*जाहीर आवाहन 🙏*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील इयत्ता 4 थी, 7 वी आणि 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती आधारित live online class*
*5 एप्रिल पासून दररोज*
*वेळ : सकाळी 8.00 ते 9.30*
*विषय :- मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान व सामाजिक शास्त्र*
*या You Tube लिंक वरून जॉईन व्हावे 👇*
http://bit.ly/dietnanded
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (DIET,Nanded ) नांदेड चे अधिकृत चॅनल
*नांदेड जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, नांदेड जिल्ह्यातील इयत्ता 4 थी, 7 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी डाएट,नांदेडच्या you tube channel वरून दि. 05 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान व सा. शास्त्र या विषयांच्या अध्ययन निष्पत्ती वृद्धिंगत व्हाव्यात यासाठी यावर आधारित प्रत्यक्ष पाठय घटकांवर ऑनलाईन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. *या ऑनलाईन वर्गाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. यामध्ये दर सोमवार व मंगळवार इयत्ता 4 थी, बुधवार व गुरुवार इयत्ता 7 वी आणि शुक्रवार व शनिवार इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांना वेळ सकाळी 8.00 ते 9.30 या वेळेत वर्ग अध्यापन केले जाणार आहे.* काही कारणास्तव या वेळेत आपण जॉईन होऊ शकले नाहीत तर recorded videos डाएट नांदेडच्या you tube channel वर उपलब्ध असतील. परंतु शक्यतो दिलेल्या वेळी व दिवशी आपण live session ला उपस्थित राहून आपल्या शंकांचे समाधान करून घ्यावे.असे आवाहन डाएट संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद, नांदेड यांनी केले आहे.
*पर्यवेक्षकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण यंत्रणेतील संबंधितांनी ही लिंक व पोस्ट जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावी.*
*विनित*
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड.
No comments:
Post a Comment