Monday, 25 March 2019
Ushamaghat
उष्माघात वाढतोय काळजी घ्या - - - - -
शरीरातील पाणी वाढवा - उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.
उपाय ---
१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.
३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.
५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.
७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.
८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.
९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.
१०) प्रत्येक काम सावकाशच करा.
११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.
१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.
१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.
# आरोग्य संदेश #
पाणी प्यावे आवडीने,
आजार पळवा सवडीने.
: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
❄ *उष्ण व थंड पदार्थ* ❄
कलिंगड - थंड
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
आंबा - उष्ण
लिंबू - थंड
कांदा - थंड
आलं/लसूण - उष्ण
काकडी - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो कच्चा - थंड
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मुळा - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
कोथिंबीर/पुदिना - थंड
वांगे - उष्ण
गवार - उष्ण
भेंडी साधी भाजी - थंड
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड
नारळ(शहाळ) पाणी - थंड
मध - उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
तूर डाळ - उष्ण
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण
हळद - उष्ण
चहा - उष्ण
कॉफी - थंड
पनीर - उष्ण
शेवगा उकडलेला - थंड
ज्वारी - थंड
बाजरी/नाचणी -उष्ण
आईस्क्रीम - उष्ण
श्रीखंड/आम्रखंड - उष्ण
दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) - थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
फ्रिज मधिल पाणी - उष्ण
माठातील पाणी - थंड
एरंडेल तेल - अती थंड
तुळस - थंड
तुळशीचे बी - उत्तम थंड
सब्जा बी - उत्तम थंड
नीरा - थंड
मनुका - थंड
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व - उष्ण
कोल्डरिंग सर्व - उष्ण
मास/चिकन/मटण- उष्ण
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड
*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*
✍🏻 आयुर्वेदातून संकलन
Z. P. P. S. Nagazari
Cps. Mandava
Take. Kinwat
deepakdambalekwt@gmail.com
Sunday, 24 March 2019
Friday, 22 March 2019
Matadan duty
मित्रांनो अतिशय महत्वाचा मैसेज
==============
👉🏻@ मतदान केंद्राध्यक्ष:-(PRO)
💫पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.
💫कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुण ताब्यात घेणे.
💫आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.
💫सर्व फॉर्म्स काळजी पूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधिची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे)
💫माँकपोल करणे, टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.
💫सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करने सोबत मतदान प्रतिनिधिची सही घेणे.
💫मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुण, address tag लाऊन दिनांक व सही करुन सील करणे.
............................................
👉🏻@ मतदान अधिकारी:- १ (PO1)
💫नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.
💫ओळख पटवीणे.
💫मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे.
...........................................
👉🏻 @ मतदान अधिकारी:- २ (PO2)
💫 मतदार नोंद वहीत नोंदणी करुण सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे ओळख पुराव्याची नोंद करणे जसे EP/VS/bank passbook no./pan no./ID.
💫डाव्या हाताच्या तर्जनीवर नखाजवळ पक्की शाई लावणे.
💫मतदार चिठ्ठी तयार करणे.
.........................................
👉🏻@ मतदान अधिकारी:-३ ( मतदान सा.केंद्राध्यक:APRO)
💫पक्की शाई तपासणे.
💫मतदार चिठ्ठी जमा करणे.
💫कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे.
👉🏻 शिपाई :-मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.
...............................................
👉🏻@ हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:-
-------------------------
1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.
2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.
3) केंद्राध्यक्ष दैनंदिनी.
4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.
5) PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station)
6) व्हिजिट शीट ( भेट अहवाल)
👉🏻@संविधानिक पाकिटे: (sealed):-(हिरव्या रंगाचे)
------------------------
1) मतदार यादीची चिन्हांकित प्रत.
2) मतदार नोंद वही.
3) व्होटर स्लिप.
4) वापरलेल्या दुबार मतपत्रिका व नमूना 17 बी.
5) न वापरलेल्या मत पत्रिका.
👉🏻 @ असांविधानिक पाकिटे:-
(पिवळया रंगाचे)
-------------------------
1) शिल्लक मतदार यादीची प्रत.
2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.
3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.
4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.
5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.
6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.
7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टँग, स्ट्रिप सील.
8) न वापरलेल्या मतदार स्लीप.
..............................................
@ इतर साहित्याचे पाकिटे:-
( खाकी रंगाचे)
------------------------
इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे.
✨ टीप:- अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा........
👉🏻 प्राँक्सी मतदान :-सेना दलातील व्यक्तीच्या कुटुम्बातील व्यक्तीला दोनदा मतदानाच अधिकार आहे. निवडणुक आयोग असी यादी पुरवितो. अस्या व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.
👉🏻प्रदत्त मते:-एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व पुन्हा त्याच नावावर नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.
Jaldin
*🌈२२ मार्च: जागतिक जलदिन*
*💎 जल प्रतिज्ञा 💎*
*आज मी प्रतिज्ञा करतो की, पाणी हे जीवन असून, त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन…*
*मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही, नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन.*
*पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन.*
*पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव पालन करेन…*
*जय हिंद! जय महाराष्ट्र!!*
*पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिती*
Z. P. P. S. Nagazari
Cps-Mandava
To. Kinwat
deepakdambalekwt@gmail.com
Wednesday, 20 March 2019
Wednesday, 13 March 2019
Jananayak Birasamunda
🤺⚔💂🇬🇧👸🇬🇧💂⚔🤺
➿➿➿➿➿➿➿➿➿
*गाथा बलिदानाची*
➿➿➿➿➿➿➿➿➿
🤺⛓🔗🇮🇳🙅♂🇮🇳🔗⛓🤺
🏹 *जननायक बिरसा मुंडा* 🏹
*जन्म : 15 नोव्हेंबर 1875*
*(उलिहातू - झारखंड)*
*वीरमरण : 9 जून 1900*
*(रांची तुरुंग)*
(वय - 24 वर्षे)
सन १७८९ मध्य कंपनी सरकाने १२५०० चौ. मैल क्षेत्राचा छोटा नागपूर विभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. हा सारा डोंगराळ प्रदेश. त्यातले प्रमुख रहिवासी कोल जमातीचे आदिवासी. ते सारे शेती करीत व जंगलावर निर्भर राहात. त्यांच्या प्रत्येक गावच्या प्रमुखाला मुंडा असे म्हणत. या भागातील शेतीवरील व इतर कारांच्या वसुलीसाठी इंग्रजांनी परप्रांतातील ठेकेदार आणले होते आणि मोगली सत्तेच्या करांच्या दुपटी-तिपटीने या लोकांवर कर लादले होते. हे ठेकेदार मनमानीपणे जादा कर वसूल करीत व ज्यांना कर भरता येत नसत, त्यांच्या जमिनी बळकावीत. त्यामुळे ते बड़े जमीनदार बनले होते. त्यामुळे हजारो आदिवासी भूमिहीन बनले व नगण्य मजुरीवर त्या जमिनदारांच्या जमिनीत मजुरी करू लागले. त्यामुळे ते अन्नाला मोताद झाले. शिवाय जमीनदारांना पालीतून वाहून नेणे, त्यांची सर्वतोपरी विनामूल्य सेवा करणे, त्यांचे चैनबाजीचे सर्व प्रकारचे खर्च भागविणे या आदिवासींना सक्तीचे होऊन बसले. त्यांच्या पूर्वापार न्यायपंचायतीची व्यवस्था इंग्रजांनी मोडून काढली व आपली न्यायदान पध्दती सुरू केली . त्यासाठी वकील आले. मुकादम्यांचा खर्च लोकांना पेलवेनासा झाला. त्यामुळे हे लोक त्रस्त झाले व कंगाल बनले. तशात या भागात ख्रिस्ती मिशनरी आले. त्यांनी प्रलोभने दाखवून या लोकांना ख्रिस्ती बनविण्याचा सपाटा सुरू केला. जो कोणी ख्रिस्ती होई, त्याला करात सूट मिळे व त्यांची जमीनही जप्त होत नसे. त्यामुळे हे हजारो आदिवासी ख्रिस्ती बनले. त्यांचा मूळचा धर्म बुडाला. परिणामतः अनेक आदिवासी बंडखोर बनले व त्यांनी राज अधिकान्यांशी, ठेकेदारांशी, नव्या जमीनदारांशी, ख्रिस्ती मिशन-यांशी अनेक वेळा लढे दिले. पण ते इंग्रजांच्या आधुनिक शस्त्रबळामुळे निष्प्रभ ठरले. हे लढे एकोणीसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालूच राहिले. शेवटचा सर्वात मोठा लढा दिला बिरसा मुंडाने.
बिरसा मुंडा यांचा जन्म उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्याच्या बापाचे नाव सुगना मुंडा. त्यालाही आपल्या सगळ्या कुटुंबियांसह ख्रिस्ती धमांचा स्वीकार करावा लागला होता. त्यामुळेच बिरसाचे प्राथमिक शिक्षण बुर्जू येथील जर्मन मिशनच्या शाळेत सुरू झाले. त्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी चाईबासा येथील लूथरन मिशनच्या शाळेत दाखल झाला. तेथेच त्याला ख्रिस्ती मिशन-यांच्या कारवाया समजून आल्या. त्यामुळे त्याच्या मनात इंग्रज सरकारविषयी अत्यंत तिरस्कार निर्माण झाला. नंतर त्याने आपल्या सर्व कुटुंबियांसह त्या अन्यायी लोकांच्या ख्रिस्ती धर्माचा त्याग केला. पुढे तो तोडन ठाण्याअंतर्गत गोडबेडा येथील आनंद पांडे या गुरुंच्या संपर्कात आला. त्यांनी त्याला रामायण - महाभारतातील कथा शिकविल्या व आयुर्वेदाचेही ज्ञान दिले. त्यांच्यासमोर त्याने आपल्या धरतीला इंग्रजांच्या जुलमी शासनाच्या जाचातून मुक्त करण्याची घोर प्रतिज्ञा केली. बिरसाच्या मनावर हिंदू धर्मातील आदर्श तत्वांचा प्रभाव पडला व वैष्णव बनला. त्याने शिकार करणे सोडून दिले. आपल्या लोकांच्या मनात नैतिक गुण विकसित करण्यासाठी त्याने गावोगावी दौरे सुरु केले.
बिरसाचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते. गोरापान, अत्यंत तेजस्वी, उंच तगडा, प्रसन्नमुख, डोक्याला फेटा, पायात खडावा असे त्याचे रूप सर्वांनाच आकर्षित करुन घ्यायचे. त्यामुळे त्याच्या समाजाचे लोक भराभर त्याचे अनुयायी बनले. त्यांना तर तो'धरतीचा देवच' वाटायचा. तो सुध्दा लोकांना सांगायचा, " देवपुरूष सिंगबोसाने मला स्वप्नात दर्शन देऊन दिव्य शक्ती दिली आहे. त्या शक्तीच्या बळावर मी आपल्या धरतीला या इंग्रजांच्या व जमीनदारांच्या जुलमी शासनातून मुक्त करणार आहे. तेव्हा लोकांचा त्याच्यावर जागा त्याच्यावर दृढ विश्वास बसला. बिरसालाही वाटायचे,
" मी माझ्या समाजाचा उदारकर्ता म्हणून जन्मास आलो आहे. त्याचे अनुयायी हजारोच्या संख्येने वाढू लागले. त्यांच्यामधून त्याने शेकडो चांगले लढवय्ये निवडून आपले सैन्य सज्ज केले. गया मुंडा या आपल्या जिवलग मित्राला त्याने आपला सेनापती म्हणून नियुक्त केले.
सर्वांनी आपल्या समाजावर इंग्रज अधिका-यांकडून, ख्रिस्ती मिशन-यांकडून, जमीनदारांकडून व ठेकेदाराकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मरेपर्यंत लढा देण्याची प्रतिज्ञा केली व स्वराज्य स्थापन करण्याचे ठरविले. इंग्रज सरकारला त्यांच्या हालचालीचा सुगावा लागलाच होता. २४ जेगिस्ट १८९५ रोजी रांची जिल्ह्याच्या इंग्रज पोलिस इंस्पेक्टरने अनेक शिपायांसह रात्री बिरसाच्या घरावर छापा टाकून झोपेत असतानाच त्याला आणि त्याच्या काही साथीदारांना अटक केली. बिरसा दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व ५० रु. दंड केला व त्याच्या साथीदाराला प्रत्येकी २०/२० रु. दंड केला.
कैदेतून सुटून आल्यानंतर बिरसाने नव्या जोमाने संघर्ष सुरू केला. इंग्रजांच्या अनेक ठाण्यांवर त्याने हल्ले केले. पराक्रमाची शर्थ केली. पण इंग्रजांच्या बंदूकांपुढे त्यांची परंपरागत हत्यारे निष्प्रभ ठरली. शेकडो कोल जवान मृत्युमुखी पडले. एका लढाईत सेनापती गया मुंडा ठार झाला. बिरसाचा मुक्काम घनदाट जंगलातील टेकड्यांवर गुप्त ठिकाणी असे. त्यामुळे तो इंग्रजांच्या हाती लागणे अशक्यप्राय होते .
परतु घरभेद्यांकडून इंग्रजांना त्याचा सुगावा लागताच त्याला घेरून पकडण्यात आले. त्याच्याबरोबर त्याचे ८० अनुयायीसुद्धा जेरबंद झाले. तेव्हा रांचीच्या इंग्रज जिल्हाधिका-याने बिरसाला जमीनदारी देण्याची लालूच दाखवून त्याने आपला उद्योग सोडून द्यावा, असे सांगितले. पण बिरसाने ते धुडकावले. अखेर तुरुंगात त्याचे फार हाल करण्यात आले आणि विष देऊन मारण्यात आले. बिरसा पटकीमुळे मेला, असे इंग्रज सरकारने खोटेच जाहीर केले. त्याच्या अनुयायांनाही जबर शिक्षा ठोठावण्यात आल्या व बिरसाने छोटा नागपूरमध्ये स्वातंत्र्यासाठी आरंभिलेला लढा चिरडून टाकण्यात आला.
अशारीतीने कोल समाजाचा हा 'धरतीचा देव ' बिरसा मुंडा जानेवारी १९०० मध्ये त्या धरतीच्या कुशीतच विसावले.
बिरसा मुंडा हे आदिवासी क्रांतिकारक होते. बिरसा मुंडा यांना *जननायक* हा किताब लोकांनी बहाल केला. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. ते एकटेच क्रांतिकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने डाक तिकीट जारी केले असून झारखंड मधील रांची येथे स्मारक बांधण्यात आलेले आहे.
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *स्वातंत्र्य वेदीवर शहीद झालेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन*🙏
deepakdambalekwt@gmail.com
Monday, 11 March 2019
Shambhuraje
11 मार्च
शंभूराजे बलिदान दिन
शंभुराजे..... एक वादळी आयुष्य....
संभाजी महाराजांचे 32 वर्षांचे आयुष्य अनेक वादळांनी भरलेलं होत... परंतु अश्या सगळ्याचं वादळांना कायम झुंज देत ते लढत राहिले...म्हणूनच इतिहास त्यांना, "सर्जा" आणि "रौद्रशंभू" सारख्या नावांनी ओळखतो...शिवराय आणि सईबाईंच्या संसारवेलीवर "शंभू" नावाचे "सूर्यफुल" जन्माला आले.. हो, हो त्यांना सूर्यफुलच म्हणावे लागेल... कारण त्यांच्यात जशी सूर्याची आग आणि तेजस्वीपणा होता.... तसेच फुलासारखे कोमल कवीचे हृदय, कविमन सुद्धा होते...असे हे सूर्यफुल अजाणते पणाच्या वयातच आपल्या आईच्या मायेला पारखे झाले... हा होता नियतीचा पहिला आघात...जिजाऊ मांसाहेबांच्या छत्रछायेखाली, आणि शिवरायांच्या, महाराजांच्या सोबतीत शंभूराजे मोठे झाले...छत्रपतींचेच संस्कार त्यांच्यावर झालेलं... मग मावळ्यांच्या सोबतीला ते कसे पारखे होतील ??? लहानपणापासूनच शंभूराजेंना, रयतेची मावळ्यांची ओढ होती... त्यातूनच रायाप्पा महार सारखे जिवलग हिरे ह्याच मावळ खोर्यातून त्यांनी निवडले होते...वाढत्या वयाच्या तिप्पट वेगाने, मनाने आणि मेंदूने शंभूराजे वाढत होते... ज्या वयात मुलं खेळ, आणि बाजारगप्पा मध्ये रमतात... त्या वयात शंभू राजांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहून सगळ्यांना अवाक करून सोडले होते... नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक या ग्रंथांची सुद्धा त्यांनी निर्मिती केली..त्यांची समशेरीवरची पकड... त्यांच्यातल्या योद्ध्याची जाणीव करून द्यायची.... त्यांनी घोड्यावरची मांड ठोकून बसण्याची पद्धत त्यांच्यातल्या वायुवेगाची चुणूक दाखवायची... त्यांनी घोड्यांचा वापर फक्त युद्धासाठी केला नाही तर त्याचे अश्वप्रेम सुद्धा त्याच तोडीचे होते...आई नकळत्या वयात गेल्यानंतर, जिजाउंच्या मायेची पाखर त्यांच्यावर होती,,,, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसात हि मायेची पाखर सुद्धा हरपली...
हा होता नियतीचा दुसरा आघात...
यानंतर अनेक राजकारणी आघात सुद्धा त्यांनी सोसले पण ते खंबीरपणे उभे राहिले... पण जेव्हा शिवरायांचे निधन झाले... तेव्हा त्यांचा उरला सुरला भक्कम आधार सुद्धा नाहीसा झाला... आणि ते पूर्ण खचून गेले... पण त्यांच्या या मनावरच्या आघाताचा त्यांनी स्वराज्यावर परिणाम होऊ दिला नाही....
रौद्रशंभू, दुप्पट तेजाने उजळून निघाले... एकाच वेळी पाच पाच शाह्या बरोबर गद्दार ब्राम्हण मंत्र्यांचा स्वराज्यद्रोह मोडून काढण्यासाठी ते जोमाने उभे राहिले.... त्या दरम्यान त्यांच्या आयुष्यात, बुऱ्हाणपूर वरील छापा, मुरुडजंजिरा, आरमार उभारणी, यासारखी अनेक आव्हाने आणि घटना घडून गेल्या...केवळ ९ वर्षाच्या कारकिर्दीत, स्वराज्यातील एकही किल्ला वैऱ्यांच्या ओटीत त्यांनी पडू दिला नाही. शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली; पण महासंकटांच्या दर्यातही आपल्या पित्याचे एकही जहाज बुडू दिले नाही
औरंगजेबाच्या 7 लाखाच्या सेना सागराला महाराष्ट्राच पाणी पाजल.....
मातीसाठी लढलेल्या ह्या राजाने मातीसाठी आपला देह ठेवला... स्वराज्यासाठी आपल्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे करून मृत्यूला मिठी मारली...त्यांना धर्मविर म्हणुन त्यांचे बलीदान व्यर्थ ठरवु नका...
ते "शिवपुत्र" म्हणून जन्माला आले...
"सिंहाचा छावा" बनून जगले...
सर्व जाती धर्माच्या रयतेला पोटाशी धरले.....
सर्वश्रेष्ठ मराठा पुत्र असलेल्या
स्वराज्याच्या ह्या दुसऱ्या रणधुरंधर छत्रपती , राजबिंड्या वादळास
११मार्च बलिदान दिनि
माझा मानाचा मुजरा...
जय जय रौद्रशंभो !!
जय जिजाऊ।जय शिवराय।।
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳jai shambhuraje
deepakdambalekwt@gmail.com
Friday, 8 March 2019
Subscribe to:
Posts (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre