केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात १ जानेवारी २०२२ पासून शंभर दिवस वाचन अभियान (Reading campaign) हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्य व अभिरुची विकसित होण्यासाठी दर आठवड्याला बालवाटिका ते इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी वाचन संदर्भाने वेगवेगळे उपक्रम घेणे अपेक्षित आहे. नियोजनानुसार इयत्ता निहाय विद्यार्थ्यांना खालील उपक्रम करण्यास प्रोत्साहित करावे.
आठवडा बारावा
दि.१९/३/२०२२ ते २५/३/२०२२ गट -१
बाल वाटिका ते इयत्ता दुसरी
उपक्रम – ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड (DEAR)
शाळेत उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक, सर्व कर्मचारी इतर सगळी कामे बाजूला ठेवून ठरविलेल्या दिवशी किमान 20 मिनिटे फक्त प्रकट वाचन करतील.
यासाठी आठवड्यातील किमान एक तरी दिवस ठरवावा व त्यादृष्टीने नियोजन करावे.
उदाहरणार्थ- मंगळवारी सकाळी 11 वाजता.
गट -२
इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवी
उपक्रम – ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड (DEAR)
शाळेत उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक, सर्व कर्मचारी इतर सगळी कामे बाजूला ठेवून ठरविलेल्या दिवशी किमान २० मिनिटे फक्त प्रकट वाचन करतील.
यासाठी आठवड्यातील किमान एक तरी दिवस ठरवावा व त्यादृष्टीने नियोजन करावे.
उदा: मंगळवारी सकाळी ११.०० वाजता.
गट -३
इयत्ता सहावी ते आठवी
उपक्रम – कविता वाचन
विद्यार्थ्यांना त्याच्या/तिच्या आवडीच्या किंवा शिक्षकांनी सुचविलेल्या कवींच्या कवितेचे वाचन करण्यास सांगावे व विद्यार्थ्यांना ठराविक शब्द किंवा विषय देऊन स्वतः कविता करण्यास प्रेरित करावे.
No comments:
Post a Comment