Youtube

Youtube
Chanel

Monday, 14 March 2022

course 7

कोर्स 7

शालेय प्रशासनाचे नेतृत्व

प्रस्तावना

शालेय नेतृत्व विकास अभ्यासक्रम आणि काही विषय जसे की ज्ञान, प्रशासकीय आणि वित्तीय नियमांचे उपयोजन, शाळेत भौतिक व मानवी स्त्रोतांचे व्यवस्थापन आणि शालेय विकासासाठी माहितीचा वापर हे या महत्वाच्या घटकामध्ये समाविष्ट आहे. या अभ्यासक्रमाचा असा विश्वास आहे की, एक प्रभावी प्रशासक होण्यासाठी एक प्रभावी नेतृत्व असणे आवश्यक बाब ठरते. एका शालेय प्रमुखाकडे नियम व अटींचे योग्य ज्ञान, चिकित्सक निर्णय घेण्याचे कौशल्य, नेतृत्व व शालेय विकासाचे नियोजन एकत्रितरीत्या करण्याकरिता माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचे (ICT) व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे. शालेय नेतृत्व उदयास येण्याकरीता अशा प्रकारचे प्राप्त केलेले ज्ञान आणि कौशल्ये शाळा प्रमुखाला प्रशासकीय कार्ये सहजपणे कार्यान्वित करण्याकरीता अधिक आत्मनिर्भर बनवून दैनंदिन कार्याच्या पलिकडे जाऊन अधिक काम करण्यास वाव मिळतो. सदर अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती व अध्यापन कार्यपध्दती या दोन्हींच्या विकासाकरीता निर्णय घेण्यासाठी माहितीच्या (Data) उपयोग करण्याच्या आकलनावर लक्ष केंद्रीत करतो.
अध्ययन निष्पत्ती :-
हा कोर्स केल्यानंतर आपण सक्षम व्हाल -

शालेय सुधारणांकरीता माहिती (Data) संकलन आणि विश्लेषणाचे महत्व समजेल.

अधिक चांगल्या निष्पत्तीकरीता विद्यार्थी संपादणूक माहितीचे विश्लेषण करू शकाल

शिक्षकांच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणेला मदत करण्यासाठी एकत्रितपणे धोरणे विकसीत करू शकाल

घटक :

सूचक निर्णय क्षमतेकरीता डाटाबेस मॅनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टिमचा उपयोग

कालावधी :3 तासे
अभ्यास आणि मूल्यांकन पध्दती :वैयक्तिक स्वाध्याय व बहुपर्यायी प्रश्न
कोर्स अध्यापिका::डॉ. चारू स्मिता मलीक

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025