*चला शिकूया प्रयोगातून विज्ञान*
**** प्रयोग क्रमांक - 26 ****
*दिनांक - 28 जानेवारी 2022*
*प्रयोगाचे नाव - मेणबत्ती च्या जोतीमुळे हवेने भरलेला फुगा फुटतो मात्र पाण्याने भरलेला फुगा फुटत नाही.*
🔊 *साहित्य - दोन फुगे, मेणबत्ती, आगपेटी ईत्यादी .*
🔊 *विद्यार्थी कृती-*
प्रथम एक फुगा हवेने फुगउन घ्या व एक फुगा पाण्याने भरा.आता एक पेटलेली मेणबत्ती हवेने फुगवलेल्या फुग्याखाली धरा.काय होते याचे निरीक्षण करा.
त्यानंतर तिच पेटलेली मेणबत्ती पाण्याने भरलेल्या फुग्याखाली धरा. काय होते निरीक्षण करा.
🔊.*निरीक्षण, अनुमान व निष्कर्ष-*
हवेने फुगवलेल्या फुग्याखाली मेणबत्ती धरली असता फुगा लगेच फुटतो. उष्णतेने फुग्याचे रबर वितळते व फुगा फुटतो.
पाण्याने फुगवलेल्या फुग्याखाली जळती मेणबत्ती धरली असता फुग्याचे रबर एका मर्यादेपेक्षा जास्त उष्ण/गरम होत नाही. कारण फुग्याच्या आतील पाणी फुग्याची उष्णता शोषून घेते परिणामी फुगा तापत नाही व त्यामुळे फुटत नाही.
*- DIET Nanded*
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
No comments:
Post a Comment