Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 16 August 2022

समुह राष्ट्रगित गायन

*अत्यंत महत्वाचे*
ता.16/082022

प्रति ,
मुख्याध्यापक / प्राचार्य,
शासकीय , जिल्हा परिषद , खासगी अनुदानित , विनाअनुदानित , स्वयं अयसहाय्यित शाळा (सर्व व्यवस्थापनाच्या / सर्व माध्यमाच्या / सर्व प्रकारच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (सर्व), ता. किनवट

*विषय : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत ता. 17 ऑगष्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता "समूह राष्ट्रगीत गायन " उपक्रम घेणे बाबत*

संदर्भ : 
 1 ) शासन , पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील परिपत्रक क्र . संकीर्ण 8222 / प्र.क्र .244 / सां.का. 4 , दि . 10.8.2022 
2 ) शासन , पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील परिपत्रक क्र . संकीर्ण 8222 / प्र.क्र .161 / सां .. 4 दिनांक 30.6.2022 . 
3) मा. जिल्हाधिकारी , नांदेड यांचे पत्र, क्र. 2022सा.शा. 1 / टे- 12/प्रक्र/दि.14.08.2022

           उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की ,भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे . या उपक्रमांतर्गत दिनांक 09 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यामध्ये "स्वराज्य महोत्सव " आयोजित करण्यात आला आहे . उका संदर्भ ( 1 ) येथील शासन परिपत्रकातील परिशिष्ट - अ मध्ये नमूद केल्यानुसार राज्यस्तरावरील कार्यक्रमांच्या नियोजनामधील समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम दिनांक 17 ऑगस्ट , 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता राबवावयाचा आहे . 
यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत . 
1 ) दिनांक 17.8.2022 रोजी सकाळी 11.00 वाजता एकाचवेळी राज्यात सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन होईल याची दक्षता घेण्यात यावी . सकाळी ठिक 11.00 वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी 11.00 ते 11.01 या एका मिनिटामध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे . 
2 ) या राष्ट्रगीत गायनासाठी राज्यातील खाजगी शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा / महाविद्यालय / शैक्षणिक संस्था विद्यापीठे यामधील विद्यार्थी , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी , शासकीय व निमशासकीय कार्यालये , केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधीत कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी ,  खाजगी आस्थापना , व्यापारी प्रतिष्ठाने , संस्था यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग अनिवार्य आहे . राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण , वर्ग खाली किंवा हॉल याठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे .
 3 ) ग्रामस्तरावर , वॉर्डस्तरावर ( नगरपालिका / नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका स्तरावर ) सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घ्यावयाचा आहे . 
 4 ) सर्व नागरिकांनी दिनांक 17 ऑगस्ट , 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता आहे त्या ठिकाणी थांबुन राष्ट्रगीत गायन करावयाचे आहे . 
5 ) खाजगी आस्थापना व्यापारी प्रतिष्ठाने , संस्था , शासकीय व निमशासकीय कार्यालये , केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधीत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. 


*-अनिल महामुने,*
गट शिक्षणाधिकारी
पंचायत समिती, किनवट

प्रतिलिपी :
1.विस्तार अधिकारी(शिक्षण) / केंद्र प्रमुख (सर्व) , पंचायत समिती , किनवट , आपणास देऊन कळविण्यात येते की, हा संदेश आपल्या अधिनस्त सर्व शाळांपर्यंत पोहचवावा. कार्यक्रमाचे व्हिडिओ व फोटो लिंकवर अपलोड करण्यास मुख्याध्यापकांना सांगावे.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025