Youtube

Youtube
Chanel

Saturday, 23 September 2023

Camtasia studio YouTube link

VDO nirmiti with Camtacia studio

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व),
३) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
४) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व),
५) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व),
६) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व),
७) शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम, उत्तर, दक्षिण),


राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व  विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

यातील २१ वे सत्र रविवार, दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. करण्यात आले आहे.
    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
 
  व्याख्याते
श्री. संतोषकुमार किसवे पाटील
जिल्हा परिषद केंद्रीय प्रा.शाळा, तळणी, ता. बिलोली, जि. नांदेड

 विषय - Camtacia Studio सॉफ्टवेअरचा उपयोग करून व्हिडिओ निर्मिती करणे.

वार रविवार 
 दि - २४/०९/२०२३ 
 वेळ सकाळी ११.०० ते १२.००

 युट्युब लिंक 
https://youtube.com/live/KQ_UndjQQ4Y?feature=share

QR- Code 
 

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

संचालक
अमोल येडगे, भा. प्र. से.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  
महाराष्ट्र, पुणे

Saturday, 16 September 2023

PAT Chat boat YouTube link

PAT Chat boat YouTube link touch here

PAT Chat boat

*प्रति,*
१) शिक्षणाधिकारी,
     मनपा नांदेड

2) गटशिक्षणाधिकारी,
    पंचायत समिती (सर्व),
    जिल्हा नांदेड

 *विषय* : पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर शिक्षकांनी नोंदविताना येणाऱ्या अडचणी बाबत यूट्यूब लाईव्ह द्वारे मार्गदर्शन बाबत.

      वरील विषयान्वये STARS प्रकlल्पामधील SIG - 2 Iimproved Learning Assessment System  नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत  पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन  करण्यात येत आहे.
राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९  ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर दिनांक 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2023 या कालावधीत भरायचे असून हे गुण कसे भरायचे यासंदर्भात राज्यस्तरावरून युट्युब लाईव्ह द्वारे मार्गदर्शन करण्यात आले होते तथापि गुण नोंदविताना काही शिक्षकांना अडचणी येत आहेत.
 
       तरी गुण नोंदविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना येथील साधन व्यक्ती श्री दादाभाऊ जगदाळे हे मार्गदर्शन करणार आहेत.*

      तरी आपल्या अधिनस्थ मुख्याध्यापक  व शिक्षक यांना सदर युट्युब लाईव्हला उपस्थित राहणेस्तव सूचित करण्यात यावे.

*यु-ट्यूब लिंक*
https://youtube.com/live/f0VIHxPSFOk?feature=share

झूम लिंक:https://zoom.us/j/97826763136?pwd=S0JXcnRDaDFpYVhzdlBTbFprWmlDQT09

दिनांक: 17-09-2023

वेळ:      12:05 PM


                            *प्राचार्य* 
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड*

                *शिक्षणाधिकारी (प्रा)*                                                                 
                *जिल्हा परिषद नांदेड*

Thursday, 14 September 2023

PAT Maharashtra chat bot YouTube link

PAT Maharashtra chat bot YouTube link touch here

PAT Maharashtra chat boat

*प्रति,*

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/     
      माध्यमिक) जि.प. (सर्व),
२)शिक्षणाधिकारी,बृहन्मुंबई,
     मनपा,
३) शिक्षण निरीक्षक, मुंबई   
     (उत्तर,दक्षिण,पश्चिम ) ,
४) प्रशासन अधिकारी, 
     म.न.पा../न.पा./न प    
     ( सर्व ),

*विषय* : पायाभूत चाचणीचे   
    गुण  PAT (महाराष्ट्र)    
    या चॅटबॉटवर शिक्षकांनी     
    नोंदविणे बाबत प्रशिक्षण*

      वरील विषयान्वये STARS प्रकlल्पामधील SIG - 2 Iimproved Learning Assessment System  नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत  पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन  करण्यात येत  आहे.
राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९  ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते. 
       *विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे*. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या *व्हिडीओची यु-ट्यूब लिंक  सोबत देण्यात येत आहे*. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे *दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२:०० ते ०१:३० या कालावधीत यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल*.संबधित  शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण  यु-ट्युबद्वारे घेण्याबाबत कळविण्यात  यावे.  प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी  *पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे*.

जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथमिक)यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी द्यावी .सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबॉटवर  पायाभूत चाचणीचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे, अशा इयत्ता तिसरी ते आठवी शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक मदतीसाठी श्री. वेंकटेश अनंतरामन ८०००४९४७६४ यांचेशी संपर्क करण्यात यावा.

  तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.

*यु-ट्यूब लिंक:*     https://www.youtube.com/live/oC0gFdpOOV0?si=18vatwfwV7tNslrk

*PAT चॅटबॉट मार्गदर्शिका:*  https://bit.ly/PATManual

      *अमोल येडगे,(भा.प्र.से)*
               *संचालक,*
   *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,     पुणे*

Hindi Divas हिंदी दिवस

*१४ सितंबर हिंदी दिवस : प्रश्नमंजुषा*

हिंदी दिवस क्यों मनाया जाता है?

हिंदी दिवस *निबंध और भाषण* के लिए उपयुक्त

_हिंदी भाषा नहीं भावों की अभिव्यक्ति है,_
_यह मातृभूमि पर मर मिटने की भक्ति है।_

*हिन्दी दिवस प्रश्न मंजुषा Hindi Diwas Quiz*
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/09/hindi-diwas-quiz.html
●═══════〇═══════●
*विश्व हिन्दी दिवस प्रश्न मंजुषा  World Hindi Diwas Quiz*
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2021/09/hindi-day-quiz.html
●═══════〇═══════●
https://zpupsnichapurcpsmaregaontqkinwat.blogspot.com/

https://youtube.com/@kinwatlive?si=lPJY9oaLPOg12tqw

══━━━━━━✧❂✧━━━━━━══
'चला शिकू पुस्तकाबाहेरील शिक्षण' या उपक्रमांतर्गत नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तसेच प्रश्नमंजुषा लिंक हव्या असतील तर तुम्ही खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
https://bit.ly/3rMO7C3
●═══════〇═══════●
#हिन्दीदिवस

YouTube link and chat boat

YouTube link and chat bot touch here

Thursday, 7 September 2023

नवभारत साक्षरता अभियान यूट्यूब लिंक

नवभारत साक्षरता अभियान यूट्यूब लिंकtouch here

नवभारत साक्षरता अभियान

*अत्यंत महत्त्वाचे प्रथम प्राधान्य*

प्रति,
1) शिक्षण उपसंचालक ( सर्व ),
2 ) प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व ), 3) शिक्षण अधिकारी प्राथमिक, माध्यमिक, योजना (सर्व) 4 ) शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी मनपा / न पा (सर्व ) 
5) सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, 
6) सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, यांना सूचित करण्यात येते की आज दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत उल्लास ॲप बाबतचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या युट्युब चॅनेलवर ऑनलाइन पद्धतीने होणार असून सर्वांनी या प्रशिक्षणास वेळेवर जॉईन व्हावे तसेच आपल्या अधिनस्त नवभारत साक्षरता कार्यक्रम बाबत जबाबदारी असणारे अधिकारी तसेच आपल्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिव्याख्याता अधिव्याख्याता सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख तसेच आपल्या अधिनस्त सर्व शासकिय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे मुख्याध्यापक यांना देखील प्रशिक्षणास उपस्थित राहून प्रशिक्षण घेणेबाबत आपल्या स्तरावर तात्काळ  आदेशित करावे
✍️ राज्य साक्षरता केंद्र , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या केंद्राच्यावतीने आयोजित
नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत सर्वेक्षण मोबाईल ॲप चे प्रशिक्षण.
✍️दिनांक 7 सप्टेंबर 23
✍️वेळ दु. 1.00 वा
✍️ प्रास्ताविक
✍️ नव साक्षरता अभियानाची माहिती
✍️सर्वेक्षण मोबाईल ॲप ची माहिती
✍️ शंका समाधान
✍️ आभार प्रदर्शन 

- अमोल येडगे ( भा प्र से)
संचालक
रा शै सं व प्र प महाराष्ट्र, पुणे 

प्रशिक्षणाची युट्युब लिंक खालील प्रमाणे
👇
https://youtube.com/live/_CNTXS-91Sk?feature=share

Sunday, 3 September 2023

Aaditya L-1 कसे काम करनार

आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असा समज झाला आहे की इसरो ने जसे चंद्रयान ३ चंद्रावर उतरवले तसेच आता सूर्यावरही यान उतरणार आहे किंवा तिथे जाणार आहे, परंतु तसे अजिबात नाही. 
आदित्य एल १ हे यान म्हणजे एक प्रकारचा सायन्स ओब्सेर्व्हेटोरी टेलिस्कोप आहे यात अनेक प्रकारची वैज्ञानिक उपकरणे बसवली गेली आहेत,
जी सूर्याच्या वातावरणाचा, सौर ज्वाळा, सौर वारे, सूर्याचे विदुत चुंबकीय क्षेत्र आणि एकूण सूर्याच्या संबंधी जितकी वैज्ञानिक माहिती आता उपलब्ध आहे त्याची अचूकता आणखी वाढवण्यासाठी काम करतील. 
सूर्य ते पृथ्वी अंतर हे अंदाजे १५० दशलक्ष किलोमीटर इतके आहे आणि आदित्य एल १ यान हे पृथ्वीपासून केवळ १.५ दशलक्ष किलोमीटरवर जाऊन त्या कक्षेतच फिरत राहणार आहे. (See Diagram)
याचा अर्थ आदित्य एल १ यान हे सूर्य ते पृथ्वी अंतराच्या केवळ १ % अंतरावरच जाणार आहे, त्यामुळे ते सूर्यावर जाणार आहे किंवा सूर्याच्या जवळ जाणार आहे असे सर्व दावे / बातम्या चुकीच्या आहेत. 
पृथ्वीचे आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल जिथे एकमेकांच्या विरोधात कॅन्सल आउट किंवा ऍव्हरेज केल्यासारखे होते त्या कक्षेला लाग्रांज पॉइंट्स असे नाव आहे.
जे एकूण ५ ठिकाणीआहेत.
त्यातील सूर्य आणि पृथ्वी च्या सरळ रेषेत असलेल्या L1 नावाच्या लाग्रांज पॉईंट च्या भोवती आदित्य एल १ यान जाऊन त्या बिंदू भोवतीच फिरत राहणार आहे.
यानाची पुढील बाजू सतत सूर्याच्या दिशेत असेल जी सूर्याचे अध्ययन करेल आणि मागील बाजू सतत पृथ्वीच्या दिशेत असेल जी संदेशवहन करेल.
L1 हा बिंदू सारखा जरी असला तरी तो पृथ्वी जसजशी सूर्याभोवती फिरताना कक्षेत पुढे सरकत राहील तसा L1 बिंदू आणि तेथील यान सुद्धा त्याच कक्षेत सूर्याभोवती फिरत राहील. (Black dashed line)
 *L1 बिंदूच का निवडला ?* 
L1 याच ठिकाणी यान का ठेवले तर तिथे सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल एकमेकांच्या विरोधात कॅन्सल आऊट किंवा ऍव्हरेज केल्यासारखे होते आणि परिणामी यानाला कमीत कमी इंधन वापरून कक्षेत फिरत ठेवता येते. 
अवकाशात एखाद्या दीर्घकालीन ऑब्सर्व्हेशन मिशन साठी ह्या वेगवेगळ्या लाग्रांज पॉईंट कक्षांचा वापर करतात आणि तसे वैज्ञानिक उपकरण दुर्बिणी असलेले सॅटेलाईट त्या कक्षेत नेऊन स्थापित करतात. 
आदित्य एल १ सारखेच सूर्याचे अध्ययन करणारे नासा चे Solar and Heliospheric Observatory (SOHO) सोहो दुर्बीण ही १९९५ पासून L1 पॉईंट कक्षेत अजूनही फिरत आहे जिथे आदित्य एल १ (Aditya L1 at L1 point) जाणार आहे. 
उदाहरण - समजा एखादी टेकडी आहे ज्याच्या डाव्या बाजूला सूर्य आहे आणि उजव्या बाजूला पृथ्वी आहे, आपण एखादे वाहन किंवा सायकल घेऊन पृथ्वी असलेल्या डाव्या बाजूने सुरुवात करून सूर्य असलेल्या उजव्या बाजूस टेकडी चढून जायला लागलो तर आगोदर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपल्याला उजवीकडे खेचत राहील आणि टेकडीचा मध्य पार झाल्यावर डावीकडील सूर्याचे गुरुत्वाकर्षण आपल्याला डावीकडे खेचायला लागेल, 
त्यामुळे मध्य भागी अशी एक जागा असेल जिथे डाव्या आणि उजव्या बाजूने असलेला खेचण्याचा परिणाम समान झाल्याने तो जवळपास शून्य होईल ती जागा म्हणजे लाग्रांज पॉईंट आहे असे म्हणता येईल. 
नासा ची सध्याची जेम्स वेब दुर्बीण (James Webb Space Telescope - JWST at L2 point) ही लाग्रांज पॉईंट एल २ भोवती फिरत आहे जी सतत बाह्य अवकाशाच्या दिशेत बघत असून तिची मागची बाजू नेहेमी पृथ्वीच्या दिशेत आहे. त्यामुळे आदित्य एल १ यान आणि जेम्स वेब दुर्बीण या दोन्ही परस्पर विरोधी दिशेत दोन विरुद्ध लाग्रांज पॉइंट जवळ स्थित आहेत हे लक्षात घ्या. 
L1 बिंदू पर्यन्त जायला यानाला सुमारे १.५ दशलक्ष किलोमीटर अंतर पार करावे लागेल त्यासाठी अंदाजे १२८ दिवस लागतील असे सध्याचे अनुमान आहे. 
म्हणजे आज रॉकेट द्वारे सोडलेले आदित्य एल १ हे यान १२ जानेवारी २०२४ रोजी त्या L1 लाग्रांज बिंदू जवळ पोहोचेल असा अंदाज आहे. 
त्यामुळे यान पृथ्वीच्याच जवळ राहून सूर्याचा अभ्यास करेल, सूर्यावर किंवा त्याच्या जवळपासच्या कक्षेतही जाणार नाही .

5 suptember

5 suptember touch here

5 suptember

*https://www.activeeducationrmd.com/2023/08/drsarvepalli-radhakrishnan-and-teacher.html?m=1*
➖➖➖➖➖➖➖➖
*शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षक बांधवांना हार्दिक* *शुभेच्छा.!*
*१) राधाकृष्णन यांच्या जीवन* *चरित्रावर आधारित माहिती*
*२) शिक्षक दिनाबाबत संपूर्ण माहिती.*
*३) प्राध्यापक ते राष्ट्रपती पर्यंत जीवन प्रवास आधारित माहिती.*
*४) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे संपूर्ण चरित्र*
*५) अत्यंत सोप्या भाषेत भाषण*
*६) नोबल पारितोषिक विजेता भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन.*
*७) शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी.*
*८) राजकीय जीवनात पदार्पण*
*९) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी*
*१०) डॉक्टर राधाकृष्ण बाबत संक्षिप्त माहिती*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
🟧🟨🟨🟩🟦🟪⬛
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

धूमकेतू Dhumketu 2025