Youtube

Youtube
Chanel

Thursday, 29 December 2022

50वे विज्ञान प्रदर्शन kinwat

*अत्यंत महत्वाचे*
जाक्र. पंसकि/गशिअ/माशावि / 2022
तारीख: 26/12/2022


प्रति,
मुख्याध्यापक / प्राचार्य,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूल, शासकीय आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,
खासगी अनुदानित, विना अनुदानित, स्वंय अर्थसहाय्यित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक (सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व प्रकारच्या ) शाळा ,
ता.किनवट जि. नांदेड

*विषय : 50 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन 2022-23 आयोजित करणे बाबत.*

संदर्भ : मा. शिक्षणाधिकारी (मा). जि.प.नांदेड यांचे पत्र जाक्र. जिपनां/मा-15/5785 दि. 09/12/2022

         उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांचे 50 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. 20 ते 24 फेब्रुवारी 2023 या दरम्यान 5 दिवस कालावधीत ऑफलाईन स्वरुपात घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. यावर्षी एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी प्रोद्योगीकी व खिलोने (TECHNOLOGY AND TOYS) असा निश्चित केला आहे. सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन मुख्य विषयाला अनुसरुन पुढील प्रमाणे एकूण 6 उप विषय निर्धारित केलेले आहेत. 
1. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती (Advancement in Information and communication Technology) 
2. पर्यावरणास अनुकूल सामुग्री (Eco Friendly Matterials)
3.  आरोग्य आणि स्वच्छता. (Health and Cleanliness ) 
4. वाहतूक आणि नवोपक्रम (Trancports and Innovation)
5. पर्यावरणीय चिता (Envornmental Concerns )
6. वर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास (Historical Devolopment With Current Innovation)
7. आमच्यासाठी गणित (Mathematics For Us)

         वरिल उप विषयापैकी कोणत्याही एका उप विषयावर आधारीत तालुकास्तरीय विज्ञान, गणित प्रदर्शन *दि. 07 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मांडवा रोड, किनवट* येथे आयोजित केले आहे. 
          तालुका विज्ञान प्रदर्शनासाठी माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, प्रयोग शाळा सहाय्यक/परिचर आणि उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंत), माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तर (इ.9 वी ते 12 वी पर्यंत) विद्यार्थ्यांनकडून प्रदर्शनीय वस्तु प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प व शास्वत विकासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रत्येक शाळेतून सहभागी करावे.

*अनिल महामुने,*
गट शिक्षणाधिकारी, 
पंचायत समिती, किनवट

*प्रतिलिपी :*
1. मा. शिक्षणाधिकारी (मा), जि.प.नांदेड यांना माहितीस्तव सविनय सादर.
2. शिक्षण विस्तार अधिकारी / केंद्र प्रमुख (सर्व), पंचायत समिती किनवट यांना देऊन कळविण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना हे पत्र पोहचवून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास सहभागी करावे.
3. मुख्याध्यापक, सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मांडवा रोड, किनवट यांना देऊन कळविण्यात येते की, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची पुर्ण तयारी करुन घ्यावी. तसेच सोबत दिलेल्या विज्ञान प्रदर्शन आयोजना बाबातच्या नियमावली नुसार मुल्यमापन करण्याकरिता उप विषयाचे तज्ज्ञ परीक्षक नेमावे. स्पर्धेच्या दिवशी सायंकाळी निकाल या कार्यालयात सादर करावा.

*अनिल महामुने,*
गट शिक्षणाधिकारी, 
पंचायत समिती, किनवट

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025