून विकसित होण्यासाठी आणि तिची सतत वाढ आणि सुधारणा होण्याच्या दृष्टीने सक्षम बनविते.
‘व्हिडीओ पहा’- The paradigm of learning organization (अध्ययन संस्थांचे प्रतिमान)
2.1 - अध्ययन संस्था म्हणजे काय?
अध्ययन संस्था ही अशी एक संस्था आहे की, जी तिच्या सदस्यांचे शिकणे सुलभ करते आणि सातत्याने स्वतःत बदल घडविते. ही संकल्पना पिटर सेंगे आणि त्यांचे सहकारी यांच्या कार्य आणि संशोधनाद्वारे तयार केली गेली आहे.
विविध पुस्तकात अध्ययन संस्थेच्या अनेक व्याख्या आहेत. 'पिटर सेंगे' यांनी एका मुलाखतीत असे सांगितले की, अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या क्षमता वृद्धिंगत करण्याकरीता एकत्रितपणे काम करणारा लोकांचा समुह म्हणजे एक अध्ययन संस्था होय. 'पिटर सेंगे' यांनी आपल्या "The fifth Discipline" या पुस्तकातून अध्ययन संस्थेची संकल्पना लोकप्रिय केलेली आहे. पुस्तकात त्यांनी अध्ययन संस्थेची पाच वैशिष्टे सुचविलेली आहेत. ती खालीलप्रमाणे-
वैयक्तिक निपुणता (Personal Mastery)
मानसिक प्रतिमाने (Mental Models)
सामायिक दृष्टी (Shared Vision)
सांघिक अध्ययन (Team Learning)
व्यवस्थेचा विचार (System’s Thinking)
2.2 वैयक्तिक निपुणता (Personal Mastery) :
“मानसिकतेत बदल हा अध्ययन संस्थेचा मुळ गाभा आहे जसे- जगापासून विभक्त असणे, जगासोबत जुळलेले असणे, इतरांमुळे समस्या निर्माण झालेली आहे हे पाहणे, आपण अनुभवलेली समस्या कल्पना कृतीमुळे निर्माण झाली हे जाणणे. अध्ययन संस्था ही अशी जागा आहे जिथे लोक त्यांच्या वास्तविकतेचा आणि ती कशी बदलू शकते याचा सातत्याने शोध घेत असतात.” -पिटर सेंगे
याचाच अर्थ बदलाच्या अंगाने स्वतःचा शोध घेणे. ज्या बाबी खरोखरच आपल्याशी संबंधित आहेत त्या बाबींच्या स्पष्टतेने सुरुवात करावी.

वैयक्तिक निपुणता ही अध्ययन संस्थेची पहिली शाखा आहे. वैयक्तिक निपुणता अंतर्गत काही क्षेत्रे येतात ती खालील प्रमाणे :
वैयक्तिक हेतू आणि दृष्टी : “मी कसा बदल करु शकतो ?” यावर लक्ष केंद्रीत करणे.
“हेतूचे सामर्थ्य उलगडण्याची वैयक्तिक व्हिजन ही एक किल्ली आहे. वैयक्तिक व्हिजन ही एक सामर्थ्यशाली बाब आहे की, जी एखाद्याच्या अंतर्निहित हेतुला स्पष्ट करते. वैयक्तिक व्हिजन हे बांधिलकी आणि कृतीमध्ये हेतुला परावर्तीत करण्याचे साधन आहे” - पिटर सेंगे च्या "The fifth Discipline" या पुस्तकातून.
वैयक्तिक मूल्ये : मूल्यांच्या स्पष्टतेतून प्राप्त मार्गदर्शन आणि कृती.
वैयक्तिक बोध : स्वतःला अधिक अचूकतेने पाहणे. यावर हे सुध्दा अवलंबुन आहे की, तुम्ही इतर लोकांना, घटना आणि परिस्थितीला कसे पाहता?
वैयक्तिक जुळवणूक : वैयक्तिक जुळवणूक ही अशी बाब आहे की, ज्यात आपले वैयक्तिक व्हिजन, हेतू, मूल्ये आणि वर्तन यांची एकमेकांशी सुसंगत अशी जुळवणूक असते.
वैयक्तिक जाणीव : वैयक्तिक जाणिव म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल किती माहिती आहे ? (किंवा जाणण्याची इच्छा आहे? ) आपल्याला आपले मार्ग, आपली इच्छा, प्रवास, गरजा आणि प्राधान्य यावरून हे ठरते की, तुम्ही कसे आहात. याद्वारे आपणास नेमके काय आवडते याचे निरिक्षण करण्यास आपण सक्षम बनतो. विचार करण्याची पध्दत, भावना आणि वर्तन तुमच्या आंतरक्रियेच्या गुणवत्तेवर कसा परिणाम होतो आणि इतरांवर या पध्दतीचा काय परिणाम होतो हे पाहणे, जे चांगले परिणाम देतात त्यांना अधिक सक्षम करणे आणि जे चांगला परिणाम देत नाही त्यांच्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणे.
वैयक्तिक परिवर्तन : वैयक्तिक परिवर्तन म्हणजे आपण सर्वांनी आपल्या वैयक्तिक व्हिजन, मूल्ये आणि हेतूसह अधिक सदभावनेने आपण आपल्यात पुन्हा बदल करणे व नव्याने शोध घेणे ही एक सर्जनशील क्षमता आहे.
चिंतनशील प्रश्न :
आपण आपले रोजचे तसेच आठवड्याचे ध्येय निश्चित करता का?
तासिकेनंतर तुमच्या ध्येयासंबंधी तुम्ही चर्चा, कृती करता का?
शाळेचे मुख्याध्यापक म्हणून आपण आपल्या सहकार्यांच्या अध्ययनासाठी शेवटचा प्रयत्न कधी केला ?
आपल्या सहकार्यांची वैयक्तिक निपुणतेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक नेता म्हणून तुम्ही कसे सहाय्य कराल?
आपण रोजच्या जीवनात वैयक्तिक निपुणतेच्या तत्वांचा सराव करीत आहे असे वातावरण कसे निर्माण कराल?
ठळक बाबी
वैयक्तिक निपुणता ही स्व ची जाणीव व स्वपरिवर्तन करण्याची क्षमता आहे.
2.3: मेंटल मॉडेल (मानसिक प्रतिमान)
मेंटल मॉडेल
केस स्टडी वाचनः
श्री रमेश यांची विज्ञान विषयाचे प्रशिक्षीत पदवीधर शिक्षक (TGT) म्हणून शासकीय शाळा, बडमेर येथे बदली झालेली आहे. त्यांची बदली पारदर्शक प्रशासकीय प्रक्रियेतून गुणवत्तेनुसार झालेली आहे. श्री रमेश यांचे नविन शाळेवर रुजू होण्याआधीच या शाळेतील मुख्याध्यापकांनी श्री रमेश यांच्या पूर्वीच्या शाळेतून त्यांच्या विषयीचा अहवाल प्राप्त करुन घेतला होता. जो की दुर्देवाने एवढा चांगला नव्हता. मुख्याध्यापक श्री. बेनिवालजी यांनी ठरविले की, श्री. रमेश यांना प्राथमिक स्तरावरील वर्ग द्यायचे व तुर्तास माध्यमिक स्तरावरील वर्ग अध्यापनासाठी देऊ नये. रमेश यांच्या अध्यापनामुळे मुलांच्या शिक्षणावर वा अध्ययनावर फारसा परिणाम होणार नाही या विचाराने श्री. बेनिवालजी त्यांना काही प्रशासकीय कामे द्यायचे. श्री. रमेश यांनी विविध प्रसंगी संप्रेषण कौशल्ये आणि सकारात्मक दृष्टीकोनावर असलेल्या प्रभुत्वातून स्वतःला सिध्द केलेले होते. तथापी त्यांना स्वतःला शाळेत नेहमी सर्वात कमी गणले जात असल्याचे आढळले. शेवटी त्यांची अध्यापनातील रुची संपत गेली. अशाप्रकारे हळूहळू मुख्याध्यापकांचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टीकोन व धारणा पक्की होण्यास मदत झाली.
चिंतनशील प्रश्न :
श्री. रमेश यांच्याकडे गुणवत्ता आणि कामगिरी क्षमता असूनही श्री. बेनीवालजी त्यांना अध्यापनासाठी उच्च प्राथमिक मधील वर्ग देतात व विविध प्रशासकीय कामात गुंतवतात असे मुख्याध्यापकांनी का केले असेल असे तुम्हास वाटते?
धारणा वा दृष्टीकोन ‘आपण काय करतो?’ यावर कसा प्रभाव टाकतात याबद्दल आपण कसा विचार करता?
वरील केस स्टडीमध्ये आपण पाहिले की, श्री. बेनीवालजी यांची श्री. रमेश यांच्याबद्दलची प्रतिमा श्री. रमेश यांच्या कामावर परिणाम करते. खरं तर बेनिवालजी यांना ते जे करीत आहे याविषयी इतका आत्मविश्वास आहे की, त्यांनी एकदाही याबाबत स्वतःला प्रश्न विचारला नाही किंवा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला नाही. अशा प्रकारे मेंटल मॉडेल हे चित्रे किंवा प्रतिमा, कल्पना किंवा गृहीतके किंवा कथा ह्या सर्व बाबी आपल्या ज्ञानाच्या आधारे कसे पाहतो अणि लोक कसे आहेत हे म्हणजे ‘हिरवा चष्मा घालुन जग हिरवे आहे’ असे म्हणण्यासारखे आहे. मानसशास्त्रज्ञ याला ‘निवडक निरिक्षण’ म्हणतात.
'मेंटल मॉडेलींग' म्हणजे आपल्या दृष्टीकोनाविषयी आणि आपल्या धारणांविषयी प्रश्न विचारणे होय.
आपल्या धारणा आणि दृष्टीकोन स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुध्दा अधिक पारदर्शक बनविणे.
आपल्या वैयक्तिक प्रतिमांची ओळख करुन त्यांचे कठोरपणे परिक्षण करणे.
स्वतःचा आणि इतरांचा दृष्टीकोन, विश्वास आणि धारणा विषयीची जाणीव वाढविल्यामुळे विचार, वर्तन आणि आंतरक्रियांवर प्रभाव पडतो.
आपल्या स्वतःच्या कृतींवर चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सातत्याने वृध्दींगत होण्यासाठी आपल्या क्षमतांमध्ये वाढ करणे याकरीता आपल्या मेंटल मॉडेलचे सातत्याने पुनर्मुल्यांकन करावे.
विचार करणे आणि सांगणे यातील सांगड व तफावत :
Argyris चा असा विश्वास आहे की, रकान्यात डाव्या बाजुला दिलेल्या तंत्राचा सराव करुन लोकांना त्यांच्या मेंटल मॉडेलचा प्रवाह पाहण्याचे शिकविले जावू शकते. उदा. आपण उपमुख्याध्यापकांसोबत अध्ययन-अध्यापनाच्या सुधारणेबाबत आणि स्टाफ विकासाच्या दृष्टीने नविन योजनेबाबत चर्चा केली. बहुतेक कारणास्तव आपण सामान्यतः काय विचार करतो आणि काय म्हणायचे हे ठरवू शकत नाही. येथे एक संवाद आहे ज्यात आपण जे काही बोलतो ते खालील कॉलममधील उजव्या स्तंभात आणि डाव्या बाजूच्या स्तंभात आपण प्रत्यक्षात काय विचार करतो हे दर्शविलेले आहे.
मुख्याध्यापक / प्राचार्य
उपमुख्याध्यापक / उपप्राचार्य
विचार करणे
सांगणे
विचार करणे
सांगणे
तो स्वतः एकही तासिका शिकवीत नाही आणि कधीही पुढाकार घेत नाही तरीही मी त्याला का विचारत आहे?
तर तुम्हाला असे वाटते का? की, महिन्यातून एकदा शिक्षकांच्या वर्गाचे अवलोकन शिक्षकांच्या अध्यापनातील त्रुटी आणि उणिवांवर प्रकाश टाकून मदत करेल.
तुमच्याकडून केल्या गेलेल्या जास्तीच्या अपेक्षेनुरूप स्टाफ काम करेल असे आपणास वाटते काय?
होय, नक्कीच, मला वाटते, आपण प्रयत्न करावा.
ठळक बाबी :
आपण आपल्या आयुष्यात अशा अनेक प्रसंगाना सामोरे जातो जिथे आपण काय बोलतो आणि काय विचार करतो हे जुळत नाही.
स्वतःच्या विचारांबद्दल स्वतःला प्रश्न विचारा? अशाप्रकारे विचार करण्याचे काय आधार आहेत?
माझे विचार सिध्द करणारा पुरावा माझ्याकडे आहे काय?
2.4 सामायिक दृष्टी
कृती : खालील प्रश्नांबाबत आपल्या स्टाफ/कर्मचार्यांशी चर्चा करा. विद्यार्थ्यांची व पालकांच्या प्रतिनिधीक गटासोबत चर्चा करा. चर्चेतून आलेले मुद्दे आणि सूचनांचे चार्ट पेपरवर लिखाण करुन प्रदर्शित करा. प्रत्येक गटातील 1-2 प्रतिनिधीच्या माध्यमातून गटाचे अंतिम सादरीकरण करा.
आपण कोणत्या प्रकारची शाळा घडवू इच्छिता? खालील मुद्यांच्या आधारे स्पष्ट करा.
अध्ययन-अध्यापनाची स्थिती
विद्यार्थी संपादणूक
शाळेचे वातावरण
पालकांचे सहकार्य
शिक्षक-विद्यार्थी संबंध
शाळा-समाज संबंध
Fullan यांनी असे सूचविले आहे की, सामायिक दृष्टी विकसनामागील भूमिका ही सतत सदस्यांना त्यांचा विचार आणि वैयक्तिक दृष्टी विकसनासाठी मदत करते. जर लोकांना स्वतःचे व्हिजन नसेल तर ते सर्व जण नेमून दिलेले काम पूर्ण करु शकतील, परंतु त्याच्याशी त्यांची बांधीलकी नसेल. Mink म्हणतो की, ही बाब एका रात्रीत घडणारी नसून ही फार आव्हानात्मक आहे. ‘आपण कोणत्या प्रकारची शाळा घडवू इच्छिता?’ या प्रश्नांचे उत्तर व्हिजन देते असे Mink म्हणतो.
आपण सामायिक दृष्टी कशी विकसित कराल?
ठळक बाबी :
शाळेत बदल कसा घडवायचा यावर सर्वाच्या सहभागातून एकत्रितपणे तयार केलेली सामायिक कल्पना, प्रतिमा बनते तेव्हा त्यास सामायिक दृष्टी म्हणतात.
2.5 सांघिक अध्ययन
सांघिक अध्ययनामध्येच संघ बांधणीची प्रतिध्वनी सम्मिलीत आहे. परंतु प्रत्यक्षात तो गट प्रक्रियेच्या विकासाऐवजी गटाच्या शिकण्याच्या कृतींवर लक्ष केंद्रीत करतो. वैयक्तिक अध्ययन हे कितीही चांगले किंवा आपणास समाधान देणारे असले तरीही ते मुलतः संस्थेसाठी असंबंध ठरते, कारण वास्तविकतेत सर्व महत्वाचे निर्णय हे सांघिकपणेच घेतले जातात. संस्थेतील घटकांचे अध्ययन हे सांघिक आहे, ज्यांना कार्य करण्यासाठी एकमेकांची गरज असते. सांघिक अध्ययन म्हणजे एकत्रितरित्या एकत्रितपणे कार्य करण्यासाठी एक संस्थात्मक वचनबध्दता होय.
केस स्टडी
एका समान मुद्यावर पारंपारिक पध्दतीचा संघ आणि सामुहिक अध्ययन संघ यांच्या दृष्टीकोनातील फरकाचे एक वास्तविक उदाहरण बघू या !
पारंपारिक पध्दतीचा संघ-
रोहतक मॉडेल स्कूलमधील गणित टिमने नेहमीच स्वतःला कार्यक्षम असल्याचे मानले होते. बहुतेक कर्मचारी शाळेत बर्याच काळापासून कार्यरत होते आणि बरेच स्थिर झालेले होते. त्यांना त्यांचे काम चांगल्या प्रकारे माहित होते आणि प्रशासकीय कामासंबंधीचे त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले होते. नविन येणारा कर्मचारी किंवा स्टाफ यांना बहुतेक वेळा प्राथमिक वर्गांची जबाबदारी देण्यात येई किंवा इतर स्टाफचे सहाय्यक म्हणून काम करावे लागे. श्रीमती मलीक आणि श्री. वांगडू इयत्ता 10 वी च्या वर्गाला शिकवतील, चांगले परिणाम साध्य करण्याच्या उद्देशाने याबाबत सर्व सहमत झाले. काही स्टाफ सदस्य याबाबत असमाधानी होते कारण त्यांना वरच्या वर्गाला शिकविण्याची संधी नाकारण्यात आलेली होती यात काही आश्चर्य नव्हते. स्टाफ मिटींग मध्ये मधून-मधून यावर मत नोंदवले गेले किंवा नाराजी व्यक्त केल्या गेली. तरी सरते शेवटी टिमचा हेतू प्रत्येक वर्षी साध्य झाला आणि बोर्डाच्या परिक्षेत चांगले परिणाम प्राप्त झाले.
लर्निंग टिम :
एक लर्निंग टिम म्हणून हे प्रकरण खालील प्रकारे हाताळले गेले असते.
प्रथमतः त्यांना गणित अध्ययनाच्या मुख्य उद्देशाबद्दल वास्तविक चर्चेसाठी एकत्र केले असते. यामुळे गणित विषयाचे अध्यापन आणि हेतूविषयी वैयक्तिक आणि शिक्षकांचा विश्वास व गृहीतकांना आव्हान देता येईल अशी चर्चा घडवून आणता आली असती.
दुसरी गोष्ट म्हणजे टिमचे एकत्रितपणे एकमत होईपर्यंत सध्या गणित विषयाच्या बाबतीत सुरू असलेल्या कृती वा अध्यापनाचे परिक्षण करता आले असते.
तिसरे म्हणजे सर्वसाधारणपणे सहमत असलेले मुद्दे, हेतू आणि उद्दिष्ट यांच्या दृष्टीकोनातून टिमने विचार केला असता. टिमच्या सदस्यांनी सध्या सुरु असलेल्या अध्यापन पध्दतीचे वा कृतीचे विश्लेषण केले असते आणि त्या कृती वा पध्दती उद्दिष्टांच्या हेतूस सहाय्य करतात की अडथळा आणतात हे पाहिले असते. या विषयावरील खुल्या चर्चेने हा मुद्दा समोर आला असता की, सध्याच्या प्रचलित पध्दती वा अध्यापन कृतीमुळे बोर्डाच्या परिक्षेतील परिणाम हा 100% मिळाला तरी, यामुळे श्रीमती मलीक आणि श्री वांगडू यांच्याच क्षमतेमध्ये वृध्दी झाली, मात्र जर त्यांच्यामुळे अपयश मिळाले तर संस्थेला त्याचे परिणाम भोगावे लागले असते व मोठा धोका निर्माण होऊ शकला असता अशी शक्यता होती.
चौथा मुद्दा म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांकरीता त्यांच्या शैक्षणिक कौशल्य आणि सर्वांना समान लेखणे यासाठीचे शिक्षण आणि अधिक समाधानकारक अनुभव कसा मिळेल याबाबत टिम चर्चा करू शकली असती.
सरते शेवटी वैयक्तिक आणि विभागस्तरावर ज्ञान आणि कौशल्याची देवाण-घेवाण करुन कामगिरीत वृद्धी करण्यासाठी लर्निंग टिमने मार्ग शोधला असता.
अशा प्रकारे जर धारणांच्या परिक्षणाची कृती आणि एकत्रित स्तरावरील कृतींवर चिंतन करणे सुरु केल्यामुळे संपूर्ण संस्थेच्या लाभासाठी टिमकडे इच्छाशक्ती, क्षमता आणि शिकण्याची व समस्या निराकरण प्रक्रियेचा वापर करण्याची क्षमता येईल. आता टिम कसे शिकावे हे शिकली आहे.
चिंतनशील प्रश्न :
केस स्टडीच्या आधारे, लर्निंग टिमची वैशिष्टे ओळखा व त्याची यादी तयार करा.
तुमच्या शाळेत लर्निंग टिमचे विकसन करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापराल?
ठळक बाबी: