Youtube

Youtube
Chanel

Thursday, 10 December 2020

फिट इंडिया

*महत्वाचे/तात्काळ* 

 *प्रति,** 
 मुख्याध्यापक/ प्राचार्य सर्व,

 *विषय:* फिट इंडिया मोहिमेअंतर्गत शाळा नोंदणी करणे बाबत.

 उपरोक्त विषयानुसार, केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार फिट  इंडिया मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता 1 ली ते 12 वीच्या शाळांची नोंदणी मुख्याध्यापक /प्राचार्यांनी स्वतः फिट इंडियाच्या  पुढील पोर्टलवर जाऊन करायची आहे.
 https://schoolfitness.kheloindia.gov.in/StaticPage/LandingPage.aspx

शाळा नोंदणी बाबतचा डेमो व्हिडिओ आपणाला https://www.youtube.com/watch?v=TmvNTgFvrYM

या लिंकवर पाहता येईल. नोंदणी करताना computer/Labtop चाच वापर करावा. तसेच खेलो इंडिया च्या app वर 1 ली ते 12 वीच्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकांनी आपली नोंदणी करायची आहे. शाळेत शारीरिक शिक्षण या विषयाचा शिक्षक उपलब्ध नसल्यास मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी या कामासाठी एका सहा. शिक्षकाची नियुक्ती करावी. या कामासाठी नियुक्त सहा. शिक्षकाने आपल्या android फोनवर Khelo India School version  हे app डाऊनलोड करावे. हे app डाऊनलोड करण्यासाठी Andriod मोबाईल असणाऱ्या शिक्षकांनी या
https://play.google.com/store/apps/developer?id=Sports+Authority+of+India

 लिंकचा वापर करावा. तसेच IOS फोन असणाऱ्या शिक्षकांनी

https://apps.apple.com/in/app/khelo-india-school-version/id1535425198

 या लिंकचा वापर करावा. सदर नोंदणीचा demo व्हिडिओ आपल्याला पुढील लिंकवर उपलब्ध होईल. https://www.youtube.com/watch?v=9r0_sy9q85o

या व्हिडिओच्या मदतीने आपल्याला नोंदणी करता येईल. शाळा व शिक्षक नोंदणीची प्रक्रिया 15 डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करावी. नोंदणी करताना सर्व जिल्ह्यातील आयटी शिक्षकांनी याबाबत पुढाकार घेऊन शाळा व शिक्षक नोंदणीसाठी शाळांना सहकार्य करावे. यापूर्वी शाळांची नोंदणी केली असल्यास पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी श्री. आधार मोरे रिजनल मॅनेजर, खेलो इंडिया मो. 8154092339 व रोशन तिवारी मो.9899683557  यांच्याशी संपर्क साधता येईल.
-
 
  संचालक 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025