*प्रति,*
१) शिक्षणाधिकारी,
मनपा नांदेड
2) गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती (सर्व),
जिल्हा नांदेड
*विषय* : पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर शिक्षकांनी नोंदविताना येणाऱ्या अडचणी बाबत यूट्यूब लाईव्ह द्वारे मार्गदर्शन बाबत.
वरील विषयान्वये STARS प्रकlल्पामधील SIG - 2 Iimproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे.
राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर दिनांक 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2023 या कालावधीत भरायचे असून हे गुण कसे भरायचे यासंदर्भात राज्यस्तरावरून युट्युब लाईव्ह द्वारे मार्गदर्शन करण्यात आले होते तथापि गुण नोंदविताना काही शिक्षकांना अडचणी येत आहेत.
तरी गुण नोंदविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना येथील साधन व्यक्ती श्री दादाभाऊ जगदाळे हे मार्गदर्शन करणार आहेत.*
तरी आपल्या अधिनस्थ मुख्याध्यापक व शिक्षक यांना सदर युट्युब लाईव्हला उपस्थित राहणेस्तव सूचित करण्यात यावे.
*यु-ट्यूब लिंक*
https://youtube.com/live/f0VIHxPSFOk?feature=share
झूम लिंक:https://zoom.us/j/97826763136?pwd=S0JXcnRDaDFpYVhzdlBTbFprWmlDQT09
दिनांक: 17-09-2023
वेळ: 12:05 PM
*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड*
*शिक्षणाधिकारी (प्रा)*
*जिल्हा परिषद नांदेड*
No comments:
Post a Comment