➿➿➿➿➿➿➿➿➿
*चला शिकूया प्रयोगातून विज्ञान*
**** *प्रयोग क्रमांक - 20 ****
*दिनांक -* 18 डिसेंबर 2021
*प्रयोगाचे नाव - उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया (Endothermic and Exhothermic Reaction)*
🔊 *साहित्य -* पोटॅशियम परमॅग्नेट , ग्लिसरीन, नारळ/कागद इत्यादी.
🔊 *शिक्षक कृती -* मुलांना मंत्रिकाची चित्रफित /video दाखवून चर्चा करावी.
मोकळ्या जागेत विद्यार्थ्या पासून थोड्या दूर अंतरावर प्रयोग करावा . मोठ्या वर्गातील विद्यार्थ्याच्या मदतीने नारळावर / कागदावर अर्धा चमचा पोटॅशियम परमॅग्नेट घेऊन त्यावर अर्धा चमचा ग्लिसरीन टाकावे . साधारणतः 10 सेकंदानंतर धूर निघून नारळ/कागद पेट घेईल. (उष्मादायी अभिक्रिया)
सुरक्षिततेच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना निरिक्षणासाठी दूर उभे करावे.
उष्माग्राही अभिक्रीयेत उष्णता ग्रहण केली जाते. व उष्मादायी अभिक्रियेत उष्णता तयार होते. *(Endothermic and Exhothermic Reaction)*
🔊.*निरीक्षण, अनुमान व निष्कर्ष-*
पोटॅशियम परमॅग्नेट (KMnO4) हे अतिशय क्रियाशील संयुग असून त्याची ग्लिसरीन सोबत रासायनिक अभिक्रिया होऊन उष्णता /ज्वाला तयार होतात.
पोटॅशियम परमॅग्नेट चा वापर जनावरांसाठी जंतुनाशक म्हणून केला जातो.
🔊 *निष्कर्ष -*
*कोणत्याही प्रकारच्या मंत्राने अग्नी प्रजवलित होत नाही, आग लागत नाही.*
🔊 *चर्चेसाठी प्रश्न -*
प्रत्येक चमत्कारामागे विज्ञान असते. असा एखादा चमत्कार सांगून त्यामागील वैज्ञानिक कारण सांगा .
_विज्ञान व तंत्रज्ञान विभाग_
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड*
⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️
No comments:
Post a Comment