Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 16 August 2022

समुह राष्ट्रगित गायन

*अत्यंत महत्वाचे*
ता.16/082022

प्रति ,
मुख्याध्यापक / प्राचार्य,
शासकीय , जिल्हा परिषद , खासगी अनुदानित , विनाअनुदानित , स्वयं अयसहाय्यित शाळा (सर्व व्यवस्थापनाच्या / सर्व माध्यमाच्या / सर्व प्रकारच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (सर्व), ता. किनवट

*विषय : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत ता. 17 ऑगष्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता "समूह राष्ट्रगीत गायन " उपक्रम घेणे बाबत*

संदर्भ : 
 1 ) शासन , पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील परिपत्रक क्र . संकीर्ण 8222 / प्र.क्र .244 / सां.का. 4 , दि . 10.8.2022 
2 ) शासन , पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील परिपत्रक क्र . संकीर्ण 8222 / प्र.क्र .161 / सां .. 4 दिनांक 30.6.2022 . 
3) मा. जिल्हाधिकारी , नांदेड यांचे पत्र, क्र. 2022सा.शा. 1 / टे- 12/प्रक्र/दि.14.08.2022

           उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की ,भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे . या उपक्रमांतर्गत दिनांक 09 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यामध्ये "स्वराज्य महोत्सव " आयोजित करण्यात आला आहे . उका संदर्भ ( 1 ) येथील शासन परिपत्रकातील परिशिष्ट - अ मध्ये नमूद केल्यानुसार राज्यस्तरावरील कार्यक्रमांच्या नियोजनामधील समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम दिनांक 17 ऑगस्ट , 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता राबवावयाचा आहे . 
यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत . 
1 ) दिनांक 17.8.2022 रोजी सकाळी 11.00 वाजता एकाचवेळी राज्यात सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन होईल याची दक्षता घेण्यात यावी . सकाळी ठिक 11.00 वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी 11.00 ते 11.01 या एका मिनिटामध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे . 
2 ) या राष्ट्रगीत गायनासाठी राज्यातील खाजगी शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा / महाविद्यालय / शैक्षणिक संस्था विद्यापीठे यामधील विद्यार्थी , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी , शासकीय व निमशासकीय कार्यालये , केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधीत कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी ,  खाजगी आस्थापना , व्यापारी प्रतिष्ठाने , संस्था यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग अनिवार्य आहे . राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण , वर्ग खाली किंवा हॉल याठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे .
 3 ) ग्रामस्तरावर , वॉर्डस्तरावर ( नगरपालिका / नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका स्तरावर ) सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घ्यावयाचा आहे . 
 4 ) सर्व नागरिकांनी दिनांक 17 ऑगस्ट , 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता आहे त्या ठिकाणी थांबुन राष्ट्रगीत गायन करावयाचे आहे . 
5 ) खाजगी आस्थापना व्यापारी प्रतिष्ठाने , संस्था , शासकीय व निमशासकीय कार्यालये , केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधीत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. 


*-अनिल महामुने,*
गट शिक्षणाधिकारी
पंचायत समिती, किनवट

प्रतिलिपी :
1.विस्तार अधिकारी(शिक्षण) / केंद्र प्रमुख (सर्व) , पंचायत समिती , किनवट , आपणास देऊन कळविण्यात येते की, हा संदेश आपल्या अधिनस्त सर्व शाळांपर्यंत पोहचवावा. कार्यक्रमाचे व्हिडिओ व फोटो लिंकवर अपलोड करण्यास मुख्याध्यापकांना सांगावे.

समूह राष्ट्रगीत गायन

समुह राष्ट्रगित गायन touch here

Wednesday, 10 August 2022

समुह गान

समुह गानtouch here

mahiti bharanyachi link

10 geet mahiti bharanyachi link touch here

10 geet;10tarikh;10vajata

🇮🇳 *हर घर तिरंगा*🇮🇳

*आज दि 9.8.2022 रोजी बैठकीमध्ये  माननीय शिक्षणाधिकारी यांच्या दिलेल्या सूचनेनुसार....*


▶️उद्या दि 10 ऑगस्ट रोजी सर्व शाळांमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सकाळी 10 वाजता एकाच वेळी देशभक्ती पर गीतांचे गायन केले जाणार आहे.

▶️ सदर गीत गायनाचे व्हिडीओ शूटिंग करावे.

▶️त्यात केवळ 2 मिनिटांचा विडियो ड्राईव्ह ला अपलोड करायचा आहे.

▶️शाळेचे गुगल ड्राईव्ह असेल तर त्यावर, नसेल तर शाळेतील शिक्षकांच्या गुगल ड्राईव्ह ला सदर 2 मिनिटांचा विद्यार्थी गीत गायन करत असतानाचा शाळेचे नाव दिसेल असा विडियो अपलोड करावा.

▶️ सदर व्हिडीओ ची  ड्रॉईव लिंक कॉपी करून  केंद्रात निवडलेल्या तंत्रस्नेही शिक्षकांच्या  व्हाट्सअप्प ला पाठवावी.

▶️ सदर गुगल ड्रॉईव लिंक ची सेटिंग For Everyone अशी चेंज करुन घ्यावी. हे महत्वाचे आहे.

▶️जर अशी सेटिंग करणे जमत नसल्यास सदर बाबत तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेऊन ती लिंक तयार करून पाठवावी.

▶️तालुक्यातील सर्व शाळांची अशी link तयार झाली पाहिजे. प्रत्येक केंद्रातील 100% शाळांची अशी ड्राईव्ह link झाली पाहिजे याबाबत संबंधित केंद्रप्रमुख यांनी दक्षता घरून पाठपुरावा करावा.

*सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या , 100 % शाळांनी सदर अभियानात सहभाग नोंदवून आपल्या जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करावे.*

--------------------------------

सदर बनविलेली लिंक खालील गुगल फॉर्म मध्ये माहिती सह भरावी.

https://forms.gle/38tx8FPr2AGvjn22A


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Tuesday, 9 August 2022

10 गिते

१० गिते touch here

10tarikh;10vajata;10ganyache gayan

selfy

selfy touch here

sawari


via

हर घर तिरंगा उपक्रम

🔴 *हर घर तिरंगा उपक्रम* -महत्वाच्या बाबी/वेळापत्रक 🔴
*दि.13 ते 15 अॉगस्ट (तीन दिवस) दररोज ध्वजसंहितेनूसार सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण करणे*

www.amrutmahotsav.nic.in
www.mahaamrut.org
➡️ दि.8/8/22- बालसभा आयोजीत करणे,फोटो व्हिडिओ लिंकवर अपलोड करणे
➡️ दि. 9/8/22 '-विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये देशाभिमान जागृतीसाठी मानवी साखळी तयार करणे,दि.13 ते 15 (सलग)  अॉगस्ट घरोघरी ध्वज उभारण्याबाबत उपक्रमाची माहिती देणे ,फोटो व्हिडिओ लिंकवर अपलोड करणे
➡️ दि.10/8/22 -सकाळी 10:10 वा. सर्व शाळांमध्ये समूहगीत गायन घेणे (10 गीते-विहित क्रमाने),फोटो व्हिडिओ लिंकवर अपलोड करणे
➡️दि. 10 ते 15/8/22 दररोज गावातून प्रभातफेरी काढणे,फोटो व्हिडिओ लिंकवर अपलोड करणे
➡️ दि.11/8/22 पासून नियोजनानूसार -चित्रकला,वक्तृत्व स्पर्धा,फोटो व्हिडिओ लिंकवर अपलोड करणे
➡️ दि. 10 ते 14/8/22-`अनसंग हिरोज अनटोल्ड स्टोरीज'-शहिदांचे कार्य कथा,गीत,नृत्यांच्या माध्यमातून सादर करणै,
फोटो व्हिडिओ लिंकवर अपलोड करणे
➡️ 13 ते 15/8/22- 'भारत माझा देश संकल्प'- भारताच्या विकासासाठी/समृध्दीसाठी सर्व विद्यार्थ्यांकडून किमान एक संकल्य लिहून घेणे,
फोटो व्हिडिओ लिंकवर अपलोड करणे
➡️ दि.10 ते 15/8/22- `जयहिंद स्टेशन` - जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे,शहिदांची भिंतीचित्रे निर्माण करणे,ग.शि.अ.कार्यालयात जमा करणे,फोटो व्हिडिओ लिंकवर अपलोड करणे
*-ग.शि.अ.पं.स.किनवट*

9 ऑगस्ट क्रांती दिन

*▪️ ०९ ऑगस्ट क्रांती दिन सोपे भाषण*
*▪️ पाठांतर करायला खूप सोपे*
*https://youtu.be/TuahJLvISe8*

*▪️ ०९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस भाषण*
*https://youtu.be/_cjFxAbEGns*
-----------------------------------------
*▪️ स्वातंत्र्य दिन भाषणे*
*▪️पाठांतर करायला खूप सोपे...*
*▪️ स्वातंत्र्य दिन मराठी सोपे भाषण चारोळ्यांसह*
*https://youtu.be/tcIAeMBEZKM*

*▪️ स्वातंत्र्य दिन 10 ओळींचे सोपे मराठी भाषण*
*https://youtu.be/5YcVaVcOWHc*

*▪️ स्वातंत्र्य दिन 10 ओळींचे सोपे इंग्रजी भाषण*
*https://youtu.be/1JIrjpAZdbo*

*▪️ स्वातंत्र्य दिन सोपे हिंदी भाषण*
*https://youtu.be/-pOUVuRPqCc*

*▪️ स्वातंत्र्य दिन सोपे इंग्रजी भाषण*
*https://youtu.be/-gnzOUBftKM*

*▪️ माझा आवडता क्रांतिकारक भगतसिंग भाषण*
*https://youtu.be/L0X7CzPWhw4*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*आपल्या groups वर शेअर करा.*

Sunday, 7 August 2022

Krantidin

*तात्काळ महत्वाचे*

9 ऑगस्ट क्रांतीदिनि मानवी
साखळी तयार करणेबाबत

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात मानवी साखळी करावयाची आहे. यामधून एकात्मतेची भावना निर्माण होईल. यावेळी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा संकल्प करण्यात यावा. यासाठी गट विकास अधिकारी यांनी नियोजन करून प्रत्येक गावात मानवी साखळी करावी. यामध्ये शाळा-महाविद्यालय, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, ग्राम पंचायत येथे एकमेकांच्या हातात हात घेऊनक्षमानवी साखळी तयार करावी. यामध्ये
शालेय विद्यार्थी, महिला, युवक-युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. मानवी साखळी करताना मुलांची, महिलांची आणि पुरुषांची स्वतंत्र मानवी साखळी करावी. 
या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ ग्रुपवर शेअर करावेत.

setu abhyas

setu abyas touch here

BSNL fiber

BSNL fiber bookings touch here

Friday, 5 August 2022

link voter id to Adhar

*आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे*
खालील प्रक्रिया FOLLOW करा
👉voter helpline हे app डाऊनलोड करा
👉voter registration ला क्लिक करा
👉फॉर्म 6 B ला क्लिक करा
👉Lets start ला क्लिक करा
👉आपला मोबाईल नंबर टाका
👉आपल्याला otp येईल तो टाका
👉otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा
👉voter id असेल तर Yes I have voter ID  हे निवडा
👉voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा.👉नंतर proceed क्लिक करा
👉आता तुमचा आधार नंबर टाका.
👉Done करा व confirm ला क्लिक करा.

Wednesday, 3 August 2022

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक ऑनलाइन शिक्षक प्रशिक्षण 

प्रति,
गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख
 मुख्याध्यापक सर्व ( शासकीय व खाजगी अनुदानित शाळा )

मा. सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे संदर्भीय पत्र जा. क्र. 3765 दि. 02/08/2022 अन्वये राज्यातील सर्व शासकीय व शासकीय अनुदानित मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच आदर्श शाळांमध्ये इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या ( फक्त मराठी माध्यम ) शिक्षकांचे एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन SCERTM पुणे मार्फत दिनांक 05 व 06 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले आहे. आपल्या अधिनस्त संबंधित शिक्षकांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याबाबत आदेशित करावे. 
*वेळापत्रक*
दिनांक :-05/08/2022 
वेळ:- सकाळी :- 10.00 ते 12.50
वर्ग व माध्यम:- इयत्ता पहिली मराठी माध्यम 
👉https://youtu.be/xJDjjwvmPbQ
दिनांक :- 06/08/2022
वेळ :- सकाळी 10.00 ते 3.00
वर्ग व माध्यम :- इयत्ता पहिली मराठी माध्यम
👉https://youtu.be/InVWli3whD0
दिनांक :- 05/08/2022
वेळ :- 10.00 ते 12.50
वर्ग व माध्यम :- इयत्ता पहिली उर्दू माध्यम 
👉 https://youtu.be/nrgGvVpUzRE
दिनांक :- 06/08/2022
वेळ : - सकाळी 10.00 ते 3.00
वर्ग व माध्यम :- इयत्ता पहिली उर्दू माध्यम 
👉 https://youtu.be/ngs1Xg4FJA4
दिनांक :- 05/08/2022
वेळ :- दुपारी 1.30 ते 4.50
वर्ग व माध्यम :- इयत्ता दुसरी मराठी माध्यम ( फक्त आदर्श शाळा )
👉 https://youtu.be/9p_iLBowlEs
दिनांक :- 06/08/2025
वेळ :- दुपारी 1.50 ते 6.00
वर्ग व माध्यम :- इयत्ता दुसरी मराठी माध्यम ( फक्त आदर्श शाळा )
👉 https://youtu.be/sM3tcovGJag 

उपरोक्त नियोजनाप्रमाणे 100%  संबंधित शिक्षक प्रशिक्षणासाठी उपस्थित राहतील यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करावी.

- डॉ.रवींद्र आंबेकर, प्राचार्य, डायट, नांदेड.
- डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, नांदेड.

धूमकेतू Dhumketu 2025