Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 27 April 2021

Kovid लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी?

💉 *kovid 19 लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी.*

 🕹️ *https://selfregistration.cowin.gov.in/* 

👆🏻 *या लिंक वर क्लीक करा.*

▪️ *मोबाईल नंबर रजिस्टर करा व त्यावर आलेला OTP नोंदवा.*
▪️ *आपला आधार क्रमांक नोंदवा.*
▪️ *Gender सिलेक्ट करा.*
▪️ *जन्म वर्ष टाका.*
▪️ *वरील सर्व माहिती रजिस्टर करा.*
▪️ *पिन कोड टाका व त्यानुसार आलेल्या तारखेला लसीकरण schedule करा.*

📲 *आपणांस 2 मेसेजेस येतील त्यातील..*

📲 *पहिला मेसेज* रेफरन्स ld लसीकरण केंद्रावर दाखवायचा आहे. 

📲 *दुसरा मेसेज* कोणत्या तारखेला लसीकरणासाठी जायचे आहे याचा आहे. 

*👆🏻दोन्ही मेसेजेस जतन करुन ठेवा सर्वाना पाठवा.*

🙏🏼🙏🏼🙏🏼🤝🏼💉🤝🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Saturday, 17 April 2021

चंद्र आणि मंगळाचा लपंडाव

🌖🪐 *17 एप्रील रोजी चंद्र मंगळाचा आकाशातील लपंडाव (पिधान) जरूर पहा* - खगोलअभ्यासक हेमंत धानोरकर यांचे आवाहन* 🌎🌙🌗

येत्या १७ एप्रिल २०२१ च्या शनिवारी संध्याकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत आकाशामध्ये चंद्र व मंगळ ग्रहाची विलोभनीय पिधान युती होणार आहे. तरी सर्व 'खगोलप्रेमी' नागरिक, विद्यार्थी , शिक्षक यांनी या पिधान युतीचे निरीक्षण करावे असे अंबाजोगाई येथील  खगोलअभ्यासक हेमंत धानोरकर (भालेराव) यांनी केले आहे. 
*पिधान (Occultation)म्हणजे काय ?*
पृथ्वीभोवती भ्रमण करताना चंद्र आकाशात एका विशिष्ट मार्गाने पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत असतो . ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर चंद्राची आकाशातील जागा रोज बदलत असते. असा प्रवास करताना जेव्हा एखादा ग्रह किंवा तारा चंद्रबिंबाच्या मागे काही वेळासाठी झाकला जातो आणि त्यानंतर काही वेळानंतर चंद्रबिंबाच्या मागून पुन्हा दिसू लागतो, या घटनेला पिधान असं म्हणतात. चंद्र बिंबाच्या मागे रोज अनेक तारे झाकले जातात . पण चंद्रामुळे एखाद्या ग्रहाचे पिधान होणे ही घटना दुर्मिळ असते .  
*17 एप्रीलला नेमकं काय घडेल ?* 
17 एप्रिलच्या संध्याकाळी 5.30 वाजता चंद्राच्या  पुर्वेस असलेला मंगळ ग्रह चंद्राच्या मागे झाकला जाईल आणि नंतर सुमारे दोन तासांनी म्हणजेच सायं. 7.22 वाजता चंद्राकोरीच्या प्रकाशित भागाच्या मागून मंगळ ग्रह परत बाहेर येताना आपल्याला दिसणार आहे.  17 एप्रील रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुर्यप्रकाशामुळे पश्चिम भारतातून आपल्याला चंद्राच्या मागे जाताना मंगळ दिसणार नाही . सायंकाळी  6.30 नंतर सुर्यास्त होईल त्यानंतर सायंकाळी 7 वाजून 22मिनिटांनी चंद्राच्या मागून *लालसर रंगाची चांदणी म्हणजे मंगळ ग्रह* बाहेर येताना दिसेल. पूर्व भारतामध्ये या दोन्ही घटना दिसण्याची शक्यता आहे.

 *मंगळ ग्रहाच्या जवळ चंद्र जाणार आहे का ?*
या घटनेवेळी चंद्र व मंगळ ग्रह अगदी जवळजवळ म्हणजे चिकटल्यासारखे दिसतील . पण चंद्र पृथ्वीपासून अंदाजे 3,97,700 km अंतरावर असेल , तर मंगळ ग्रह पृथ्वीपासून अंदाजे *29 कोटी किमी अंतरावर* असणार आहे . पण पिधानयुतीच्या शेवटच्या अवस्थेत चंद्रबिंबाच्या मागून बाहेर येताना 7.25 वाजता मंगळ ग्रह चंद्रकोरीला अगदी चिकटून असल्यासारखा दिसेल. पण या दोन खगोलीय वस्तूमधे कोट्यावधी किमीचे अंतर असणार आहे हे खगोलप्रेमींनी जरूर लक्षात ठेवावे .

*यासाठी दुर्बीणीची गरज आहे काय?* 
हे पिधान नुसत्या डोळ्यांनी आणि अगदी सहजपणे  पाहता येईल. यासाठी कोणत्याही दुर्बिणीची आवश्यकता नाही. परंतु दुर्बिण किंवा साधी द्विनेत्री (Binacular) वापरून (उपलब्ध असेलच तर )अधिक स्पष्टपणे ही घटना पाहता येऊ शकते . किंवा चांगली लेन्स असलेला कॅमेरा वापरूनही हे दृश्य टिपता येऊ शकते. मोबाईलने फोटो काढण्यात वेळ घालवू नये. या घटनेचे सर्वोत्तम फोटो दुसऱ्या दिवशी नेटवर फ्री मिळतात .
सायंकाळी गच्चीवर बसून सर्व कुटूंबासह या घटनेचे साक्षीदार होण्याची संधी सोडू नये. 

*दुर्बिणीशिवाय आकाशातील कोणत्या गोष्टी पाहता येतात ?* 
कोट्यावधी किमी अंतरावरील 3000 पेक्षा जास्त तारे, बुध -शुक्र-मंगळ-गुरु-शनि  हे पाच ग्रह, अनेक तारकागुच्छ, आपली आकाशगंगा आणि दुसरी गॅलॅक्सी (देवयानी), चंद्रग्रहणे, पिधान, युती, ता-यांच्या पार्श्वभूमीवर ग्रह व चंद्र यांचे भ्रमण , पृथ्वीभोवती फिरणारे कृत्रीम उपग्रह, राशी व नक्षत्रांचे विविध आकार अशा अनेक गोष्टी दुर्बिणीशिवाय नुसत्या डोळ्यांनीही बघता येऊ शकतात. 

*मानवी जीवनावर काही वाईट परिणाम होतील का ?* 
 मंगळ ग्रहाला जोतिषांनी दुष्ट ठरवून बदनाम करून टाकलेलं आहे. परंतु आकाशातील कोणताही ग्रह (विशेषतः मंगळ व शनि) मानवाच्या जीवनात कोणतीही लुडबूड करत नाहीत . कोणतेही ग्रह तारे शुभ /अशुभ नसतात . त्यामुळे या घटनेचे कुणावरही काहीही वाईट /अशुभ परिणाम होणार नाहीत .
17 तारखेला चंद्र व मंगळ हे वृषभ राशीमध्ये असतील त्यामुळे TV चॅनेल्सवर दिवसभर अवैज्ञानिक बडबड करणारे जोतिषी या पिधान युतीची संधी साधून वृषभ राशीच्या लोकांना घाबरवून टाकण्याचा व अनेक पुजापाठ करायला लावण्याचा त्यांचा गोरखधंदा चालू ठेवतील. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून निःशंक मनाने चंद्र-मंगळाचा हा लपंडाव सर्वांनी पहावा . 
 *17 तारखेला आकाशात अजून काय दिसेल ?* 
 हे पिधान पहात असताना आपल्याला अनेक राशी नक्षत्रे पाहायला मिळतील. मृग नक्षत्र, ब्रह्महृदय तारकासमूह, रोहिणी नक्षत्र, कृत्तिका नक्षत्र, व्याध, पुनर्वसू नक्षत्र, प्रश्वा, ध्रुव तारा -सप्तर्षी इत्यादी ठळक तारे व अनेक तारकासमूह सहजपणे बघता येतील. त्यांची ओळख करून घेण्यासाठी मोबाईलमधे एखादे Sky watching app डाऊनलोड करून घ्यावे. *इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानच्या पुस्तकातील शेवटच्या पाठाची मदत घ्यावी*.
तसेच आकाशातून उल्कापात होतानाही दिसतील . पृथ्वीभोवती फिरणारे कृत्रीम उपग्रहांपैकी अनेक उपग्रह ( प्रवास करणाऱ्या चांदण्या ) दिसण्याचीही शक्यता आहे . 
सर्वोत्तम आकाश निरीक्षणासाठी आकाशनिरीक्षणाची आवड , निरभ्र आकाश व शून्य प्रकाश या तीनच गोष्टी आवश्यक असतात.

खगोलअभ्यासक 
हेमंत धानोरकर (भालेराव)
9960096062

Thursday, 15 April 2021

Live class

*जाहीर आवाहन 🙏*

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील इयत्ता 4 थी, 7 वी आणि 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती आधारित live online class*

*5 एप्रिल पासून दररोज*
*वेळ : सकाळी 8.00 ते 9.30*

*विषय :- मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान व सामाजिक शास्त्र*
*या You Tube लिंक वरून जॉईन व्हावे 👇*

 http://bit.ly/dietnanded

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (DIET,Nanded ) नांदेड चे अधिकृत चॅनल

*नांदेड जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, नांदेड जिल्ह्यातील इयत्ता 4 थी, 7 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी डाएट,नांदेडच्या you tube channel वरून दि. 05 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान व सा. शास्त्र या विषयांच्या अध्ययन निष्पत्ती वृद्धिंगत व्हाव्यात यासाठी यावर आधारित प्रत्यक्ष पाठय घटकांवर ऑनलाईन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. *या ऑनलाईन वर्गाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. यामध्ये दर सोमवार व मंगळवार इयत्ता 4 थी, बुधवार व गुरुवार इयत्ता 7 वी आणि शुक्रवार व शनिवार इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांना वेळ सकाळी 8.00 ते 9.30 या वेळेत वर्ग अध्यापन केले जाणार आहे.* काही कारणास्तव या वेळेत आपण जॉईन होऊ शकले नाहीत तर recorded videos डाएट नांदेडच्या you tube channel वर उपलब्ध असतील. परंतु शक्यतो दिलेल्या वेळी व दिवशी आपण live session ला उपस्थित राहून आपल्या शंकांचे समाधान करून घ्यावे.असे आवाहन डाएट संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद, नांदेड यांनी केले आहे.

*पर्यवेक्षकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण यंत्रणेतील संबंधितांनी ही लिंक व पोस्ट जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावी.*

                *विनित*
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड.

Saturday, 10 April 2021

10 ,12 वी परिक्षेला सामोरे जाताना

*सर्वाना नमस्कार* 
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक
२) प्राचार्य जि.शि व प्र.संस्था
३) शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प 
४) शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प
     (सर्व)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे  मार्फत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे. 

 *विषय:-* इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी *'परीक्षेला सामोरे जाताना*' मार्गदर्शन सत्र.

 *दिनांक १२ एप्रिल २०२१* 

 *वेळ सकाळी* ११.०० वाजता

 *कोणासाठी* - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या शाळेतील इ १० वी व इ १२ वीच्या विद्यार्थ्यासाठी.

वेबिनार लिंक

https://youtu.be/E0PqZxy3s0Q

सर्व संबंधिताना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून कळवावे .


(दिनकर टेमकर)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Wednesday, 7 April 2021

मिपा

.            *महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद* संस्थेमार्फत निर्मित Leadership Enhancement for Academic Development (LEAD) हा ऑनलाईन कार्यक्रम शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत *दि. ७ एप्रिल २०२१ रोजी  सकाळी ११ वाजता* ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात येत आहे. याचे थेट प्रक्षेपण आपण *MIEPA, Aurangabad* संस्थेच्या *अधिकृत YouTube चॅनलवर* पाहू शकता. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आजच YouTube Channel ला Subscribe करून Bell (🔔) आयकॉनवर क्लिक करावे
            👉  *मिपा, औरंगाबाद संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज* 
https://www.facebook.com/Maharashtra-Institute-of-Educational-Planning-and-Administration-MIEPA-100133188184315/

            👉  *मिपा, औरंगाबाद संस्थेचे अधिकृत YouTube Channel*
https://www.youtube.com/c/MIEPASLA

         *(डॉ. नेहा बेलसरे)*
                संचालक
      महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन
व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद

Monday, 5 April 2021

लाइव क्लास

Live class

स्वाध्याय Test

स्वाध्याय Test
*इयता 1ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय आठवडा या उपक्रमात नोंदणी कशी करावी व स्वाध्याय(Test) कशी सोडवावी*

1️⃣ प्रथम 8595524519 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये save करून whatsapp वरून Hi असा sms करावे।

2️⃣ नंतर आपले माध्यम असेल तो नंबर type करून send करावे। त्यानंतर अटी व शर्ती ला 1 type करून send करावे।

3️⃣ नंतर आपल्या जिल्ह्याचा नंबर टाकून send करावे। नंतर तालुक्याचा कोड टाकून send करावे। नंतर आपल्या इयतेचा कोड टाकून send करावे।

4️⃣ नंतर विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव लिहून send करावे। नंतर आपल्या स्वतःच्या शाळेचा udise कोड वर्गशिक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्याकडून घेऊन टाकावे। प्रत्येक शाळेचा udise code हा 11 अंकी असतो.उदा.) अश्याप्रकारे माझ्या शाळेचा udise कोड 27151510702 आहे.

5️⃣ नंतर शाळेचे नाव आल्यावर 1 type करून send करावे। स्वाध्याय सोडवायचे असल्यास आपल्या विद्यार्थ्यांच्या नावाचे नंबर टाकून send करावे। किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यांचे नोंदणी करायचे असल्यास दुसरा नंबर टाकून नोंदणी करावी।

6️⃣ प्रत्यक्ष सराव स्वाध्याय सोडवायचे असल्यास 1 type करून send करावे। व 10 प्रश्न व 10 गुण ची सर्व विषयाचे स्वाध्याय सोडवावे।
*(सूचना- स्वाध्याय आठवड्याचे रजिस्ट्रेशन प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतःच्या मोबाईलवर करावे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही अश्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन शिक्षकांनी स्वतःच्या मोबाईलवर करून तद्दनंतर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना सुरक्षित ठिकाणी बोलावून आपल्या मोबाईलमध्ये सोडवून घ्यावे.)*
✍✍✍✍✍✍✍✍

Sunday, 4 April 2021

रोग प्रतिकारशक्ती वाढवा

Live class

Live class link

4थी,7वी आणि 9वी Live class

*जाहीर आवाहन 🙏*

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील इयत्ता 4 थी, 7 वी आणि 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती आधारित live online class*

*कालावधी : दि. 05 ते 30 एप्रिल 2021*
*वेळ : सकाळी 8.00 ते 9.30*
*विषय :- मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान व सामाजिक शास्त्र*
*या You Tube लिंक वरून जॉईन व्हावे 👇*
 http://bit.ly/dietnanded
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (DIET,Nanded ) नांदेड चे अधिकृत चॅनल

नांदेड जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, नांदेड जिल्ह्यातील इयत्ता 4 थी, 7 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी डाएट,नांदेडच्या you tube channel वरून दि. 05 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान व सा. शास्त्र या विषयांच्या अध्ययन निष्पत्ती वृद्धिंगत व्हाव्यात यासाठी यावर आधारित प्रत्यक्ष पाठय घटकांवर ऑनलाईन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. *या ऑनलाईन वर्गाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. यामध्ये दर सोमवार व मंगळवार इयत्ता 4 थी, बुधवार व गुरुवार इयत्ता 7 वी आणि शुक्रवार व शनिवार इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांना वेळ सकाळी 8.00 ते 9.30 या वेळेत वर्ग अध्यापन केले जाणार आहे.* काही कारणास्तव या वेळेत आपण जॉईन होऊ शकले नाहीत तर recorded videos डाएट नांदेडच्या you tube channel वर उपलब्ध असतील. परंतु शक्यतो दिलेल्या वेळी व दिवशी आपण live session ला उपस्थित राहून आपल्या शंकांचे समाधान करून घ्यावे.असे आवाहन डाएट संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद, नांदेड यांनी केले आहे.

*पर्यवेक्षकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण यंत्रणेतील संबंधितांनी ही लिंक व पोस्ट जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावी.*

                *विनित*
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड.

Thursday, 1 April 2021

Internate

*मैत्री तंत्रज्ञानाशी*

*🤹‍♀️विद्यार्थीही बनतील तंत्रस्नेही*

            *दिवस चौथा*

*विषय:- इंटरनेट एक व्यसन व उपयुक्त अँड्रॉइड एप्स*


*आपण इंटरनेटचे व्यसन लागले आहे असे वाटतं आहे का? लागले की नाही कसे ओळखणार ? मग यावर उपाय काय? या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हे सेशन तुमच्यासाठी आहे.*

*सदर क्लाससाठी विद्यार्थ्यांबरोबर  जिल्ह्यातील शिक्षकांनी जॉईन व्हावे.*

*तसेच ही लिंक जास्त विद्यार्थ्यां पर्यंत ही लिंक पाहोचवावी व आपल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा.*

http://bit.ly/dietnanded

*दररोज या एकाच लिंक वरून आपणास सर्व live class ला जॉईन होता येईल तेव्हा ही लिंक सेव्ह करून ठेवावी*

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड*

दिवस 3रा

1एप्रिल लिंक

1 एप्रिल live

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व जिल्हा परिषद नांदेड आयोजित*

*मैत्री तंत्रज्ञानाशी*
*विद्यार्थी ही होतील तंत्रस्नेही*

*डायट नांदेड youtube चॅनेलवर*

*विषय:- मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी*

*दिवस तिसरा*
*दि.01एप्रिल 2021*
*सकाळी 11 वाजता*

लिंक
👇

https://www.youtube.com/watch?v=D4y4jeTxwzY

धूमकेतू Dhumketu 2025