Youtube

Youtube
Chanel

Monday, 14 March 2022

course 8

कोर्स 8

शाळा विकास आराखड्याची रचना व संकलन

प्रस्तावना

मागील कोर्सेसच्या अध्ययनात अध्ययनार्थ्याचे दृढीकरण करण्यास हा कोर्स मदत करेल. तसेच तो त्याच्या शाळेच्या संदर्भात विचार करेल आणि स्वत:ची शाळा सुधारण्यासाठी याचा वापर कसा करावा याचे चिंतन करेल. सदर कोर्स शाळा प्रमुखांना त्यांच्या शाळेच्या परिवर्तनासाठी एक ठोस आणि वास्तववादी शाळा विकास आराखडा विकसित करण्यास देखील मदत करेल. शाळा संबंधित आव्हाने व समस्या निराकरणासाठी योजनांची आखणी करतांना शाळा प्रमुखांनी त्यांचे समपदस्थ सहकारी शाळाप्रमुखांचा एक मूल्यवान स्रोत म्हणून शोधणे व त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेणे याला प्रोत्साहन देण्यासाठी शेवटच्या घटकाची रचना केलेली आहे. ज्याद्वारे समवयीन अध्ययन संस्कृती विकसित होण्यास चालना मिळेल आणि व्यावसायीक अध्ययन समुदायाचे(PLC) बिजारोपण होईल|
अध्ययन निष्पत्ती :-
हा कोर्स केल्यानंतर आपण सक्षम व्हाल -

विविध कोर्सेसमधून घेतलेल्या दैनंदिन अध्ययनावर चिंतन

आपल्या शाळेचे संदर्भ आणि वास्तव यासाठी अन्वयार्थ

शाळा विकास आराखड्याची आखणी

इतर शाळा प्रमुखांच्या उपक्रमातून अध्ययन आणि व्यावसायिक अध्ययन समुदायाचे विकसन

घटक :

चिंतन आणि अध्ययनाचे दृढीकरण

शाळा विकास आराखड्याची आखणी

व्यावसायिक अध्ययन समुदायाची स्थापना

कालावधी :3 तासे
अभ्यास आणि मूल्यांकन पध्दती :वैयक्तिक स्वाध्याय व बहुपर्यायी प्रश्न
कोर्स अध्यापिका::प्रा. रश्मी दिवाण

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025