⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️⛱️
*चला शिकूया प्रयोगातून विज्ञान*
प्रयोग क्रमांक -15
*दिनांक - 23 आक्टोबर 2021*
*प्रयोगाचे नाव-*
*" स्थितीक विद्युत अभ्यासणे.*
🔊 *साहित्य -* प्लास्टिक pipe,कंगवा,रेशमी /पॉलिस्टर कापड, फुगा,कागदाचे तुकडे,alluminium foil, ताट, साबणाचे पाणी,strow, ईत्यादी
🔊 *विद्यार्थी कृती* -
🌾 सर्वप्रथम एका ताटलीत कीवा सपाट पृष्ठभागावर साबणाचे पाणी घ्या.strow च्या साह्याने बुडबुडा तयार करा. प्लास्टिकचा दांडा किंवा कंगवा रेशमी कापडावर घासा व बुडबुड्या जवळ न्या. बुडबुडा आकर्षित होतो.
🌾 एक फुगा फुगवा व रेशमी कापडावर घासा व लहानशा पाण्याच्या धारेजवळ न्या. पाण्याची धार फुग्याच्या दिशेने आकर्षित होते.
🌾 अल्युमिनियम foil चे छोटे बॉल बनवा. रेशमी कापडावर घासलेला कंगवा /प्लास्टिक पाइप जवळ न्या बॉल डान्स करतात असे दिसेल.
🌾 एका पेनाच्या टोकावर चौकोनी आकाराच्या कागदाची किंवा अल्यूमिनियम फॉइल ची झापडी करून ठेवा . आता प्लास्टिक चा कंगवा किंवा दांडा रेशमी कापडावर घासून foil जवळ न्या. झापडी गिरकी घेते. कांगव्यासोबत स्वतः भोवती फिरते.
🔊 *निरीक्षण,अनुमान व निष्कर्ष*
आपल्या सभोवती असलेले सर्व पदार्थ अणू पासून बनलेले असतात. व विद्युत प्रभाराने ठासून भरलेले असतात. धन व ऋण प्रभार समान असल्यामुळे पदार्थातील विद्युत प्रभार जाणवत नाही , दिसत नाही. घर्षणामुळे पदार्थातील विद्युत प्रभारामध्ये असलेला समतोल बिघडतो . व हा असमतोल चुंबकीय गुणधर्माच्या स्वरूपात दिसायला लागतो.
प्लास्टिकचा कंगवा किंवा पाईप, रेशमी कापडावर घासल्यावर कापडावरील इलेक्ट्रॉन प्लॅस्टिकच्या वस्तूवर स्थिरावतात त्यामुळे प्लास्टिक ची वस्तू ऋण प्रभारीत होते व धन प्रभारीत वस्तूंना आकर्षित करते. तसेच समान प्रभारीत वस्तू एकमेकांना दूर सारतात.
*समान प्रभारात प्रतीकर्षण असते तर विरुद्ध प्रभारात आकर्षण असते.*
*विज्ञान व तंत्रज्ञान विभाग*
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
No comments:
Post a Comment