किनवट : भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्षे व सुप्रसिध्द समाजसेवक, आदरणीय “यदुनाथजी थत्ते” यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने 40 वर्षापूर्वी त्यांनीच लिहिलेल्या (पुनर्मुद्रीत) “प्रतिज्ञा” पुस्तकाचे प्रकाशन दि. 25 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आले. प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अशोक बेलखोडे, किनवटचे माजी नगराध्यक्ष इसाखान सरदार खान, अ.नि.स. महाराष्ट्रचे प्रधान सचिव माधाव बावगे, जेष्ठ समिक्षक रामप्रसाद तौर यांची उपस्थिती होती.
यदुनाथजी थत्ते हे स्वातंत्र्य सेनानी होते, ते लेखक होते, विज्ञान व बालसाहित्यातील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. साधना साप्ताहिकाचे ते दिर्घकाळ संपादक होते. विज्ञान व बालसाहित्यीक असलेल्या यदुनाथजींचे युवक व शालेय विद्यार्थ्यांशी संवाद करणे हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. आंतरभारती सारखा प्रकल्प त्यांनी सुरू केला होता त्यातुन भारताच्या विविध भाषा युवकांनी शिकाव्यात, संवाद साधावा व राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळावे अशी त्यांची भावना होती. शाळेत विद्यार्थी रोज घेत असलेली प्रतिज्ञा त्यांना शिक्षकांनी समजावून सांगितली पाहीजे, असे यदुनाथजींना वाटायचे. साधारण 40 वर्षापूर्वी या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली होती. छात्रभारती व भारत जोडो युवा अकादमी किनवट यांनी हे पुस्तक प्रकाशीत केले. आतापर्यंत हे पुस्तक 20-25 वेळा पुनर्मुद्रीत करण्यात आले. अशा या पुस्तकाचे प्रकाशन “साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या वर्धापन” दिनानिमीत्त आयोजीलेल्या आदरणीय बाबा आमटे स्मृती व्याख्यानमाले प्रसंगी करणयात आले.
या प्रसंगी डॉ. अशोक बेलखोडे यांनी या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगून प्रत्येक शिक्षकाणे हे पुस्तक वाचावे व संग्रही ठेवावे असे आवाहन केले. व्यासपीठाला डॉ. अंबादास कांबळे विचारपीठ, तर कार्यक्रम परिसरास सेवादलाचे विश्वस्त कै. सदाशिवराव पाटील यांचे व सभामंडपाला एस. एन. सुब्बारावजी यांचे नाव देण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष, के. मुर्ती, श्रीरंग भुतडा, अनिल दरेकर – लातूर, विनायकराव पाटील, अतुल बडवे, तुलसीदास शिंदे, नविन राठोड, प्रा. डॉ. पंजाब शेरे, प्रा. सुलोचना जाधव, प्रा. डॉ. किरण आयनेनवार, प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड, दिपक डंबाळे यांच्यासह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संचालित, कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, बळीराम पाटील, सरस्वती महाविद्यालयातील युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे यांनी केले.
No comments:
Post a Comment