कोर्स 3
अध्यापन प्रक्रियेचे परिवर्तन
प्रस्तावना
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया हा एक प्रमुख भाग आहे, कारण आपण विद्यालयामध्ये जे कार्य करतो ते अध्ययन व अध्यापनाभोवती फिरत असते. विद्यालयाचा प्रमुख या नात्याने आपली प्रमुख जबाबदारी म्हणजे विद्यार्थ्यांची यशप्राप्ती होय. हा कोर्स यातील विविध घटकांद्वारे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेचे रुपांतरण करण्यासाठी तुमच्या शाळेचे नेतृत्वकर्ता कसे बनावे याची समज विकसित होण्याकरिता तुम्हास सक्षम करेल. ज्याद्वारे आपण विद्यालयाच्या नेतृत्वाचे रूपांतरण कराल. या कोर्समध्ये खालील विविध मुद्यांचा अतंर्भाव आहे. जसे- शिक्षणाच्या उद्दिष्टांचे चिंतन, चिकित्सा आणि सृजनशीलता वाढीसाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देणे, अध्ययनाचे सुलभक म्हणून शिक्षक, शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाची गरज आणि शिक्षकांचे व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी विविध योजना इ. या बाबींच्या मदतीने शाळा एक अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेला वाव देणारे एक ठिकाण म्हणून शाळा या संकल्पनेला समजण्यास मदत करते. त्याचबरोबर वर्गातंर्गत प्रक्रियेला सर्जनशील व विद्यार्थी केंद्रित करण्यास सक्षम करतो. हा कोर्स तुम्हास चिंतन, विश्लेषण आणि तुमच्याबद्दल सखोल विचार करण्यास, तसेच तुमच्या शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांबद्दल अधिक सखोल विचार करण्यास भाग पाडतो. जेणेकरुन शाळा ही विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार सक्षम होण्यास आणि आनंद देणारे ठिकाण बनण्याच्या मुख्य उद्देशाकडे घेऊन जाते.
अध्ययन निष्पत्ती :-
हा कोर्स केल्यानंतर आपण सक्षम व्हाल -
शिक्षणाचा हेतू समजणे.
पअध्यापनाच्या नावीन्यपूर्ण पध्दतींचे आकलन व उपयोजन करणे.
वर्गांतर्गत प्रक्रियेचा प्रभाव वृद्धिंगत होण्यासाठी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाकरिता योजनांचे आकलन व उपयोजन करणे.
घटक :
शिक्षणाचा हेतू
बालकेंद्रित अध्यापनशास्त्राचे आकलन
एक व्यावसायिक म्हणून शिक्षकांचा विकास
वर्गांतर्गत प्रक्रियेचा प्रभाव वृद्धिंगत करणे.
कालावधी :6 तासे
अभ्यास आणि मूल्यांकन पध्दती :वैयक्तिक चिंतन आणि बहुपर्यायी प्रश्न
कोर्स अध्यापिका::डॉ. सुबिता जी.व्ही
No comments:
Post a Comment