Sunday, 25 July 2021
Friday, 23 July 2021
Thursday, 22 July 2021
Wednesday, 21 July 2021
करिअर मार्गदर्शन
*प्रति*
मुख्याध्यापक / प्राचार्य
माध्यमिक शाळा / ज्यूनि. कॉलेज (सर्व)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे.
YouTube वर येत्या बुधवार *दि २१ जुलै २०२१* रोजी **वैद्यकीय क्षेत्रातील करिअर* याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.
*विषय ४:. वैद्यकीय क्षेत्रातील करिअर*
**तारीख आणि वेळ:*
*दि २१ जुलै २०२१,*
*सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत*
*युट्युब लिंक*
https://youtu.be/cQaWE_9HD6A
सदर वेबिनार बाबत सर्व *विद्यार्थी, पालक व शिक्षक* यांना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे .
*(दिनकर टेमकर)*
संचालक,
,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Sunday, 18 July 2021
Saturday, 17 July 2021
swadhyay upakram
सर्वांना नमस्कार🙏🏽
*स्वाध्याय उपक्रम* येत्या शनिवार पासून म्हणजेच दिनांक *१७ जुलै २०२१* पासून इयत्ता २ री ते १०वी साठी राज्यभरात सुरू होत आहे.
सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) ज्याप्रमाणे मागील इयत्तेचे महत्त्वाचे घटक / Learning Outcomes यावर आधारित आहे त्याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ४ आठवडे स्वाध्याय मध्ये *मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर (FLN) प्रश्न तसेच मागील इयत्तेच्या महत्वाच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न असणार आहेत.*
*विषय* - भाषा (मराठी/उर्दू) व गणित
या वेळेस स्वाध्याय चे नंबर व लिंक हे प्रत्येक विभागासाठी वेगळे असणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी असलेला क्रमांक व लिंक द्वारे आपण स्वाध्याय वर नोंदणी सुरू करू शकाल.
*आपल्या जिल्ह्याची योग्य लिंक व क्रमांक इथे मिळतील:* https://cutt.ly/0mKkhXJ
*स्वाध्याय साठी नोंद करण्याची पद्धत -*
अतिशय साधी व सरळ पद्धत आहे.
सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व लिंक ची आपल्या फोन मध्ये नोंद करून घ्यावी.
आपल्या स्वाध्याय क्रमांकावर WhatsApp द्वारे “नमस्ते” किंवा “hello” असा मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल.
१. *नवीन विद्यार्थ्यांसाठी:* वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात.
२. *पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी:* वरील प्रक्रिया केल्यावर आपल्याला आपली सध्याची इयत्ता व शाळा विचारली जाईल. शैक्षणिक वर्ष बदलल्या मुळे आपली बदललेली इयत्ता नमूद करावी व शाळा बदललेली असल्यास नवीन शाळेचा योग्य UDISE क्रमांक (स्कूल कोड) नमूद करावा.
जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी व शिक्षक यांनी प्रयत्न करावेत.
*दिनकर टेमकर*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
Thursday, 15 July 2021
सेतु अभ्यासक्रम चाचणी
*ब्रिज कोर्स सेतू अभ्यासक्रम*
*मूल्यमापन चाचणी क्रमांक 1*
सौजन्य-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
सेतू अभ्यासक्रम आधारित मूल्यमापन चाचणी उपलब्ध करून देण्यात येत आहे
🔖🔖🔖
https://www.digitalbrc.in/2021/07/bridge-course-first-test-evaluation.html
🌈🌈🌈
*Bridge Course Evaluation*
🥏🥏🥏
Friday, 9 July 2021
setu abhyaskram
*Bridge course details*
*_सेतु अभ्यासक्रम पूर्ण माहिती_*
📒📕📗📘📙📔📒📕📗📘
_*कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षांमध्ये नियमित शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत "शाळा बंद पण शिक्षण सुरू" सदर उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत होता.मात्र विद्यार्थ्यांमध्ये विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात तसेच मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील वर्गामध्ये प्रविष्ट झाल्या असल्याची शक्यता गृहीत धरूनच राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत सर्वच विद्यार्थ्यांसाठी सेतु (bridge course)अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे*_
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*_यासंदर्भातील शिक्षकांच्या मनामधील प्रश्नांची उकलखालील प्रमाणे_*
🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️
*प्रश्न 1.सेतू अभ्यासक्रम किती दिवसांचा आहे*
_उत्तर--ब्रिज कोर्स हा 45 दिवसांसाठी राबवण्यात येणार आहे यासाठी 1 जुलै 2021 ते 15 ऑगस्ट 2021 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे_
*प्रश्न 2-ब्रिज कोर्स हा कोणत्या इयत्ता पासून राबविण्यात येणार आहे तसेच कोणत्या माध्यमासाठी*
_उत्तर--ब्रिज कोर्स हा इयत्ता 2री ते इयत्ता 10 वी पर्यंतच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यासाठी राबवण्यात येणार आहे._
*प्रश्न 3--ब्रिज कोर्स साठी कोणते विषय आहेत?*
_उत्तर ---ब्रिजकोर्स साठी म्हणजे सेतु अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना मराठी,हिंदी,इंग्रजी,गणित,विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचा समावेश आहे_
*प्रश्न 4--ब्रिज कोर्ससाठी अभ्यासक्रम कोणत्या इयत्तेत असेल?*
_उत्तर--ब्रिज कोर्ससाठी मागील इयत्तांच्या क्षमतेवर आधारित अभ्यासक्रम असेल._
*प्रश्न 5--ब्रिज कोर्स साठी तयार केलेली कृती पत्रिका स्वरूप कसे आहे??*
_उत्तर--सदर कृतीपत्रिका ह्या दिवसांनीहाय देण्यात आल्या असून सदर कृतीपत्रिका या विद्यार्थी केंद्रीत, कृती केंद्रित तसेच अध्ययननिष्पत्ती केंद्रित आहेत. सदर कृतिपत्रिका विद्यार्थी स्वयंम अध्ययन करू शकतील असे आहेत.दिवस एक ते दिवस दोन याप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्या कृतिपत्रिका दिवसांनीहाय पूर्ण करणे अपेक्षित आहे._
*प्रश्न 6--कृतिपत्रिका सोडवण्यासाठी विद्यार्थी मदत घेऊ शकतो का??*
_होय,विद्यार्थी कृतीपत्रिका सोडविण्यासाठी शिक्षक,शिक्षकमित्र,स्वयंसेवी विद्यार्थी मित्र यांच्या मदतीने कृतिपत्रिका सोडवू शकतात._
*प्रश्न 7--कृतीपत्रिका डाऊनलोड करून प्रिंट काढू शकतो का??*
_होय, सर्व कृतीपत्रिका प्रिंट काढून त्यामध्ये सोडवू शकता जेणेकरून शिक्षकांनाही अंतर्गत मूल्यमापनासाठी याचा उपयोग होईल._
*प्रश्न 8--ब्रिजकोर्स वर आधारित चाचणी घेऊ शकतो का??*
_होय, ब्रिज कोर्स मध्ये ठरविक कालावधीनंतर 3 चाचण्या देण्यात आल्या आहेत. त्या विध्यार्थ्यांनी सोडवणे आवश्यक आहे._
*प्रश्न 9--शिक्षकांनी सदर चाचण्या कशा घ्याव्यात??*
_शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेऊ शकतात त्या तपासाव्यात व त्या चाचण्याच्या गुणांची नोंद शिक्षकांकडे असणे आवश्यक आहे._
*प्रश्न 10--ब्रिज कोर्समध्ये संकल्पना समजून घेण्यास अडचणी आल्या तर??*
_यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये लिंक देण्यात आलेली आहे सदर लिंक कॉपी करून दीक्षा ॲप किंवा गुगल क्रोम तेथे पेस्ट करून सदर संकल्पना स्पष्ट करून घेता येतील._
*प्रश्न-11--विद्यार्थ्यांचा सदर सद्यस्थितीत असलेल्या इयत्तेचा अभ्यासक्रम कधी घ्यावा??*
_ब्रिज कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा सद्यस्थितीतील इयत्तांचा अभ्यासक्रम घ्यावा._
*प्रश्न 12--ब्रिज कोर्स साठी कृतीपत्रिका कोणत्या वेबवरून डाऊनलोड कराव्यात??*
_या कृतीपत्रिका WWW.MAA.AC.IN या वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकता_
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*_शब्दांकन_*
_*श्री.मारोती भोसले (सहशिक्षक)*_
_*जि. प. प्रा. शा. पितांबरवाडी केंद्र मारेगाव (व)*_
*संदर्भ...*💁♂️ https://youtu.be/MjtxOtmxZVc
*_निर्मिती_*
*श्री.सचिन द पाटील-पूज्य आचार्य भिसे विद्यालय , कासा डहाणू - (पालघर)9503365239*
Tuesday, 6 July 2021
Saturday, 3 July 2021
Friday, 2 July 2021
learn with fun
प्रति,
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व ),
शिक्षणाधिकारी प्राथ.माध्य. (सर्व)
विषय: " *शिकू आनंदे* "(Learn with Fun) या उपक्रमाबाबत .....
उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्तआहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने *“शिकू आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करत आहोत. मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकवीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असेल. यामध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत इयत्ता १ ली ते ५ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला,शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत. सदरील कार्यक्रमध्ये
https://youtu.be/pomXmGteUL4
या यु ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी.व जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असण्याकरिता ड्रॉईंग कागद,
पेन्सिल,खोड रबर,वॉटर कलर, स्केच पेन,पट्टी, ब्रश, क्ले, ओली माती इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावे.
-
दिनकर टेमकर,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे
Subscribe to:
Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre