आज मातृहदयी परमपूज्य साने गुरुजी यांची जयंती. साने गुरुजी म्हणत की मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे.सभोवतालचा सारा संसार सुखी आणि समृद्ध व्हावा,ज्ञान विज्ञान संपन्न आणि कलामय व्हावा, सामर्थ्य संपन्न आणि प्रेममय व्हावा हीच माझी तळमळ आहे. माझे लिहिणे व वाचणे , माझे विचार आणि माझी या एकाच ध्येयासाठी असतात.साने गुरुजींच्या जीवनात मांगल्याचा परिमल भरून राहिला होता. लेखणी आणि वाणी या दोन्हीचा उपयोग त्यांनी जीवनात जे उत्तम उदात्त, सुंदर आहे, त्यांच्या प्रसारासाठी केला. काही शाश्वत मूल्यांसाठी ते जीवन जगले. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात नैतिक मूल्यांचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. या अंधारलेल्या वाटेवर साने गुरुजींच्या जीवनाची, साहित्याची आणि विचारांची पणती आजही आपणाला प्रकाश दाखवीत आहे.त्या प्रकाशाच्या सावलीत आपण राहूनआपल्या जीवनातील अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करूया.
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment