Youtube

Youtube
Chanel

Sunday, 29 August 2021

स्वाध्याय

स्वाध्याय लींक टच कर

दुसरी ते आठवी स्वाध्याय

*स्वाध्याय वर पाचव्या आठवड्यात १८ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी!!!*

स्वाध्याय ७वा आठवडा सुरू

ह्या आठवड्या मध्ये SWADHYAY वर उपलब्ध:
माध्यम – मराठी, English, semi- English आणि उर्दू
विषय – गणित

इयत्ता: २ रि ते १० वी (प्रत्येक इयत्ते चे १५ प्रश्न असतील)

सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -

https://wa.me/918595524419?text=hello

एम.डी.सिंह (भाप्रसे)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

नांदेड जिल्ह्यासाठी कोबो ॲप लिंक

नांदेड जिल्ह्यासाठी कोबो ॲप लिंकटच करा

Thursday, 26 August 2021

प्रशिक्षण लिंक

प्रशिक्षण लिंक टच करा

स्वच्छता आराखडा प्रशिक्षण

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आयोजित नांदेड जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी शाळा स्वच्छता आराखडा प्रशिक्षण*

प्रति,
गटशिक्षणाधिकारी
पं. स. सर्व , नांदेड जिल्हा

खालील वेळापत्रकाप्रमाणे उद्या दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी शाळा स्वच्छता आराखडा ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.. याचे कार्यालयीन पत्र अगोदर पाठवण्यात आले आहे.. तरी सदरील ऑनलाईन प्रशिक्षणास आपल्या अधिनस्त *इयत्ता 1 ली ते 8 वी मराठी माध्यमाच्या च्या सर्व व्यवस्थापनाच्या  शाळांच्या* शिक्षकांना , 100% केंद्रप्रमुख यांना खालील youtube लिंकवर सकाळी ठीक 10.55 वाजता जॉईन होण्यास सांगावे..ही पोस्ट सर्वांपर्यंत आजच पोचवावी..

                      - वेळापत्रक-

दिनांक 27/8/2021

 सकाळी 11 ते 11:20
*उद्घाटन प्रस्तावना व पूर्व चाचणी*

11.20 ते 12:00
*स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय उपक्रम*

12:00ते 12.30
*हात धुण्याच्या सुविधांचे तंत्र विकसित करताना लक्षात घ्यावयाचे गोष्टी*

1:00 ते 1:30
*कोरोना आणि शाळा*

1.30 ते 2:00
*शालेय पाणी स्वच्छता व आरोग्य यांचे मुख्य भागीदार व त्यांची भूमिका*

2.30 ते 3:00
*टाळेबंदी च्या काळात मुलांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व covid-19 बद्दलचे समज गैरसमज*

3:00 ते 3.30
*Kobo ॲप प्रश्न उत्तर आणि उत्तर चाचणी*

*वरील विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन होणार आहे.*

https://youtu.be/NIrhPWcKl00

आदेशावरून,
प्राचार्य
DIET नांदेड

Monday, 23 August 2021

निपून भारत मिशन लिंक

निपून भारत मिशन लिंक

निपून भारत मिशन

📌*महत्त्वाचे*📌

 *प्रति,* 
विभागीय शिक्षण उपसंचालक,सर्व
उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण,सर्व
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था  (सर्व ),
शिक्षणाधिकारी प्राथ.माध्य. (सर्व)
प्रशासन अधिकारी, मनपा (सर्व)

 📝*विषय: " *निपुण भारत मिशन (FLN)अंतर्गत 1 दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेस उपस्थित राहणेबाबत... "*                                           

              उपरोक्त विषयानुसार,
देशातील प्रत्येक मुलाने *पायाभूत भाषिक साक्षरता व  संख्याज्ञान*प्राप्त करावे या उद्देशाने दि.5 जुलै 2021रोजी निपुण भारत मिशन(FLN मिशन) चे उदघाटन करण्यात आले.हे मिशन संपूर्ण देशभरात राबविण्यात येणार आहे.त्याविषयी उद्बोधन करण्यासाठी राष्टीय पातळीवरून 1 दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

🗓️*कार्यशाळा दिनांक -24 ऑगस्ट 2021*

⏳*कालावधी -सकाळी 10.30 ते 5.30*

📧कार्यशाळेची यु ट्यूब लिंक

https://youtu.be/FsNQPI3d1sw
📌 सदर कार्यशाळेसाठी प्राचार्य डायट,शिक्षणाधिकारी,वरिष्ठ अधिव्याख्याता,गशिअ,
अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,विषय सहायक,विषय साधन व्यक्ती,मुख्याध्यापक,शिक्षक तसेच CRG सदस्य यांनी पूर्णवेळ  उपस्थित  राहणे आवश्यक आहे.तरी सदर कार्यशाळेबाबत whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी व शिक्षक यांच्यापर्यंत ही माहिती पोहचवावी व  सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी.

   -
एम.डी. सिंह (भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे

Sunday, 22 August 2021

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून

💥 *RIMC Exam राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा*

*परीक्षेचे आवेदनपत्र कसे मागवावे व कोठे पाठवावे❓* 
*https://cutt.ly/gQ80MXO*

🔖 *परीक्षेची तारीख*- 18.12.2021

🔖 *गणित, सामान्य ज्ञान, इंग्रजी* या विषयावर परीक्षा असेल. 

🔖 इ. 7वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल. *(फक्त मुलांसाठी)*

🔖 *परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे वय 13 वर्षापेक्षा जास्त नसावे*
➖➖➖➖➖➖➖➖
📚 *सेतू अभ्यासक्रम Bridge Course PDF व सेतू चाचणी क्र. 1, 2 व 3 प्रश्नपत्रिका*
*https://bit.ly/Bridge-Course-pdf-std2-to-std10*
➖➖➖➖➖➖➖➖
➡️ *Share with your friends*

Wednesday, 18 August 2021

कोबो अॅप लींक

कोबोॲप लिंक

cobo app

दि.17.08.2021

प्रति,
     मा. शिक्षणाधिकारी,मनपा,नांदेड.
     गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)
     जिल्हा-नांदेड.

विषय – शाळा स्वच्छता कृती आराखडा जिल्हास्तरीय प्रशिक्षणाबाबत…

संदर्भ - मा.संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य पुणे.जा.क्र. मराशैसंप्रप/कला क्रीडा/शाळा स्वच्छता प्र./२०२१/२६०९  दि. १३/०८/ २०२१ 

    उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शाळा स्वच्छता कृती आराखडा या विषयाबाबत राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण दिनांक 9 जून 2021 ते 12 जून 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे,युनिसेफ व CYDA, पुणे यांच्या वतीने हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातून दहा शिक्षकांची निवड करून त्यांना राज्यस्तरावर प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. या राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतलेल्या दहा मास्टर ट्रेनर च्या साह्याने आपल्या जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षणासाठी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 23 ऑगस्ट 2021 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत शाळा स्वच्छता कृती आराखडा या विषयाबाबत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. सदरील प्रशिक्षणासाठी इयत्ता 1 ली  ते 8 वीच्या सर्व शिक्षकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत मुलांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी मुला-मुलींसाठी तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालय,साबण व पाण्याने हात धुण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. या उपलब्ध सुविधा बाबत जिल्हा परिषद शाळांची सद्यस्थिती जाणून घेणे तसेच शाळांमध्ये पिण्याचे पाणी,स्वच्छता, आरोग्य विषयीचे बेंचमार्किंग निश्चित करण्यात येणार आहे. हे बेंचमार्किंग करण्यासाठी युनिसेफ व CYDA, पुणे यांनी कोबो ॲप्लीकेशन तयार केलेले आहे,हे  ॲप्लीकेशन अँड्रॉइड मोबाईल वर play store  मध्ये उपलब्ध आहे. या अप्लिकेशन मध्ये पिण्याचे पाणी,स्वच्छता व आरोग्य विषयाच्या प्रश्नांची माहिती भरल्यानंतर शाळेचे बेंचमार्किंग निश्चित होईल.या बेंचमार्किंग मध्ये प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे शाळा मध्ये कोणत्या गोष्टी कराव्या लागतील हे विचारात घेऊन शाळा स्वच्छता कृती आराखडा तयार करता येईल. अशा पद्धतीने प्रत्येक शाळेचा शाळा स्वच्छता आराखडा तयार झाल्यास स्थानिक पातळीवरील अशासकीय संस्था व सी.एस.आर च्या माध्यमातून शाळांमध्ये आवश्यक बदल व सुविधा प्राप्त करून घेण्यास मदत होईल
कोबो ॲप्लीकेशन चा वापर करून शाळांमधील पिण्याचे पाणी स्वच्छता व आरोग्य इ.विषयीच्या प्रश्नांची वस्तुस्थितीदर्शक माहिती भरण्याबाबत जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख व राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतलेल्या प्रत्येक जिल्ह्यातील दहा मास्टर ट्रेनर चे ऑनलाईन प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे,युनिसेफ व CYDA यांच्या प्रतिनिधीकडून दिनांक 20 ऑगस्ट 2021  रोजी 11.00 ते 12.30  या वेळेत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी खालील युट्युब लिंक द्वारे सहभागी होता येईल.
https://youtu.be/NzMnv8sPJss 
शाळा स्वच्छता कृती आराखडा जिल्हास्तरीय प्रशिक्षण तसेच कोबो ॲप्लीकेशनबाबत केंद्रप्रमुखांचे प्रशिक्षण याबाबतची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व केंद्रप्रमुख  व १०  मास्टर ट्रेनर (सुलभक) यांना देण्यात यावी.

सोबत-1.संदर्भीय पत्राची प्रत.
         2.जिल्हास्तर सुलभक यादी.      

         
                  प्राचार्य,
           (डॉ.रवींद्र अंबेकर)  
 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,      
                  नांदेड.                                                                                                
  
प्रत माहितीस्तव सविनय सादर-
मा.संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व    प्रशिक्षण परिषद,पुणे माहितीस्तव सविनय सादर. 

माहितीस्तव व कार्यवाहीस्तव –
मा.शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.नांदेड.

अभ्यास माला टू पॉईंट झिरो

*अभ्यासमाला २.०*
*शाळा बंद, पण शिक्षण आहे!*

*दिवस पासष्टावा*
*बुधवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२१*

नमस्कार!

   २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील या अभ्यासमालेत दररोज इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विषयाच्या अभ्यासासाठी DIKSHA Application वरील ई-साहित्य लिंक दिली जाणार असून आपल्या शिक्षक/ पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे ई-साहित्य पाहून त्यावर स्वयंअध्ययन करावे. अधिक अभ्यासासाठी DIKSHA Application वरील संदर्भ साहित्य, स्वाध्याय यांचाही वापर करावा.

या अभ्यासमालेतील लिंक्स पाहण्यासाठी आपल्याकडे मोबाईलमध्ये DIKSHA app असणे आवश्यक आहे. DIKSHA app डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा
http://bit.ly/3znMBI2

आजपासून आपण आपापल्या वर्गांचा नियमित अभ्यास सुरू करत आहोत....चला तर मग! सुरुवात करूया अभ्यासाला!
                                                                                               
*आजचा विषय-  इंग्रजी*

*इयत्ता पहिली*
Welcome Song 
http://bit.ly/3xRE3Hs

*इयत्ता दुसरी*
Bounce a ball
http://bit.ly/2VSIUuC

*इयत्ता तिसरी*
Playtime 
http://bit.ly/3xPZ05z

*इयत्ता चौथी*
Action Song 
http://bit.ly/2VYaC98

*इयत्ता पाचवी*
Songs and Greetings 
http://bit.ly/3syghzj

*इयत्ता सहावी*
Songs of Happiness
http://bit.ly/3spt1rF

*इयत्ता सातवी*
 It's a small world 
http://bit.ly/3AP5PpP


*इयत्ता आठवी*
Be the best 
http://bit.ly/3sptdqT

*इयत्ता नववी*
Walk a little slower 
http://bit.ly/3xPZrNf

*इयत्ता दहावी*
A Teenager's Prayer 
http://bit.ly/3xKUjde


*विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी*
१) वनस्पती : रचना व कार्ये मूळ
http://bit.ly/3sp7rnp

२) वनस्पती : रचना व कार्येफुले, फळे व बिया
http://bit.ly/37VhwyF

इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. - सह्याद्री वाहिनीवर सुरू असणाऱ्या Live तासिका पाहण्यासाठीची लिंक
https://youtube.com/c/DoordarshanSahyadri

*(घरी राहा, सुरक्षित राहा!)*

*एम. डी. सिंह (भा. प्र. से.)*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

(या अभ्यासमालेचे सर्व हक्क संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,  पुणे यांच्याकडे असून  त्यांच्या लेखी परवानगीशिवाय ही अभ्यासमाला किंवा अभ्यासमालेचा अंश कोणालाही त्यांच्या ब्लॉग/संकेतस्थळावरून प्रकाशित करता येणार नाही.)

Tuesday, 17 August 2021

आई बाबांची शाळा

*आई बाबांची शाळा जिल्हास्तर उपक्रम नांदेड*
  ✍️ मा. CEO जिल्हा परिषद नांदेड यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने व DITE नांदेड व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात आई बाबांची शाळा हा  जिल्हास्तर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 ✍️ त्यासाठी या उपक्रमांतर्गत मा.अनिलकुमार महामुने साहेब गशिअ  किनवट व मा.पांचाळ ना. ना. शिविअ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  केंद्र नयाकॅम्प अंतर्गत इयत्ता पहिली व दुसरीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी केंद्र स्तर ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक 17/08/2021 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आले आहे. सर्व व्यवस्थापन शाळा मुख्याध्यापकांनी आपल्या अधिनस्त शिक्षकांना माहिती द्यावी. 
     तरी सदरील प्रशिक्षण join करण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा.इयत्ता पहिली, दुसरी अध्यापन करणा-या सर्व शिक्षकांनी उपस्थित रहावे. (मराठी, उर्दू, इंग्रजी शाळा) 
Join with Google Meet: https://meet.google.com/yis-mfye-fpq

     केंद्र प्रमुख नयाकॅम्प

Friday, 13 August 2021

सहा ते आठ साठी लिंक

सहा ते आठ साठी लिंक

एक ते पाच साठी लिंक

1to 5 साठी लिंक

शिकू आनंदे

*महत्त्वाचे* 

 *प्रति,* 
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था  (सर्व ),
शिक्षणाधिकारी प्राथ.माध्य. (सर्व)
प्रशासन अधिकारी, मनपा (सर्व)

 विषय: " *शिकू  आनंदे* "(Learn with Fun)  या उपक्रमाबाबत .....                                                   

       उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व  शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.  शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त होती. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या  शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये  निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत  इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.3 जुलै 2021 पासून  online पद्धतीने *“शिकू  आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम  सुरू करण्यात आला आहे. दि. 14 ऑगस्ट 2021 रोजीच्या सत्रात  *नृत्य, गायन, कागदकाम व मुलाखत*  या विषयाबाबत  तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल. 

https://youtu.be/828hExG-BcY

 स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.

https://youtu.be/kfSmmnZU520

 याबाबत वरिष्ठ अधिव्याख्याता, गशिअ,अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,विषय सहायक  यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.तसेच whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व  शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी.जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी.

   -
एम.देवेंदर सिंह (भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे

Thursday, 12 August 2021

पाचवी स्कॉलरशिप आंसर की

5 वी स्कॉलरशिप अन्सर की

स्कॉलरशिप परीक्षेला जाताना

*आज झालेल्या नवोदय परीक्षेच्या सर्व W,X,Y,Z सेट च्या सर्व 80 प्रश्नांची उत्तरसूची पहा फक्त 5 मिनिटांत👇*

https://youtu.be/RABmZcJMSZc

*5वी व 8वी स्कॉलरशिप परीक्षेला जाण्याआधीचा मास्टर प्लॅन व पेपर लिहितानाचा Mind Set असाच ठेवा... हे नियोजन प्रत्येकाने वापराचं👇*
वर्षभराची मेहनत या 17 मिनिटांत 

https://youtu.be/LO50G0c-SD0

👆सर्व गोष्टी एकाच ठिकाणी
*पेपरला जाण्यापूर्वी तयारी काय असावी.?? 
*पेपर कसा लिहावा...Time Management कसे करावे.
*कोणत्या विषयाला गुण  किती व कसे मिळवायचे..
*रोज Live फ्री मार्गदर्शन,ध्येय राज्यस्तरीय सिलेक्शन*.उपक्रम...🙏
*Rapid study(Quick Revision)पूर्ण झाला 👍*
*शेवटच्या दिवसांत घाबरून न जाता...संपूर्ण 4 विषयांच्या सर्व प्रकरणांचा अभ्यास करा फक्त काही तासांत👇*
*एवढेच पहा आणि सिलेक्ट व्हा👇*
1)8वी स्कॉलरशिप मराठी संपूर्ण प्रकरणे-Rapid Study(Revision)👇
https://youtu.be/wwZoCTddurs
2)8वी स्कॉलरशिप गणित संपूर्ण प्रकरणे-Rapid Study(Revision)👇👇
https://youtu.be/eLuyfq-5W_o
3)8वी स्कॉलरशिप इंग्रजी संपूर्ण प्रकरणे-Rapid Study(Revision)👇👇
https://youtu.be/dadDd1PxdF0
4)8वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता संपूर्ण प्रकरणे-Rapid Study(Revision)👇👇
https://youtu.be/fhf4z23-m80
*8वी स्कॉलरशिप परीक्षा-सन 2017,2018,2019,2020 प्रश्नपत्रिका उत्तरांसह... यांचा सराव कराच👇
*मराठी प्रश्नपत्रिका👇
https://youtu.be/zXheHBbHIpY
*गणित प्रश्नपत्रिका👇
https://youtu.be/QsLayPN9GSg
*इंग्रजी प्रश्नपत्रिका👇
https://youtu.be/L0yhT2GlXYM
*बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका👇
Part-1
https://youtu.be/0EBn3LvuBqw
Part-2
https://youtu.be/3FkVWf_XphQ
*एखादे प्रकरण अवघड जात असेल तर सर्व विषय प्रकरणनिहाय अगदी सखोल पहा👇
https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxFXBcm3OKwZk3R1Se5YzEMx
*5वी स्कॉलरशिप संपूर्ण अभ्यास*
*रोज Live फ्री मार्गदर्शन,ध्येय राज्यस्तरीय सिलेक्शन*.उपक्रम...🙏
*Rapid study(Quick Revision)पूर्ण झाला 👍*
*शेवटच्या दिवसांत घाबरून न जाता...संपूर्ण 4 विषयांच्या सर्व प्रकरणांचा अभ्यास करा फक्त काही तासांत👇*
*एवढेच पहा आणि सिलेक्ट व्हा👇*
1)5वी स्कॉलरशिप भाषा-मराठी संपूर्ण प्रकरणे-Rapid Study(Revision)👇
https://youtu.be/ZmrJKffo9xU
2)5वी स्कॉलरशिप गणित संपूर्ण प्रकरणे-Rapid Study(Revision)👇
https://youtu.be/q8248mK6qr8
3)5वी स्कॉलरशिप इंग्रजी संपूर्ण प्रकरणे-Rapid Study(Revision)👇
https://youtu.be/n6yGwXtO6Is
4)5वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता संपूर्ण प्रकरणे-Rapid Study(Revision)👇
https://youtu.be/hD3GmecVGc8
*5वी स्कॉलरशिप परीक्षा-सन 2017,2018,2019,2020 प्रश्नपत्रिका उत्तरांसह... यांचा सराव कराच👇
*मराठी प्रश्नपत्रिका👇
https://youtu.be/VKo_sw2TLSE
*गणित प्रश्नपत्रिका👇
https://youtu.be/TxNuCvr_dqk
*इंग्रजी प्रश्नपत्रिका👇
https://youtu.be/GjBywWRp5s0
*बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका👇
https://youtu.be/HHe1LExoFIY
*एखादे प्रकरण अवघड जात असेल तर सर्व प्रकरणनिहाय अगदी सखोल पहा👇
*संपूर्ण गणित 👇
https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxEz72K8MJeG99TLeKndEJVw
*संपूर्ण मराठी👇
https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxE33Zi5qEzNPP36BhysDK3C
*संपूर्ण बुद्धिमत्ता 👇
https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxGvwRDr_Z5xTCQWjbPIrfR2
*संपूर्ण इंग्रजी 👇
https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxElXeYhXZ4z2kHi0HykkXAi

*All the Best*

नवोदय परीक्षेचा निकाल टच करून पहा

नवोदय परीक्षेचा निकाल पहा

Wednesday, 4 August 2021

आई बाबांची शाळा

आई बाबांची शाळा

आई बाबांची शाळा

https://youtu.be/5rD-GGSsX_U

*आई बाबांची शाळा जिल्हास्तरीय कार्यशाळा 2*

*दि.04/08/2021*
*सकाळी 11 वाजता*
*Youtube live*

DIET NANDED is inviting you to a Youtube live meeting.

Topic: आई - बाबांची शाळा - जिल्हास्तरीय सुलभकांचे ऑनलाईन प्रशिक्षण 

✒️ मा. CEO जिल्हा परिषद नांदेड यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने व DIET नांदेड व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात आई बाबांची शाळा हा उपक्रम दिनांक 17 ऑगस्ट 2021 पासून प्रत्यक्ष पालक व विद्यार्थी यांच्यासोबत सुरू होणार आहे.. 

✒️त्यासाठी प्रत्येक केंद्रातून 1 ली व 2 री ला अध्यापन करणाऱ्या प्रत्येकी 3 शिक्षकांची ऑनलाईन लिंकद्वारे माहिती मागवण्यात आली होती.. ही यादी या पोस्टसोबत जोडण्यात येत आहे.

✒️ जिल्हास्तर ऑनलाईन प्रशिक्षण 3 ते 6 ऑगस्ट 2021 या कालावधीत (4 दिवस) घेणे नियोजित होते परंतु आपण *4 दिवसांऐवजी उद्या दिनांक 4 ऑगस्ट 2021 रोजी दुसरे सत्रात जिल्ह्यातील सर्व सुलभकांचे मराठी विषयाचे प्रशिक्षण खालील YOUTUBE वर  सकाळी ठीक 11 वाजता  आयोजित करण्यात आले आहे.*

https://youtu.be/5rD-GGSsX_U

✒️ तरी ही लिंक सर्व केंद्रप्रमुख यांनी आपल्या यादीतील शिक्षकांना पाठवून उद्या वेळेवर जॉईन होण्यासाठी सूचित करावे.. 

✒️ तालुका समन्वयक यांनीदेखील सर्व केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क साधून ही लिंक शिक्षकांना पाठवण्याबाबत सूचित करावे व वेळेवर जॉईन होण्यास सांगावे...


प्राचार्य
DIET नांदेड.

धूमकेतू Dhumketu 2025