⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️
*चला शिकूया प्रयोगातून विज्ञान*
**** *प्रयोग क्रमांक -11* ****
*दिनांक - 25 सप्टेंबर 2021*
🌾 *प्रयोगाचे नाव- हवेला वजन असते हा प्रयोग अभ्यासणे.*
🌾 *साहित्य -* तीन फुगे, लाकडी काडी, रील चा दोरा, टाचणी, इत्यादी.
_(Photo व video काढण्यासाठी Mobile )_
🌾 *विद्यार्थी कृती -*
प्रथम दोन फुगे सारख्या आकारमाना प्रमाणे फुगवून घ्या. एका छोट्याश्या लाकडी काडीच्या दोन्ही टोकाला दोरीच्या साह्याने फुगे बांधा. काडीच्या मध्यभागी एक दोरा बांधून दोन्ही फुगे संतुलित करा. दुकानातील तराजू प्रमाणे. आता टाचणीच्या साह्याने एक फुगा फोडा.
🌾 *निरीक्षण व अनुमान-*
टाचणीने एक फुगा फोडताच लाकडी काडीचे संतुलन बिघडते. फुटलेल्या फुग्याची बाजू वर जाते. ज्या फुग्यात हवा आहे त्या फूग्याची बाजू खाली येते. इत्यादी...
🌾 *प्रयोगावर आधारित प्रश्न व चर्चा -*
1) हवा भरलेला फुगा खाली का गेला असावा...हवा नसलेला फुटलेला फुगा वर का गेला असावा....
2) हवेचा कोणता गुणधर्म या प्रयोगातून आपणांस समजला?
3) हवेचे इतर गुणधर्म व आपण केलेल्या प्रयोगाची कृती व निरीक्षणे वहीत लिहा.
4) आता एका फुग्यात कमी हवा भरा आणि दुसऱ्या फुग्यात त्यापेक्षा खूप जास्त हवा भरा . आता हे दोन्ही फुगे लाकडी काडीच्या /तराजूच्या दोन्ही पारड्यात ठेवा. काय होईल ते सांगा.
*प्रयोगाचे निष्कर्ष -*
🌾हवेला सुध्दा वजन असते.
🌾हवा वजनाने फार हलकी असते.
🌾हवा पारदर्शक असते.डोळ्यांना दिसत नाही.
🌾हवा हे अनेक वायूंचे मिश्रण असते.
🌾हवेत ऑक्सीजन वायूचे प्रमाण 21% असते.
🌾नायट्रोजन वायूचे प्रमाण 78% असते.
इत्यादी....
⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️
*विज्ञान व तंत्रज्ञान विभाग*
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड.
No comments:
Post a Comment