नवोपक्रमांचे नेतृत्व5
शालेय बदलांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी नवोपक्रम हे सर्वात व्यावहारिक साधन आहे.नवोपक्रम शाळाप्रमुख, शिक्षक व विद्यार्थ्यांना जोखीम घेऊन निर्णयक्षमता वापरण्याकरीता चौकटी बाहेर जाऊन समस्या,आव्हानेसोडविण्याची संधी देतात. नवोपक्रम शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात व ‘होय मी करु शकतो’, अशी वृत्ती विकसित करतात. नवोपक्रमाचा उपयोग शाळेमध्ये सर्वसमावेशकता विकसित करण्याकरिता होऊ शकतो.नवोपक्रमाचा उपयोग करणार्या शाळेचा प्रवास Good-to-Great-to-Innovate असा म्हणता येईल. शाळांना शिक्षणासाठी नवोपक्रमाचे केंद्र बनविण्याकरिता तसेच नवोपक्रमाची संस्कृती तयार करण्याकरिता शाळाप्रमुखांची भुमिका महत्त्वाची आहे. या दिशेने प्रवासाला प्रारंभ करण्यासाठी तसेच शाळेच्या सुधारण्यासाठी नवोपक्रमाचा अर्थ, व्याप्ती व महत्व समजून घेणे आवश्यक आहे.
अध्ययन निष्पत्ती - हा कोर्स केल्यानंतर आपण सक्षम व्हाल
बदलला नवोपक्रम संबोधण्यासाठीचेनिकष समजून घेणे
वर्ग व शाळा पातळीवर नवोपक्रम सुरु करून टिकवून ठेवण्याचा दृष्टिकोन विकसित करणे.
नवोपक्रमाची सखोल आंतरदृष्टी विकसित होणे.
घटक :
नवोपक्रमाची समज .
वर्ग स्तरावरील नवोपक्रम
शाळा स्तरावरील नवोपक्रम
नवोपक्रमाबद्दल अधिक जाणणे.
कालावधी :3 तास
मुल्यांकन आणि अभिप्राय पध्दत : वैयक्तिक चिंतन आणि बहूपर्यायी प्रश्न
कोर्स टीचर : डॉ. एन. मैथीली
No comments:
Post a Comment