Youtube

Youtube
Chanel

Monday, 14 March 2022

course 2

कोर्स 2

‘स्व’ चा विकास

प्रस्तावना

प्रस्तुत क्षेत्र हे तुम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित करुन तुमचा दृष्टीकोन आणि क्षमतांबद्दलची जाणीव करुन देते. तुमचा आत्मविश्र्वास अधिक विकसित करण्यास समर्थ करतो. तुम्ही 'स्वतःच्या आत' आणि 'स्वतःच्या बाहेर' बदल घडवून आणल्यास तुमचा आत्मविश्वास विकसित होतो. स्वअध्ययनाचा भाग म्हणून ' सखोल चिंतनाचा ' सराव सुरु करण्यास मदत करुन आम्ही ते शक्य करतो. याद्वारे तुम्ही विचार करु शकता, प्रश्न विचारु शकता, तुमच्या दृष्टीकोन आणि कृतीबद्दल पुनर्विचार करु शकता आणि एक प्रभावशाली नेता बनण्यासाठी स्वतःमध्ये अपेक्षित बदल घडवून आणू शकता. विशेषतः जेव्हा तुम्हाला एखाद्या समस्येला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुमचा “होय, मी हे करु शकतो” या दृष्टीकोनापर्यंत बदल करण्याची ही प्रक्रिया आहे आणि हा बदल होवू शकतो याचा आम्हाला विश्र्वास आहे. यातून शाळेत परिवर्तन घडविणारे नेते म्हणून तुम्ही उदयास येण्यास मदत होईल. तुम्ही स्वतःत बदल घडविण्यास सक्षम झाले तरच तुम्ही स्वतःस एक रोल मॉडेल म्हणून आणि प्रश्न सोडवणारा नेता म्हणून स्वतःला सादर करुन इतरांना प्रभावित करु शकतात. शालेय नेतृत्वाच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होण्यासाठी या बाबी आवश्यक आहेत.
अध्ययन निष्पत्ती :-
हा कोर्स केल्यानंतर आपण सक्षम व्हाल -

शालेय नेतृत्वासाठी स्व-विकासाचे महत्व समजून घेणे.

प्रभावी नेता होण्यासाठी ‘स्व’ मध्ये बदल सुरु करणे

वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातल्या समस्यांबद्दल योग्य दृष्टीकोन विकसित करणे.

घटक :

शाळेच्या संदर्भात ‘स्व’

स्व’ ची जाणीव

इतरांच्या संदर्भात ‘स्व’

कालावधी :6 तासे
अभ्यास आणि मूल्यांकन पध्दती :वैयक्तिक चिंतन आणि बहुपर्यायी प्रश्न
कोर्स अध्यापिका::डॉ. चारु स्मिता मलिक
ईमेल :charu@niepa.ac.in

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025