🚩 *महाशिवरात्रीनिमित्त देशातील 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊयात!*
*(महत्वपूर्ण आणि फायदेशीर माहिती वाचा एका क्लिकवर)* :
💁♂️ जगभरातील समस्त शिव भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री महादेवांच्या भारतातील प्रमुख 12 मंदिरांना 12 ज्योतिर्लिंगे म्हणतात. त्यावर एक नजर टाकूयात...
1. *सोमनाथ (गुजरात - वेरावळ)* : गुजरातमध्ये सौराष्ट्रात वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील प्राचीन तीर्थस्थळांत या मंदिराचा समावेश होतो.
2. *मल्लिकार्जुन(आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)* : गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गावाला मोटारीने जावे लागते.
3. *महाकाळेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)* : हे मंदिर मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यामध्ये आहे. हे ज्योतिर्लिंग व स्वयंभू असून रुद्रसागर तलावाच्या काठावर उज्जैन शहरात आहे.
4. *ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)* : ओंकारेश्वर मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे.
5. *परळी वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)* : हे ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
6. *भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)* : भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 100 किलोमीटरवर आहे.मंदिराबाबत असे म्हटले जाते की, 18 व्या शतकात नाना फडणीसांनी हे मंदिर बांधलेले आहे.
7. *रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)* : हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावरील एक शिवमंदिर आहे. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते.
8. *नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ)* : सध्याच्या हिंगोली जिल्ह्यात, औंढा नागनाथ हे स्थान आहे. हेमाडपंती शैलीचे हे नागनाथाचे मंदिर आहे.
9. *विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)* : विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिर होते.
10. *त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)* : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील
12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे.
11. *केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)* : हे ज्योतिर्लिंग हिमालयात उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी आहे.
12. *घृष्णेश्वर (महाराष्ट्र -औरंगाबाद)* : बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्र्वराचे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. हे औरंगाबाद जिल्ह्यात असून वेरूळपासून अगदी जवळ आह
No comments:
Post a Comment