*Bridge course details*
*_सेतु अभ्यासक्रम पूर्ण माहिती_*
📒📕📗📘📙📔📒📕📗📘
_*कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षांमध्ये नियमित शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत "शाळा बंद पण शिक्षण सुरू" सदर उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत होता.मात्र विद्यार्थ्यांमध्ये विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात तसेच मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील वर्गामध्ये प्रविष्ट झाल्या असल्याची शक्यता गृहीत धरूनच राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत सर्वच विद्यार्थ्यांसाठी सेतु (bridge course)अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे*_
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*_यासंदर्भातील शिक्षकांच्या मनामधील प्रश्नांची उकलखालील प्रमाणे_*
🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️
*प्रश्न 1.सेतू अभ्यासक्रम किती दिवसांचा आहे*
_उत्तर--ब्रिज कोर्स हा 45 दिवसांसाठी राबवण्यात येणार आहे यासाठी 1 जुलै 2021 ते 15 ऑगस्ट 2021 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे_
*प्रश्न 2-ब्रिज कोर्स हा कोणत्या इयत्ता पासून राबविण्यात येणार आहे तसेच कोणत्या माध्यमासाठी*
_उत्तर--ब्रिज कोर्स हा इयत्ता 2री ते इयत्ता 10 वी पर्यंतच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यासाठी राबवण्यात येणार आहे._
*प्रश्न 3--ब्रिज कोर्स साठी कोणते विषय आहेत?*
_उत्तर ---ब्रिजकोर्स साठी म्हणजे सेतु अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना मराठी,हिंदी,इंग्रजी,गणित,विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचा समावेश आहे_
*प्रश्न 4--ब्रिज कोर्ससाठी अभ्यासक्रम कोणत्या इयत्तेत असेल?*
_उत्तर--ब्रिज कोर्ससाठी मागील इयत्तांच्या क्षमतेवर आधारित अभ्यासक्रम असेल._
*प्रश्न 5--ब्रिज कोर्स साठी तयार केलेली कृती पत्रिका स्वरूप कसे आहे??*
_उत्तर--सदर कृतीपत्रिका ह्या दिवसांनीहाय देण्यात आल्या असून सदर कृतीपत्रिका या विद्यार्थी केंद्रीत, कृती केंद्रित तसेच अध्ययननिष्पत्ती केंद्रित आहेत. सदर कृतिपत्रिका विद्यार्थी स्वयंम अध्ययन करू शकतील असे आहेत.दिवस एक ते दिवस दोन याप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्या कृतिपत्रिका दिवसांनीहाय पूर्ण करणे अपेक्षित आहे._
*प्रश्न 6--कृतिपत्रिका सोडवण्यासाठी विद्यार्थी मदत घेऊ शकतो का??*
_होय,विद्यार्थी कृतीपत्रिका सोडविण्यासाठी शिक्षक,शिक्षकमित्र,स्वयंसेवी विद्यार्थी मित्र यांच्या मदतीने कृतिपत्रिका सोडवू शकतात._
*प्रश्न 7--कृतीपत्रिका डाऊनलोड करून प्रिंट काढू शकतो का??*
_होय, सर्व कृतीपत्रिका प्रिंट काढून त्यामध्ये सोडवू शकता जेणेकरून शिक्षकांनाही अंतर्गत मूल्यमापनासाठी याचा उपयोग होईल._
*प्रश्न 8--ब्रिजकोर्स वर आधारित चाचणी घेऊ शकतो का??*
_होय, ब्रिज कोर्स मध्ये ठरविक कालावधीनंतर 3 चाचण्या देण्यात आल्या आहेत. त्या विध्यार्थ्यांनी सोडवणे आवश्यक आहे._
*प्रश्न 9--शिक्षकांनी सदर चाचण्या कशा घ्याव्यात??*
_शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेऊ शकतात त्या तपासाव्यात व त्या चाचण्याच्या गुणांची नोंद शिक्षकांकडे असणे आवश्यक आहे._
*प्रश्न 10--ब्रिज कोर्समध्ये संकल्पना समजून घेण्यास अडचणी आल्या तर??*
_यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये लिंक देण्यात आलेली आहे सदर लिंक कॉपी करून दीक्षा ॲप किंवा गुगल क्रोम तेथे पेस्ट करून सदर संकल्पना स्पष्ट करून घेता येतील._
*प्रश्न-11--विद्यार्थ्यांचा सदर सद्यस्थितीत असलेल्या इयत्तेचा अभ्यासक्रम कधी घ्यावा??*
_ब्रिज कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा सद्यस्थितीतील इयत्तांचा अभ्यासक्रम घ्यावा._
*प्रश्न 12--ब्रिज कोर्स साठी कृतीपत्रिका कोणत्या वेबवरून डाऊनलोड कराव्यात??*
_या कृतीपत्रिका WWW.MAA.AC.IN या वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकता_
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*_शब्दांकन_*
_*श्री.मारोती भोसले (सहशिक्षक)*_
_*जि. प. प्रा. शा. पितांबरवाडी केंद्र मारेगाव (व)*_
*संदर्भ...*💁♂️ https://youtu.be/MjtxOtmxZVc
*_निर्मिती_*
*श्री.सचिन द पाटील-पूज्य आचार्य भिसे विद्यालय , कासा डहाणू - (पालघर)9503365239*
No comments:
Post a Comment