दि.17.08.2021
प्रति,
मा. शिक्षणाधिकारी,मनपा,नांदेड.
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)
जिल्हा-नांदेड.
विषय – शाळा स्वच्छता कृती आराखडा जिल्हास्तरीय प्रशिक्षणाबाबत…
संदर्भ - मा.संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य पुणे.जा.क्र. मराशैसंप्रप/कला क्रीडा/शाळा स्वच्छता प्र./२०२१/२६०९ दि. १३/०८/ २०२१
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शाळा स्वच्छता कृती आराखडा या विषयाबाबत राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण दिनांक 9 जून 2021 ते 12 जून 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे,युनिसेफ व CYDA, पुणे यांच्या वतीने हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातून दहा शिक्षकांची निवड करून त्यांना राज्यस्तरावर प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. या राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतलेल्या दहा मास्टर ट्रेनर च्या साह्याने आपल्या जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षणासाठी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 23 ऑगस्ट 2021 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत शाळा स्वच्छता कृती आराखडा या विषयाबाबत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. सदरील प्रशिक्षणासाठी इयत्ता 1 ली ते 8 वीच्या सर्व शिक्षकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत मुलांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी मुला-मुलींसाठी तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालय,साबण व पाण्याने हात धुण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. या उपलब्ध सुविधा बाबत जिल्हा परिषद शाळांची सद्यस्थिती जाणून घेणे तसेच शाळांमध्ये पिण्याचे पाणी,स्वच्छता, आरोग्य विषयीचे बेंचमार्किंग निश्चित करण्यात येणार आहे. हे बेंचमार्किंग करण्यासाठी युनिसेफ व CYDA, पुणे यांनी कोबो ॲप्लीकेशन तयार केलेले आहे,हे ॲप्लीकेशन अँड्रॉइड मोबाईल वर play store मध्ये उपलब्ध आहे. या अप्लिकेशन मध्ये पिण्याचे पाणी,स्वच्छता व आरोग्य विषयाच्या प्रश्नांची माहिती भरल्यानंतर शाळेचे बेंचमार्किंग निश्चित होईल.या बेंचमार्किंग मध्ये प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे शाळा मध्ये कोणत्या गोष्टी कराव्या लागतील हे विचारात घेऊन शाळा स्वच्छता कृती आराखडा तयार करता येईल. अशा पद्धतीने प्रत्येक शाळेचा शाळा स्वच्छता आराखडा तयार झाल्यास स्थानिक पातळीवरील अशासकीय संस्था व सी.एस.आर च्या माध्यमातून शाळांमध्ये आवश्यक बदल व सुविधा प्राप्त करून घेण्यास मदत होईल
कोबो ॲप्लीकेशन चा वापर करून शाळांमधील पिण्याचे पाणी स्वच्छता व आरोग्य इ.विषयीच्या प्रश्नांची वस्तुस्थितीदर्शक माहिती भरण्याबाबत जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख व राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतलेल्या प्रत्येक जिल्ह्यातील दहा मास्टर ट्रेनर चे ऑनलाईन प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे,युनिसेफ व CYDA यांच्या प्रतिनिधीकडून दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी 11.00 ते 12.30 या वेळेत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी खालील युट्युब लिंक द्वारे सहभागी होता येईल.
https://youtu.be/NzMnv8sPJss
शाळा स्वच्छता कृती आराखडा जिल्हास्तरीय प्रशिक्षण तसेच कोबो ॲप्लीकेशनबाबत केंद्रप्रमुखांचे प्रशिक्षण याबाबतची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व केंद्रप्रमुख व १० मास्टर ट्रेनर (सुलभक) यांना देण्यात यावी.
सोबत-1.संदर्भीय पत्राची प्रत.
2.जिल्हास्तर सुलभक यादी.
प्राचार्य,
(डॉ.रवींद्र अंबेकर)
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,
नांदेड.
प्रत माहितीस्तव सविनय सादर-
मा.संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे माहितीस्तव सविनय सादर.
माहितीस्तव व कार्यवाहीस्तव –
मा.शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.नांदेड.
No comments:
Post a Comment