*चला शिकूया प्रयोगातून विज्ञान*
**** प्रयोग क्रमांक - 29 ****
दिनांक - 18 फेब्रुवारी 2022
*प्रयोगाचे नाव - जादूने नाणे गायब करणे*
*साहित्य -*
स्वच्छ पारदर्शक काचेचा ग्लास, एक /दोन रुपयाचे नाणे, पेपर, कटर, डिंक
*विद्यार्थी कृती -*
🌾एक झेरॉक्स पेपर घ्या व त्यावर एक किंवा दोन रुपयाचे नाणे ठेवा. व बाजूला काचेचा ग्लास उपडा/ पालथा ठेवा.
🌾 त्या स्वच्छ पारदर्शक काचेच्या ग्लासाच्या बाहेरील आकाराची कागदाची रिंग तयार करा.
🌾आता ही कागदी रिंग पालथ्या ठेवलेल्या काचेच्या ग्लासावर ठेवा.व रिंग सह काचेचा ग्लास नाण्यावर ठेवा. कागदी रिंग काढून घ्या.
🔊.*निरीक्षण, अनुमान व निष्कर्ष-*
ग्लासावरील रिंग काढून घेतल्यावर ग्लासाच्या आत नाणे दिसत नाही. नाणे गायब होते.
असे का होते....
मानवी मेंदू आकृती व पार्श्वभूमी (Image and Background) यात फरक करू शकतो. फरक करण्याची क्षमता आकृती व पार्श्वभूमी एकमेकांपासून रंग,गंध,हालचाल,मीती (dimension) इत्यादींच्या बाबतीत किती वेगळ्या आहेत यावर अवलंबून असते. मात्र बऱ्याच वेळा आकृती व पार्श्वभूमी एकमेकांशी 100% पर्यंत एकरूप झाल्यामुळे मेंदू यात फरक करू शकत नाही.
परिणामी एखाद्या पार्श्वभूमीवर आकृती शोधण्याची क्षमता शून्य होते व मेंदू फसतो.
उदा.
वाळलेल्या गवतात लपलेला वाघ.
झाडाच्या खोडावर बसलेला सरडा.
शालीमागे लपलेला जादूगार शाल हलवतो - सोडतो व अचानक गायब होतो.
अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
जाहिरातीमध्ये Background फिक्कट रंगाचा असतो व तो कमीत कमी दाखवला जातो
*निष्कर्ष - आकृती व पार्श्वभूमी यांच्यातील फरक जसा जसा कमी होत जातो तसा तसा त्यांच्यातील फरक ओळखण्याची मेंदूची क्षमता देखील कमी होते.*
*DIET Nanded*
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
No comments:
Post a Comment