Youtube

Youtube
Chanel

Thursday, 24 October 2024

voter service portal

*पोस्टल बेलेट / EDC बाबत महत्वाचे अपडेट..*📢
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*यावेळी निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचाऱ्यांना इलेक्शन ट्रेनिंग च्या ऑर्डर सोबतच कर्मचाऱ्याची माहिती भरलेला Prefilled छापील फॉर्म नं 12 / 12 अ ची प्रत मिळालेली आहे, त्यात कर्मचाऱ्याचे नाव, त्याचा मतदानाचा मतदार संघ , यादी भाग क्र, अनुक्रमांक, इत्यादी माहिती भरलेली आहे..*

*तथापि पहिल्या निवडणूक प्रशिक्षणाला जातांना खालील महत्वाच्या गोष्टी चे पालन करा व काळजी घ्या..*

1) *फॉर्म नं 12..* - 

पोस्टल बेलेट मागणी साठी आपणास मिळालेल्या फॉर्म नंबर 12 वरील आपली माहिती एकदा काळजीपूर्वक तपासून घ्यावी.. 
 ( https://electoralsearch.eci.gov.in/ )
कारण काही ठिकाणी असेही निदर्शनास आले  आहे की त्यात नमूद कर्मचाऱ्यांच्या मतदानाच्या मूळ विधानसभा मतदारसंघाचे नाव त्याचा क्रमांक चुकलेला आहे.. 

2) *फॉर्म 12 अ*
शक्यतो अश्या महिला कर्मचारी की ज्यांची इलेक्शन ड्युटी त्यांचं मतदान असलेल्या मतदारसंघात असेल केवळ त्यांनाच फॉर्म नं 
*12 अ* मिळालेला आहे.. त्यांना EDC मिळेल , ज्यात ते नियुक्त मतदान केंद्रावर EVM वर मतदान करू शकतील.. त्यांनी देखील आपली माहिती तपासून घ्यावी.. (मात्र ज्या महिला कर्मचाऱ्यांचे मतदान कार्यरत विधानसभा मतदारसंघा बाहेर असेल त्यांनी फॉर्म 12 च भरून द्यायचा आहे.. )

 3) छापील तपशील बरोबर आढळून आल्यास फॉर्म 12  / 12अ वर सही करावी. 

● *तथापि विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्र किंवा अ.क्र. या तपशिलात चूक असल्यास छापलेली माहिती रद्द करणेसाठी सदर अंकाला / नावाला स्पष्ट round करून त्याच्यावर सुधारित माहिती पेनाने नमूद करावी..* 
 फॉर्म वर प्रत्येक चुकलेल्या ठिकाणी बदल करणे आवश्यक आहे.

4) *फॉर्म नंबर 12 किंवा 12 अ सोबत जोडवायचे कागदपत्रे:-*

१) मतदान कार्ड ची xerox

२) निवडणूक आदेशाची प्रत

वरील दोन्ही कागदगपत्र जोडणे बंधनकारक आहे, अन्यथा आपली पोस्टल बेलेट / EDC ची मागणी नाकारली जाईल..  

5) निवडणूक आदेशात आणि फॉर्म 12 किंवा 12 अ वर mobile क्रमांक दिलेले आहेत, सदर क्रमांक प्रत्येकाने तपासावा, योग्य नसल्यास पहिला क्रमांक खोडून खरा Mobile क्रमांक अचूक नमूद करावा.

●अश्या पद्धतीने तपासलेला डेटा अचुक असल्याची खात्री करून व सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म 12 / 12 अ प्रथम प्रशिक्षणाच्या वेळी हजेरीच्या टेबलवर जमा करावा.


6) *मतदान पथकांच्या मानधन वाटपासाठी त्यांच्या बँक खात्याचा अचूक तपशील आवश्यक असल्याने सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी प्रथम प्रशिक्षणास येताना बँक पासबुकच्या पहिल्या पानाची Xerox सोबत आणणे अनिवार्य आहे.*

थोडक्यात..

*पहिल्या प्रशिक्षणास येताना आणायची आवश्यक कागदपत्रे*👇🏻
*1.नमुना 12/ 12 अ*
*2.निवडणूक आदेश*
*3.मतदार ओळखपत्र*
*4.बँक पासबुक पहिले पान*

कृपया या सूचना प्रत्येक कर्मचारी यांचे पर्यंत पोहचवा..


चला 100% कर्मचाऱ्यांनी मतदान करूया, लोकशाही बळकट करूया..

🙏🏻

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025