Youtube

Youtube
Chanel

Friday, 22 March 2019

Matadan duty

मित्रांनो अतिशय महत्वाचा मैसेज ============== 👉🏻@ मतदान केंद्राध्यक्ष:-(PRO) 💫पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो. 💫कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुण ताब्यात घेणे. 💫आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे. 💫सर्व फॉर्म्स काळजी पूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधिची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे) 💫माँकपोल करणे, टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे. 💫सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करने सोबत मतदान प्रतिनिधिची सही घेणे. 💫मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुण, address tag लाऊन दिनांक व सही करुन सील करणे. ............................................ 👉🏻@ मतदान अधिकारी:- १ (PO1) 💫नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे. 💫ओळख पटवीणे. 💫मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे. ........................................... 👉🏻 @ मतदान अधिकारी:- २ (PO2) 💫 मतदार नोंद वहीत नोंदणी करुण सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे ओळख पुराव्याची नोंद करणे जसे EP/VS/bank passbook no./pan no./ID. 💫डाव्या हाताच्या तर्जनीवर नखाजवळ पक्की शाई लावणे. 💫मतदार चिठ्ठी तयार करणे. ......................................... 👉🏻@ मतदान अधिकारी:-३ ( मतदान सा.केंद्राध्यक:APRO) 💫पक्की शाई तपासणे. 💫मतदार चिठ्ठी जमा करणे. 💫कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे. 👉🏻 शिपाई :-मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे. ............................................... 👉🏻@ हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:- ------------------------- 1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब. 2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल. 3) केंद्राध्यक्ष दैनंदिनी. 4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल. 5) PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station) 6) व्हिजिट शीट ( भेट अहवाल) 👉🏻@संविधानिक पाकिटे: (sealed):-(हिरव्या रंगाचे) ------------------------ 1) मतदार यादीची चिन्हांकित प्रत. 2) मतदार नोंद वही. 3) व्होटर स्लिप. 4) वापरलेल्या दुबार मतपत्रिका व नमूना 17 बी. 5) न वापरलेल्या मत पत्रिका. 👉🏻 @ असांविधानिक पाकिटे:- (पिवळया रंगाचे) ------------------------- 1) शिल्लक मतदार यादीची प्रत. 2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र. 3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा. 4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र. 5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा. 6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा. 7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टँग, स्ट्रिप सील. 8) न वापरलेल्या मतदार स्लीप. .............................................. @ इतर साहित्याचे पाकिटे:- ( खाकी रंगाचे) ------------------------ इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे. ✨ टीप:- अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा........ 👉🏻 प्राँक्सी मतदान :-सेना दलातील व्यक्तीच्या कुटुम्बातील व्यक्तीला दोनदा मतदानाच अधिकार आहे. निवडणुक आयोग असी यादी पुरवितो. अस्या व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे. 👉🏻प्रदत्त मते:-एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व पुन्हा त्याच नावावर नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025