कोर्स 4
संघ बांधणी आणि नेतृत्व
प्रस्तावना
सामायिक ध्येय प्राप्ती करिता संघातील सर्व सदस्यांनी एकमेकांना सहकार्य करून प्रयत्न करणे आवश्यक आहे.संघ बांधणी व नेतृत्व करताना संभाव्य विचारांचे अन्वेषण, शोध करणे आवश्यक असते. जेव्हा पूरक वैयक्तिक सामर्थ्यासह लोकांचा समूह लक्ष केंद्रित कामगिरीचा परिणाम साध्य करण्यासाठी वचनबध्द असतो तेव्हा संघ बांधणी प्रक्रियेला सुरवात होते. ’जर मी केले तर काय....?’( what if I...?) ते ‘आम्ही केले तर काय...?’(what if we...?) असा रोमांचक प्रवास करण्याविषयी तुम्ही विचार करू शकता. नेतृत्व,विशेषतःशाळेतील शिक्षणाचे नेते होणे म्हणजे विविध पद्धतीने नेतृत्वाचा अभ्यास करणे होय.नेतृत्व करण्यामध्ये काही इतरही बाबींचा समावेश होतो, जसे मार्गदर्शन करणे,संघ बांधणी आणि नेतृत्व करणे,कार्यभार स्वीकारणे आणि प्रभाव पाडणे. एक नेता व्यक्ती, संघ आणि कार्य यामध्ये प्रभावीपणे समन्वय ठेवण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी अवश्यक असतो. बहुंताश वेळा असे जाणवले की, एकटी व्यक्ती समस्या सोडवण्यास असमर्थ ठरते. म्हणून शिक्षण आणि इतर क्षेत्रात सुधारणा करण्याकरिता आणि सामुहिक सहभागाचे आयोजन करण्यासाठी काही प्रभावी रणनीती म्हणून संघ अध्ययन,नेटवर्क आणि सह्योगात्मक बांधिलकी उदयास येत आहे. संघबांधणी आणि संघनेतृत्व करण्यासाठी तुम्हाला संघाची संकल्पना ओळख, संघ विकासाच्या विविध टप्प्यांचा शोध घेणे आणि आपल्या शाळेत हेतुपूर्ण संवादाच्या संधी शोधण्यासाठी आपणास प्रोत्साहित केले जाते.
अध्ययन निष्पत्ती :-
हा कोर्स केल्यानंतर आपण सक्षम व्हाल -
संघाच्या मूलभूत गोष्टी आणि त्यांचे महत्त्व समजेल.
संघ बांधणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांची जाणीव होईल.
शाळा सुधारण्याकरिता परिणामकारक संघ म्हणून कर्मचारी सभेत पुढाकार घेणे.
घटक :
संघ समजूण घेणे.
संघ बांधणीची प्रक्रीया.
संघ नेतृत्व – विकसनशील कर्मचारी सभा.
No comments:
Post a Comment