विज्ञान छंद वर्ग
इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विज्ञान छंद वर्ग ‘ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी विज्ञानातील प्रकाश संकल्पनेवर आधारित प्रारुपे (कॅलिडोस्कोप, पेरिस्कोप, अगणित प्रतिमा इ.) आणि ध्वनी, गुरुत्वमध्य, घर्षण, दृष्टीभ्रम या संकल्पनांवर आधारित खेळणी करतील. विद्यार्थ्यांना साहित्य संच देऊन प्रारुपे आणि खेळणी करण्याचे मार्गदर्शन करण्यात येईल.
दिनांक : २९ आणि ३० ऑक्टोबर २०२२ (दोन दिवस)
वेळ : सकाळी १०.३० ते १.०० वा.
माध्यम : मराठी आणि इंग्रजी (मिश्र)
स्वत: केलेली प्रारुपे आणि खेळणी विद्यार्थी घरी घेऊन जातील.
दोन दिवसीय कार्यशाळेचे शुल्क रु. ८००/- आहे.
स्थळ : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
No comments:
Post a Comment