Youtube

Youtube
Chanel

Monday, 28 February 2022

विज्ञान दिन 28 फेब्रुवारी

सर्वांना नमस्कार!
आपल्या सर्वांचा आवडता विज्ञान दिन २८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. श्रीमती. इंद्राणी बालन विज्ञान केंद्र, आयसर, पुणे तर्फे आम्ही  उद्या (सोमवार) रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा ऑनलाइन पद्धतीने साजरा करीत आहोत.

शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग तसेच सर्वच विज्ञानप्रेमींसाठी गणित, विज्ञान आदी विषयांवर अनेक आकर्षक व्याख्याने, प्रात्यक्षिके, प्रश्नमंजुषा, टॉयफेस्ट, शास्त्रज्ञांशी गप्पा असे रंजक कार्यक्रम या निमित्ताने आम्ही आयोजित केले आहेत. आपण सर्वजण या कार्यक्रमाचा आनंद लुटू शकता.

📆 सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 
🕤 वेळ: सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत 

▶️ लिंक: https://youtu.be/_7u4K84DXsw

कृपया सोबत दिलेले वेळापत्रक व यूट्यूब लिंक पहा, ज्यावर सर्व कार्यक्रम थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. आपल्या सोबतच आपल्या मित्रपरिवारास सुद्धा ही माहिती पोहचवून या आनंदात सहभागी करून घ्या.

धन्यवाद!
विज्ञान केंद्र, आयसर पुणेच्या सर्व सहकाऱ्यांतर्फे आग्रहाचे आमंत्रण

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025