Friday, 31 December 2021
भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष
किनवट : भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्षे व सुप्रसिध्द समाजसेवक, आदरणीय “यदुनाथजी थत्ते” यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने 40 वर्षापूर्वी त्यांनीच लिहिलेल्या (पुनर्मुद्रीत) “प्रतिज्ञा” पुस्तकाचे प्रकाशन दि. 25 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आले. प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अशोक बेलखोडे, किनवटचे माजी नगराध्यक्ष इसाखान सरदार खान, अ.नि.स. महाराष्ट्रचे प्रधान सचिव माधाव बावगे, जेष्ठ समिक्षक रामप्रसाद तौर यांची उपस्थिती होती.
यदुनाथजी थत्ते हे स्वातंत्र्य सेनानी होते, ते लेखक होते, विज्ञान व बालसाहित्यातील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. साधना साप्ताहिकाचे ते दिर्घकाळ संपादक होते. विज्ञान व बालसाहित्यीक असलेल्या यदुनाथजींचे युवक व शालेय विद्यार्थ्यांशी संवाद करणे हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. आंतरभारती सारखा प्रकल्प त्यांनी सुरू केला होता त्यातुन भारताच्या विविध भाषा युवकांनी शिकाव्यात, संवाद साधावा व राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळावे अशी त्यांची भावना होती. शाळेत विद्यार्थी रोज घेत असलेली प्रतिज्ञा त्यांना शिक्षकांनी समजावून सांगितली पाहीजे, असे यदुनाथजींना वाटायचे. साधारण 40 वर्षापूर्वी या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली होती. छात्रभारती व भारत जोडो युवा अकादमी किनवट यांनी हे पुस्तक प्रकाशीत केले. आतापर्यंत हे पुस्तक 20-25 वेळा पुनर्मुद्रीत करण्यात आले. अशा या पुस्तकाचे प्रकाशन “साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या वर्धापन” दिनानिमीत्त आयोजीलेल्या आदरणीय बाबा आमटे स्मृती व्याख्यानमाले प्रसंगी करणयात आले.
या प्रसंगी डॉ. अशोक बेलखोडे यांनी या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगून प्रत्येक शिक्षकाणे हे पुस्तक वाचावे व संग्रही ठेवावे असे आवाहन केले. व्यासपीठाला डॉ. अंबादास कांबळे विचारपीठ, तर कार्यक्रम परिसरास सेवादलाचे विश्वस्त कै. सदाशिवराव पाटील यांचे व सभामंडपाला एस. एन. सुब्बारावजी यांचे नाव देण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष, के. मुर्ती, श्रीरंग भुतडा, अनिल दरेकर – लातूर, विनायकराव पाटील, अतुल बडवे, तुलसीदास शिंदे, नविन राठोड, प्रा. डॉ. पंजाब शेरे, प्रा. सुलोचना जाधव, प्रा. डॉ. किरण आयनेनवार, प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड, दिपक डंबाळे यांच्यासह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संचालित, कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, बळीराम पाटील, सरस्वती महाविद्यालयातील युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे यांनी केले.
Thursday, 30 December 2021
Wednesday, 29 December 2021
Monday, 27 December 2021
Sunday, 26 December 2021
स्वर्गीय उत्तम रावजी राठोड संगीत रजनी(4)

साने गुरुजी जयंती आणि साने गुरुजी रुग्णालयाच्या वर्धापन दिन निमित्त
Saturday, 25 December 2021
shiku Aanande
*महत्त्वाचे*
*प्रति,*
उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण,मुंबई
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व ),
शिक्षणाधिकारी प्राथ.माध्य. (सर्व)
प्रशासन अधिकारी, मनपा (सर्व)
विषय: " *शिकू आनंदे* "(Learn with Fun) या उपक्रमाबाबत .....
उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या
प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या.टप्याटप्याने सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेतील सर्व मुलांचे शिकणे आनंददायी पद्धतीने सुरु रहावे, या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.३ जुलै २०२१ पासून online पद्धतीने *“शिकू आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दि. २५ डिसेंबर २०२१ रोजीच्या सत्रात *कवायत,नृत्य,गीतगायन, नाताळ सजावट* या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.
https://youtu.be/fGRJza2SMEo
स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.
https://youtu.be/m6JUqVBsxbM
याबाबत वरिष्ठ अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी,अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,विषय सहायक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. तसेच whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी. जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी.
एम देवेंदर सिंह (भा.प्र.से)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे
Friday, 24 December 2021
Thursday, 23 December 2021
Thursday, 9 December 2021
Saturday, 4 December 2021
solar power
फिलीपाईन्स देशाच्या अदिवासी पाड्यात जिथे विज पोचत नाही तिथेले लोक पाण्याचे दिवे वापरतात. कसे ?
(हे तुम्ही घरी पण करु शकता आणि आसपासच्या पाड्यात विजेचा पर्याय म्हणुन पोचवु शकता)
एक प्लास्टिकची बाटली घ्या त्यात ९०%
पाणी भरा आणि त्यात ब्लिचिँग पावडर मिसळा.
आता ही बाटली सुर्यप्रकाशात ५ तास
घराच्या छतावर ठेवा जसा अंधार होईल
तसा या पाण्याने शोषलेले सुर्यकिरणांचे परावर्तन
होईल आणि ब्लबसारखा उजेड होईल
आणि याचा उजेड ५५ वँट ब्लब एवढा असतो आणि हे पाणी किमान ८ ते १० तास निरंतर उजेड निर्माण करते. हे पाणी पुन्हा पुन्हा वापरता येते.
शेयर करायला विसरु नका..
Thursday, 2 December 2021
3/12&4/12 mitting
Principal,DIET, Nanded is inviting you in a zoom online training....
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्ष संस्था,नांदेड आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने*....
*विषय :समग्र शिक्षा अंतर्गत वयानुरूप समकक्ष वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन - अध्यापनासाठी शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण*
*Date : December 03 and 04, 2021*
*Time : 10:30 AM Mumbai, Kolkata, New Delhi*
*(दोन्ही दिवसासाठी एकच लिंक आहे)*
Join Zoom Meeting link
https://zoom.us/j/6100358986?pwd=S2pINWMzeVMwSDhpOHQ0OHdyNWxkdz09
( उपरोक्त झुम लिंक द्वारे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, प्रमुख पाहुणे, मान्यवर व सुलभक यांनीच फक्त जॉईन व्हावे )
Meeting ID: 6100358986
Passcode: 123
*नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विषय साधन व्यक्ती, विषय तज्ज्ञ व विशेष शिक्षक सर्व यांनी खालील you tube link वर पूर्णवेळ जॉईन व्हावे.*
http://bit.ly/dietnanded
*( विशेष टिप :- प्रशिक्षण दरम्यान you tube live chat मध्ये शिक्षकांच्या नाव नोंदणी व उपस्थिती साठी लिंक, पुर्व चाचणी साठी लिंक व उत्तर चाचणी साठी लिंक दिली जाणार आहे. या सर्व लिंक शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांनी भरणे अनिवार्य आहे.)*
-प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड आणि शिक्षणाधिकारी, प्राथमिक, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड.
Subscribe to:
Posts (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre

