Youtube

Youtube
Chanel

Sunday, 27 February 2022

स्वच्छ विद्यालय पुरस्कार नोंदणी

*महत्त्वाचे*
प्रति, 
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग),
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व ),
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व जिल्हे),
शिक्षणाधिकारी (प्राथ.)  / (माध्य ), (सर्व जिल्हे),
शिक्षण उपनिरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) मुंबई,
शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी  (सर्व म.न.पा./न.पा.),
प्रशासन अधिकारी (सर्व नगर परिषद).

*विषय* - स्वच्छ विद्यालय पुरस्कार या स्पर्धेसाठी शाळांची नोंदणी वाढवणे बाबत...

भारत सरकारने स्वच्छ भारत, अभियानाअंतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’साठी स्पर्धेची घोषणा केली आहे. शाळेतील पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि कोव्हीड-19 संदर्भातील कामे यांच्या आधारे ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेमध्ये शहरी, ग्रामीण, शासकीय- निमशासकीय, अशासकीय, निवासी- अनिवासी कोणतीही शाळा सहभागी होऊ शकते. 
        स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी शाळांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम येण्यासाठी आपण ही पोस्ट व या संदर्भातील माहिती आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक,शिक्षक,क्षेत्रीयअधिकारी यांच्यापर्यंत पोहोचविण्यात यावी. तसेच सदर स्वच्छ विद्यालय पुरस्कार अंतर्गत शाळांची नोंदणी वाढावी यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
 *स्पर्धेत सहभागी होण्यासाठी करावयाची प्रक्रिया :* 
1.या स्पर्धेसाठी मोबाईल ॲप किंवा थेट वेबसाईटच्या माध्यमातून सहभागी होता येते. यासाठी पुढीलपैकी कोणत्याही एका लिंकचा वापर करता येईल. 
मोबाईल ॲपसाठी : https://play.google.com/store/apps/details?id=com.glt.svp2122
वेबसाईटसाठी : https://www.swachhvidyalayapuraskar.com 
2.या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची पद्धत अत्यंत सोपी असून केवळ यु-डायस कोडच्या आधारे नोंदणी करायची आहे. 
3. वरील पद्धतीने नोंदणी केल्यानंतर एक फॉर्म येईल. त्यातील सर्व प्रश्नांची वस्तुस्थितीनुसार माहिती भरावी. आवश्यक ठिकाणी फोटो अपलोड करावेत व फॉर्म सबमिट करावा. 
4.फॉर्म भरण्यापूर्वी तो पूर्णपणे वाचावा, शक्य झाल्यास प्रिंट घ्यावी व त्यात कच्ची माहिती भरावी व नंतरच ऑनलाईन प्रवेश करून पक्की माहिती भरावी, जेणे करुन काही अडचण येणार नाही. 
5.एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर काही बदल करता येणार नाही.मात्र अपलोड केलेले फोटो केव्हाही बदलता येऊ शकतात. फॉर्म जोपर्यंत सबमिट केला जात नाही तोपर्यंत अनेकदा त्यात बदल करता येऊ शकतो. शिवाय एकाच वेळी सर्व फॉर्म भरणे शक्य झाले नसल्यास पुन्हा तो भरता येतो. 
6.ॲप किंवा वेबसाईटवर फॉम हिंदी किंवा इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. आपल्या सोयीसाठी या फॉर्मची मराठी प्रत सोबतच्या लिंकमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ती अभ्यासून हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा पर्याय निवडून फॉर्म भरावा. 
https://docs.google.com/document/d/1QdWCdFldtIRswcJ2exANqlfX3PEE5cF3/edit?usp=sharing&ouid=113412126224953123073&rtpof=true&sd=true 

 *स्पर्धेत सहभागी होण्याचा कालावधी* : 
31 मार्च 2022 ही शाळांनी नामांकन सादर करण्याची शेवटची तारीख आहे, मात्र शेवटच्या क्षणाला वेबसाईटवर  ताण वाढून अडथळे निर्माण होण्याचा अनुभव लक्षात घेता त्या आधीच नामांकन नोंदविणे सोयीचे होईल. स्पर्धेचा अंतिम निकाल राष्ट्रीयस्तरावरुन 15 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर होईल.

 *नोंदणी केलेल्या शाळांची मूल्यांकन प्रक्रिया*  :
1.शाळेने भरलेल्या माहितीच्या आधारे शाळेतील पाणी,स्वच्छता व आरोग्य तसेच कोव्हीड-19 संबंधित कार्य कोणत्या स्तराचे आहे त्याआधारे शाळेला एक ते पाच स्टार पर्यंत गुण मिळतील. 
2.सर्व स्पर्धा ही 110 गुणांची असून ज्या शाळांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण असतील  त्या शाळांना पाच स्टार तर ज्या शाळांना 35 टक्के पेक्षा कमी गुण असतील त्यांना एक स्टार दिला जाईल. त्याआधारे जिल्हास्तर, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर यावर शाळांची विविध टप्प्यात तपासणी होऊन शाळांची निवड होणार आहे. राष्ट्रीय पातळीवर 46 शाळा, राज्य पातळीवर 26 शाळा व जिल्हा पातळीवर 38 शाळांची निवड करण्यात येईल. स्पर्धेच्या पारितोषिकामध्ये  रोख रक्कम व प्रमाणपत्राचा समावेश आहे.

तरी जास्तीत जास्त  मुख्याध्यापक व शिक्षक यांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार या स्पर्धेसाठी शाळांची नोंदणी करावी, यासाठी  आपल्या अधिनस्थ शाळा,मुख्याध्यापक,शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्यात यावी. तसेच सदर स्वच्छ विद्यालय पुरस्कार अंतर्गत शाळांची नोंदणी वाढावी यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

सोबत स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी शाळांच्या नोंदणीची  जिल्हानिहाय सद्यस्थिती.....


*एम.डी. सिंह.*
*संचालक*,
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025