○●○●○●○●○
*निपुण भारत - अध्ययन अभ्यास सर्वेक्षण 2022-23 काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे*
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे.
निपुण भारत - अध्ययन अभ्यास सर्वेक्षण 2022-23
त्यासाठी भारत सरकारने निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक क्षमता सन 2026-27 पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सदर लक्ष्य गाठण्यासाठी इयत्ता व अध्ययन निष्पत्तीनिहाय बेंचमार्क निर्धारित करण्यात आलेले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
निपुण भारत अभियानाच्या लक्ष्यपूर्तीसाठी विद्यार्थ्यांच्या संपादणूकीच्या सद्यस्थितीची वेळोवेळी पडताळणी होणे आवश्यक आहे, याकरिता राज्य स्तरावरून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता दुसरी ते पाचवी साठी निपुण अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यात येत आहे.
☀निपुण भारत *अध्ययन अभ्यास सर्वेक्षण उद्दिष्टे:-*
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता निहाय व विषय निहाय अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त/ संपादित केलेल्या आहेत हे पडताळणे व त्यानुसार शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे.
☀निपुण भारत-अध्ययन अभ्यास सर्वेक्षण कार्यवाही बाबत काही प्रश्न उत्तरे:-
प्रश्न:- *निपुण भारत-अध्ययन अभ्यास सर्वेक्षण कोणत्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे?*
उत्तर:- फक्त स्टेट बोर्ड च्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी (सर्व व्यवस्थापनाच्या , सर्व माध्यमाच्या शाळेंनी)
प्रश्न:- *सदर सर्वेक्षण कोण करणार?*
उत्तर:- सदर सर्वेक्षण हे सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांनी करावयाचे आहे.
प्रश्न:- *सदर सर्वेक्षण कोणत्या इयत्तेसाठी आहे?*
उत्तर:- इयत्ता 2 री ते 5 वी साठी
प्रश्न:- *निपुण भारत-अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधने कसे तयार करण्यात आलेले आहे?*
उत्तर:- विद्यार्थी शिकत असलेल्या पूर्वीच्या/पाठीमागील इयत्तेच्या अध्ययन निष्पत्ती वर आधारित
प्रश्न:- *निपुण भारत-अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधनाच्या किती प्रिंट काढाव्या?*
उत्तर:- इयत्ता 2 री ते 5 वी ला प्रथम भाषा, गणित, परिसर अभ्यास, तृतीय भाषा या विषयाच्या शिक्षकांनी आपण अध्यापन करीत असलेल्या विषयाच्या सर्वेक्षण साधनाची एकच प्रिंट अथवा फोटो कॉपी करण्यात यावी. प्रती विद्यार्थी सर्वेक्षण साधन प्रिंट अथवा फोटो कॉपी करण्याची गरज नाही.
प्रश्न:- *सदर सर्वेक्षणाचे स्वरूप मौखिक आहे की लेखी?*
उत्तर:- सदर सर्वेक्षण प्रत्येक विद्यार्थी निहाय मौखिक स्वरूपात घ्यावयाचे आहे. मात्र काही प्रश्नांच्या /कृतीच्या बाबतीत लेखी प्रतिसाद घ्यावयाचा असल्यास तो विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये किंवा आखीव ताव/पेपर वर घ्यावा.
प्रश्न :- *प्रति विद्यार्थी कालावधी किती?*
उत्तर:- प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षकांनी स्वतंत्र सर्वेक्षण करावयाचे आहे. यासाठी प्रती विद्यार्थी, प्रती विषय सर्वेक्षण कालावधी सर्वसाधारणपणे १० ते १५ मिनिटाच्या असणार आहे. मात्र यामध्ये विद्यार्थी प्रतिसादनुसार लवचिकता असेल.
प्रश्न:- *एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास काय करावे?*
उत्तर:- एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी सर्वेक्षण करण्यात यावे.
प्रश्न:- *सदर सर्वेक्षण करताना कोणती काळजी घ्यावी?*
उत्तर:- निपुण भारत-अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करतांना वर्गात तणाव मुक्त वातावरण राहील याची काळजी घ्यावी.
प्रश्न:- *सर्वेक्षणास सुरुवात करण्यापूर्वी काय तयारी असावी?*
उत्तर:- इयत्ता व विषयनिहाय आवश्यक असलेले साहित्य शिक्षकांनी उपलब्ध करून ठेवावे.
प्रश्न:- *दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण कसे करावे?*
उत्तर:- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
प्रश्न:- *सदर सर्वेक्षण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?*
उत्तर:- सर्वेक्षण साधनातील प्रश्न विद्यार्थ्याला क्रमवार विचारावे अथवा सोडवण्यास सांगावे. सर्वेक्षण साधनातील दिलेले प्रश्न/कृती चित्रे, उदाहरणे, परिच्छेद इत्यादी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना दाखवावेत किंवा फलकावर लिहावेत.
विद्यार्थ्याला प्रश्न/कृती सोडवण्यासाठी अथवा उत्तराचा प्रतिसाद देण्यासाठी पुरेसा वेळ द्या. विद्यार्थी काहीच प्रतिसाद देत नसेल तर पुढील प्रश्नाकडे/कृतीकडे जावे.
प्रश्न:- *मूल्यांकन रुब्रिक म्हणजे काय?*
उत्तर:- निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधनामध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन करण्यासाठी "मूल्यांकन रुब्रिक" देण्यात आलेले आहे.
प्रश्न:- *निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकात नोंद कश्या प्रकारे घ्याव्यात?*
उत्तर:- प्रत्येक विद्यार्थ्याला विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीवरील प्रत्येक प्रश्नाच्या/कृतीच्या प्रतिसादाची नोंद निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामध्ये शिक्षकांनी करावी. ही नोंद अध्ययन निष्पत्तीनिहाय प्रश्न विचारून आलेल्या प्रतिसादानुसार "मूल्यांकन रुब्रिक" मधील निकषानुसार त्या त्या वेळी करावी. सोबत निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रक जोडण्यात आलेले आहे. शिक्षकांनी प्रत्येक विषयासाठी आवश्यकतेनुसार प्रिंट अथवा फोटो कॉपी काढाव्यात अथवा असा नमुना आपण स्वतः तयार करावा.
प्रश्न:- *विद्यार्थ्यांच्या संपादणूकीचे वर्गीकरण कसे करावे?*
उत्तर:- “मूल्यांकन रुब्रिक" मध्ये प्रामुख्याने चार मूल्यांकन निकष देण्यात आलेले आहेत. सर्वेक्षण साधन मधील अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नाच्या प्रतिसादावरून विद्यार्थ्याच्या संपादणूकीचे वर्गीकरण “मूल्यांकन रुब्रिक” नुसार श्रेणी -३, श्रेणी - २, श्रेणी - १, श्रेणी - ० यापैकी एका श्रेणीमध्ये होईल.
प्रत्येक प्रश्नावरील विद्यार्थी प्रतिसादानंतर शिक्षकांनी मूल्यांकन रुब्रिक निकषानुसार श्रेणी निश्चित केल्यानंतर निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामध्ये शिक्षकांनी योग्य त्या ठिकाणी √ अशी टिक/खूण करावी.
उदा. निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद नमुना प्रपत्र
प्रश्न:- *विद्यार्थी संपादणूक स्तर कसे निश्चित करावे?*
उत्तर:- निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधनानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या श्रेणी नोंद पत्रकामध्ये करून झाल्यानंतर खालीलप्रमाणे विद्यार्थी संपादणूक स्तर निश्चित होईल.
प्रश्न:- *विद्यार्थी संपादणूक स्तर चा नेमका अर्थ काय?*
उत्तर:- 1. *प्रगत* (Advanced)
या स्तरामधील विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती पूर्ण संपादित / प्राप्त केलेल्या असतात. अशा विद्यार्थ्यामध्ये उच्च विश्लेषण क्षमता, तार्किक क्षमता, चिकित्सक विचार, प्रभावी संप्रेषण कौशल्य, स्वतंत्र विचार क्षमता, सृजनशीलता असते. असे विद्यार्थी काही एकत्रित संकल्पना अथवा कल्पना याद्वारे नवीन ज्ञानाची निर्मिती करतात. या स्तरामधील विद्यार्थी कठीण समस्येचे निराकरण करतात. प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते.
2. *प्रवीण* (Proficient)
या स्तरामधील विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती बऱ्याच प्रमाणात प्राप्त / संपादित केलेल्या असतात. या स्तरावरील विद्यार्थी कमीत कमी निरीक्षणाखाली ते आपले कार्य स्वतंत्रपणे करतात. पद्धतशीरपणे ते आपली समस्या निराकरण करतात. स्वतःच्या कल्पना ते इतरांना स्पष्टपणे सांगतात. कमीत कमी मार्गदनाखाली व पर्यवेक्षणाखाली ते नवीन कल्पना मांडतात किंवा निर्माण करतात.
3. *प्रगतशील* (Basic / Progressive )
या स्तरामधील विद्यार्थ्यांने संबधित विषयाच्या अध्ययन निष्पत्तीमधील किमान ज्ञान व कौशल्ये प्राप्त / संपादित केलेली असतात. हे विद्यार्थी सामान्य सूचनांचे / नियमांचे पालन / अनुकरण करतात. त्यांच्याकडे काही चांगल्या कल्पना असतात. मात्र त्यामध्ये सुसंगतता नसते. अध्ययनाच्या अनेक टप्प्यावर यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. सामान्य समस्या ते तर्काने सोडवू शकतात. या पातळीवरील विद्यार्थी सोप्या भाषेत आपले म्हणणे अभिव्यक्त करतात.
4. *प्रारंभिक* (Below Basic / Beginners)
या स्तरामधील विद्यार्थ्यांच्या संबंधित विषयाच्या अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी ज्ञान व कौशल्ये पुरेशा प्रमाणात प्राप्त / संपादित झालेल्या नसतात. या विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या प्रत्येक टप्प्यावर खूप मार्गदर्शनाची, प्रोत्साहन देण्याची गरज असते.
प्रश्न:- *निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्रकाच्या आधारे शिक्षकांना कोणत्या बाबी समजण्यास मदत होईल?*
उत्तर:- शिक्षकांनी सर्वेक्षण साधनानुसार विद्यार्थी प्रतिसाद घेऊन निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्रकाच्या आधारे शिक्षकांना खालील बाबी समजण्यास मदत होतील.
१) प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त/ संपादित केलेल्या आहेत, हे समजण्यास मदत होईल.
२) शिक्षकांना आपल्या विषयाचा/वर्गाचा सरासरी संपादणूक स्तर समजण्यास मदत होईल.
३) प्रत्येक विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये खालीलपैकी संपादणूकीच्या कोणत्या स्तरावर हे लक्षात येईल.
*प्रगत* (Advanced) (More than expected)
*प्रवीण* (Proficient)- (Age appropriate)
*प्रगतशील* (Basic / Progressive) (Able to do with support)
*प्रारंभिक* (Below Basic / Beginners) (Need lots of support)
३) सर्व विद्यार्थी प्रगत स्तरावर जाण्यासाठी उपचारात्मक अध्यापन नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यासाठी व अध्ययन निष्पत्तीसाठी प्राप्त करण्यासाठी करावे लागणार आहे, हे शिक्षकांना समजणार आहे.
प्रश्न:- *निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण झाल्यानंतर शिक्षकांनी काय करावे?*
उत्तर:- निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्रकाच्या आधारे शिक्षकांनी खालील कार्यवाही करावी.
१) अध्ययन निष्पत्तीनिहाय वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे कोणत्या स्तरात आहेत हे समजल्यानंतर त्याच्या आधारे वर्ग शिक्षकांनी / विषय शिक्षकांनी उपचारात्मक अध्ययन अध्यापन करण्याची योजना आपल्या स्तरावर करणे अपेक्षित आहे. २) शिक्षकांनी प्रत्येक अध्ययन निष्पत्तीमध्ये सर्व विद्यार्थी प्रगत स्तरावर जाण्यासाठी कृती योजना / आराखडा तयार करावा.
३) निपुण भारत अभियान चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकांनी अशाप्रकारे अध्ययन निष्पत्तीनिहाय प्रश्नपत्रिका/चाचण्यांचे विकसन आपल्या स्तरावर करून विद्यार्थी अपेक्षित क्षमता स्तर प्राप्त करतात की नाही याची आपल्या स्तरावर पडताळणी करणे देखील अपेक्षित आहे.
४) निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्रामध्ये विद्यार्थीनिहाय एकत्रित माहिती शाळा मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी इयत्तानिहाय व विषयनिहाय संकलित स्वरुपात शाळास्तरावर ठेवावी. ही माहिती सरळ पोर्टलवर भरणेबाबत यथावकाश सूचना देण्यात येतील.
५) निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद प्रपत्र याची प्रती विद्यार्थीनिहाय माहिती शिक्षकांच्या दप्तरी असणे आवश्यक आहे. पर्यवेक्षीय अधिकारी ज्या वेळी शाळाभेटीला येतील त्यावेळी विद्यार्थी अध्ययन श्रेणी व कृति योजना/ आराखडा याबाबत चर्चा करण्यात यावी.
प्रश्न:- *निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण चे वेळापत्रक काय आहे?*
उत्तर:- प्रस्तावित सर्वेक्षणाचे वेळापत्रक आहे
○●○●○#©®©
*धन्यवाद*🙏