*तात्काळ महत्वाचे*
9 ऑगस्ट क्रांतीदिनि मानवी
साखळी तयार करणेबाबत
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात मानवी साखळी करावयाची आहे. यामधून एकात्मतेची भावना निर्माण होईल. यावेळी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा संकल्प करण्यात यावा. यासाठी गट विकास अधिकारी यांनी नियोजन करून प्रत्येक गावात मानवी साखळी करावी. यामध्ये शाळा-महाविद्यालय, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, ग्राम पंचायत येथे एकमेकांच्या हातात हात घेऊनक्षमानवी साखळी तयार करावी. यामध्ये
शालेय विद्यार्थी, महिला, युवक-युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. मानवी साखळी करताना मुलांची, महिलांची आणि पुरुषांची स्वतंत्र मानवी साखळी करावी.
या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ ग्रुपवर शेअर करावेत.
No comments:
Post a Comment