Monday, 29 July 2019
Saturday, 27 July 2019
Pani foundation
https://www.youtube.com/playlist?list=PLtvWlosIJIDCM4aQoJK0nuw8IlapwkTDw pani foundation
Tuesday, 23 July 2019
Monday, 22 July 2019
Isro
https://www.isro.gov.in/gslv-mk-iii-m1-chandrayaan-2-mission/watch-live-launch-of-gslv-mkiii-m1-chandrayaan2
Friday, 19 July 2019
Class 5
EET AWARENESS EFFORTS: https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KZo951YQf7SycuWcJhxEN7B
Class 4
STD-4 _ Full Syllabus _ BCPT (English E.Teach): https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KaOS8nIr5rl-F0a_MMw5x3C
Class 3
STD-3 _ Full Syllabus _ BCPT (English E.Teach): https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KbKmS5iY3ZOvcc6xhyE-E_l
Gatetogether
का असावे ?
गेट टु गेदर
५० शी नंतर
गेट टू गेदर चे महत्त्व
वरचेवर मित्रांच्या,
मैत्रीच्या संपर्कात
जरूर रहा
मनसोक्त पैसे,
वेळ खर्च करा
आयुष्य
मर्यादित आहे
आणि जीवनाचा
जेंव्हा
शेवट होईल
तेंव्हा
इथली कोणतीच
गोष्ट आपल्या
सोबत
नेता येणार नाही .!
मग जीवनात
खुप काटकसर
कशासाठी
करायची ?
आवश्यक आहे
तो खर्च केलाच
पाहिजे ज्या
गोष्टींतुन आपणास
आनंद मिळतो
त्या गोष्टी
केल्याच पाहिजेत .
आपण गेल्यानंतर
पुढे काय होणार
याची मुळीच
चिंता करु नका .
कारण आपला
देह जेंव्हा
मातीत मिसळून
जाईल तेंव्हा
कुणी आपले
कौतुक केले काय
किंवा टीका
केली काय ?
जीवनाचा आणि
स्वकष्टाने मिळवलेल्या
पैशांचा आनंद
घेण्याची वेळ
निघून गेलेली
असेल ...!
तुमच्या मुलांची
खुप काळजी
करु नका . त्यांना
स्वत:चा मार्ग
निवडू द्या .
स्वतःचे भविष्य
घडवू द्या .
त्यांच्या ईच्छा
आकांक्षाचे
आणि स्वप्नांचे
तुम्ही गुलाम
होऊ नका .
मुलांवर प्रेम करा
त्यांची काळजी
घ्या , त्यांना
भेटवस्तुही द्या.
मात्र काही खर्च
स्वतःवर
स्वतःच्या
आवडी
निवडीवर करा .
जन्मापासून
मृत्युपर्यंत
नूसते राबराब
राबणे म्हणजे
आयुष्य नाही
हे देखील
लक्षात ठेवा .
तुम्ही
पन्नाशीत आहात,
आरोग्याची
हेळसांड करुन
पैसे कमवण्याचे
दिवस आता
संपले आहेत.
पुढील काळात
पैसे मोजून सुद्धा
चांगले आरोग्य
मिळणार नाही .
या वयात
प्रत्येकापुढे
दोन महत्त्वाचे
प्रश्न असतात .
पैसा कमवणे
कधी थांबवायचे
आणि किती पैसा
आपल्याला पुरेल .
तुमच्याकडे
शेकडो हजारो
एकर सुपीक
शेतजमीन असली
तरी तुम्हाला
दररोज किती
अन्नधान्य लागते ?
तुमच्याकडे
अनेक घरे असली
तरी रात्री
झोपण्यासाठी
एक खोली
पुरेशी असते !
एक दिवस
आनंदा शिवाय
गेला तर
आयुष्यातला
एक दिवस तुम्ही
गमावला आहात
एक दिवस
आनंदात गेला तर
आयुष्यातला
एक दिवस तुम्ही
कमावला आहात
हे लक्षात असू द्या.
आणखी एक
गोष्ट तुमचा
स्वभाव खेळकर
उमदा असेल
तर तुम्ही
आजारातून
बरे व्हाल आणि
तुम्ही कायम
प्रफुल्लीत असाल
तर तुम्ही आजारी
पडणारच नाहीत .
सगळ्यात
महत्वाचे
म्हणजे
आजूबाजूला
जे जे उत्तम आहे
उदात्त आहे
त्याकडे पहा .
त्याची
जपणूक करा
आणि हो, तुमच्या
मित्रांना/मैत्रीणींना
कधीही
विसरु नका
त्यांना जपा .
हे जर तुम्हाला
जमले तर तुम्ही
मनाने कायम
तरुण रहाल
आणि इतरांनाही
हवेहवेसे वाटाल.
मित्र-मैत्रीण
नसतील तर
तुम्ही नक्कीच
एकटे आणि
एकाकी पडाल.
त्यासाठी रोज
व्हाट्सएपच्या
माध्यमातून
संपर्कात रहा
हसा, हसवत रहा
मुक्त दाद द्या
म्हणूनच म्हणतो
आयुष्य खुप
कमी आहे ते
आनंदाने जगा ...
प्रेम
मधुर आहे
त्याची
चव चाखा..!
क्रोध
घातक आहे
त्याला
गाडुन टाका..!
संकटे ही
क्षणभंगुर
आहेत
त्यांचा
सामना करा..!
डोंगरा आड
गेलेला सूर्य
परत दिसू शकतो
पण ....
माथ्या आड
गेलेले "जिवलग"
परत कधीच
दिसत नाहीत ....
!! मित्र जपा
मैत्री जपा!!
जमेल तसं
जमतील तेवढे
मात्र गेट टू गेदर
करीत रहा
🌹🤝🌹🤝🌹🤝🌹🤝🌹🤝
deepakdambalekwt@gmail.com
Jayant naralikar
जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, ‘विज्ञाननिष्ठा’ हे मूल्य भारतात रूजवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान-प्रसारक आणि
अभिमानाने मराठीत लेखन करणारे ज्येष्ठ वैज्ञानिक-लेखक!जयंत नारळीकर यांचा आज जन्मदिन
जात्याच हुषार असलेले, सुसंस्कृततेचे व बुद्धिमत्तेचे लेणे घेऊन जन्माला आलेले जयंत नारळीकर हे रँग्लर विष्णू नारळीकर (गणित-तज्ज्ञ) व त्यांच्या सुविद्य पत्नी सुमतीबाई ह्यांचे चिंरंजीव होत. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ मध्ये कोल्हापुरात झाला.
जयंतरावांची बुद्धी नव्या वाटा चोखाळणारी असल्याने त्यांनी दहावीला असतानांच मोठी आकृती, प्रमेय, उपप्रमेय अशा स्वरूपातील दोन पानांचा पायथागोरसचा सिद्धांत अर्ध्या पानात मांडून दाखविला होता. त्यांना संस्कृतमध्येदेखील रस होता. १९व्या वर्षीच ते बी.एस्सी. पदवी प्राप्त करून केंब्रिजला गेले व रँग्लर झाले. (केंब्रिज विद्यापीठात गणित विषयात विशेष यश प्राप्त केल्यानंतर रँग्लर ही पदवी मिळते.) १९६० साली पीएच.डी. चे उच्च शिक्षण त्यांनी डॉ. फ्रेड हॉयले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. ह्या गुरू-शिष्य जोडीने विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी स्थिरस्थिती विश्र्वाचा सिद्धांत मांडला. जयंतरावांनी त्याला गणिताचा आधार देऊन तो सिद्धांत सिद्ध केला. विश्व स्थिर असले, तरी ते आकुंचन-प्रसरण पावते. पण एकूणच ते विकसनशील आहे , प्रसरण पावत आहे हा सिद्धांत त्यांनी मांडला. भारत सरकारने या संशोधनाबद्दल त्यांना राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’ हा किताब दिला. डॉ. नारळीकर यांच्या गुरूत्वाकर्षाणाबद्दलच्या संशोधनालाही जगमान्यता मिळाली.
१९७२ मध्ये भारतात परतून ते टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. संशोधन, अध्यापन यांबरोबरच विज्ञानाचा प्रसार, समाजाचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे या गोष्टीही ते महत्त्वाच्या मानतात. अनेक लेख,कथा-कादंबर्या लिहून; व्याख्याने, चर्चासत्रे, ब्रह्मनादसारखी दूरदर्शन मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी विज्ञान लोकप्रिय केले. विज्ञानातील सिद्धांत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. ‘आकाशाशी जडले नाते’ हे त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. मराठी विज्ञानकथेचे ते प्रणेते आहेत.
खगोलशास्त्र, खगोल – भौतिकशास्त्र, गणित व विश्र्वाची उत्पत्ती हे त्यांचे अभ्यासाचे व संशोधनाचे प्रमुख विषय होत. १९८८ मध्ये खगोल-भौतिकी संशोधन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘आयुका’ (इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स) ही संस्था त्यांनी पुण्यात स्थापन केली. त्यामध्ये मुलांसाठी विज्ञान वाटिकेची निर्मिती केली. आयुकाच्या माध्यमातून संशोधन व विज्ञान प्रसाराचे त्यांचे कार्य अविरतपणे चालू आहे. मुलांविषयी डॉ. नारळीकरांना विलक्षण जिव्हाळा व कौतुक असल्याने त्यांच्या प्रश्नांना स्वहस्ते उत्तरे पाठविण्यासाठी ते वेळ राखून ठेवतात. युवकांना संशोधनासाठी प्रेरित करण्यासाठी ते आजही कार्यरत आहेत.
अवघ्या २७व्या वर्षी राष्ट्रपतींकडून पद्मभूषण, २००४ मध्ये पद्मविभूषण, संशोधन कार्याबद्दल भटनागर पुरस्कार, विज्ञान प्रसारासाठी युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार, फाय फाउंडेशन, बिर्ला पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार-असे सुमारे ६५ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध संस्थांची मानद फेलोशिप त्यांना मिळाली आहे. अनेक पुरस्कार, सन्मान मिळूनदेखील नम्र, सौजन्यशील असलेले, उदंड कीर्ती व लोकप्रियता लाभलेले, स्वत:च्या अलौकिक कर्तृत्वाने विश्वाच्या नभांगणावर तळपणारे तेजस्वी असे तारांकित व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. जयंत नारळीकर होत.
deepakdambalekwt@gmail.com
Thursday, 18 July 2019
Lokshahir annabhau
Lokshahir annabhau: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmtsx8L4ERwl8CFjNrdyJDsK
Wednesday, 17 July 2019
BCPT english
Hi all Team Leads, We have uploaded the whole digital syllabus of std. 3rd, 4th & 5th on our you tube channel, you can share the link 👇🏽below👇🏽 to all schools who needs it... Thank you https://www.youtube.com/channel/UCFKxpoM12suimkN5jvwPQcg/playlists
Please circulate this link to all the teachers.
*इयत्ता तिसरी चौथी व पाचवी वर्गातील सर्व घटक निहाय व्हिडिओज (BCPT) यामध्ये दिलेले आहेत.*
DIECPD
Koshish karane walo ki kabhi har nahi hoti
https://www.facebook.com/groups/267053253859490/permalink/471964830034997/?sfnsn=mo
Monday, 15 July 2019
Assit.teacher
*❝ गरीबांच्या मुलांचे Premium Teacher व्हा ! ❞*
_Super30 चित्रपटाचा अप्रतिम संदेश_
#प्रत्येक ZP शिक्षकाने पहावा असा चित्रपट !!!
➖➖➖➖➖➖➖➖
Super 30 चित्रपटाचा First day First Show पाहण्याचा योग आला, त्यानिमित्ताने
चित्रपटातील एका डायलॉगला प्रेरित होऊन एक छोटासा लेख लिहून आपल्यासमोर ठेवावा वाटला.
तो डायलॉग
*"अमीरों के बच्चों के लिए Premium Teacher होते है और गरीबों के लिए Assistant Teacher !"*
श्रीमंतांची मुले पाच-पाच आकडी फीस भरून मोठमोठ्या इंग्लिश स्कूल, खाजगी शाळेत शिकतात. त्यांना शिकविन्यासाठी केरळ, उड़ीसा सारख्या राज्यातील premium शिक्षक नियुक्त केले जातात व याउलट
गरीबांची मुले जिल्हा परिषदांच्या शाळेत डीएड झालेल्या Assistant Teachers कडून मोफत* शिक्षण घेतात.
जिल्हा परिषद शिक्षकांचा विद्यार्थी ही भविष्यात या Premium शिक्षकांच्या विद्यार्थ्यांसमोर ताठ मानेने उभा राहुन स्पर्धेत टिकायला हवा, असाच काहीसा संदेश हा चित्रपट देऊन जातो.
प्रत्येक जिल्हा परिषद शिक्षकात एक आनंद कुमार नक्कीच आहे ! कारण तो डीएड का आला यामागे ही एक स्टोरी असतेच !
म्हणुन अशा assistant cum premium टीचर ने
त्या ग़रीबीतून आलेल्या विद्यार्थ्यांत यश संपादित करण्या इतपत क्षमता निर्माण करायलाच हवी.
*ज्ञानाचे उपयोजन* कसे होते याचा प्रत्यय घेण्यासाठी आवर्जून पहावा असा चित्रपट !
चित्रपटात *गरीबी व शिक्षण* याचे अप्रतिम चित्रण करण्यात आले आहे, काही दृश्य खूपच अप्रतिम रेखाटली आहेत त्यांचा आस्वाद थिएटर मध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहण्यातच आहे.
🎥 *Super30* 📽
आपल्या जवळच्या सिनेमागृहात,
प्रत्येक शिक्षकाच्या प्रतिक्षेत
क्योंकि
*"अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा."*
✍
- शशिकांत जोशी
एक जिल्हा परिषद शिक्षक
spjoshi21@gmail.com
https://tinyurl.com/premiumteacher
➖➖➖➖➖➖➖➖
*Share with Teachers*
➖➖➖➖➖➖➖➖
deepakdambalekwt@gmail.com
Adhyayan nishpatti
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2263989963714093&id=841261595986944&sfnsn=mo adyayan nishpatti
Sunday, 14 July 2019
Saturday, 13 July 2019
Thursday, 11 July 2019
Adhyayan nishpatti
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता
👇
https://drive.google.com/folderview?id=1F85lGlSdphcylxJse72M1NfHVbxehQBj
किंवा
www.diecpdnanded.in
या संकेतस्थळावर जाऊन *डाउनलोड करा* या नावाच्या टॅब वर जाऊन ही, आपण या कृती डाउनलोड करू शकता.
वेबसाईट ची डायरेक्ट लिंक
👇
http://www.diecpdnanded.in/download.php
*IT विभाग DIECPD नांदेड*
Shikshan parishad
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था नांदेड
DIECPD NANDED

MENU
शिक्षण परिषद : शिक्षकांचे व्यासपीठ
Posted on July 10, 2019 by नागोराव येवतीकर

RELATED POST
लोकसंख्या शिक्षण : शिक्षकाची भूमिका
यशवंतराव चव्हाण सभागृह जि प नांदेड येथे गुणवत्ता आढावा बैठक संपन्न.
मुलांच्या प्रगतीसाठी
मुखेड येथे केंद्रीय परिषद पूर्व कार्यशाळा संपन्न
वृक्षलागवड: फक्त घोषणा अन् दिखावे नकोत

FacebookTwitterEmailPinterestWhatsAppLinkedInGmailShare
शिक्षण परिषद : शिक्षकांचे व्यासपीठ
शिक्षकांना नेहमी अद्ययावत ठेवणे आणि शासनाच्या नवीन अध्यादेशांची माहिती शिक्षकाना व्हावी यासाठी शासन अनेक प्रकारचे प्रयत्न करते. त्यात वेळोवेळी प्रशिक्षणाचे आयोजन करणे हे तर आलेच त्याचसोबत ठराविक कालावधी नंतर सर्व शिक्षक एकत्र येऊन त्यांच्यात शैक्षणिक चर्चा व्हावी म्हणून एक बैठक आयोजित करण्यात येते. त्यास सध्या शिक्षण परिषद असे सुंदर नाव देण्यात आले आहे. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी संकुलातील सर्व शाळातील जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी ह्या परिषदेचे आयोजन केले जाते. तसे हे पहिल्यांदाच होत आहे, असे नाही. यापूर्वी 1990 च्या दशकात सर्व शिक्षकांना एकत्र आणण्यासाठी मासिक गटसंमेलन व्हायची. त्यापूर्वी महिन्यातून एकदा काही महत्वाचे अहवाल गोळा करण्यासाठी मासिक बैठक व्हायची ज्यात फक्त कागद गोळा केले जायचे. पण गटसंमेलनास सुरुवात झाल्यावर यात आमूलाग्र बदल करण्यात आला. काही शाळेत यास उत्सवाचे स्वरूप देण्यात आले. शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती, शाळेचा परिसर आणि इतर काही महत्वाच्या बाबी यातून अधोरेखित केल्या जायचे. पुढे पुढे या गटसंमेलनास वेगळे स्वरूप प्राप्त होत गेल्यामुळे हे संमेलन रद्द करण्यात आले. त्यामुळे अनेक शिक्षक एका संकुलात राहून देखील कित्येक महिने एकमेकांना भेटू शकत नव्हते. म्हणून परत एकदा मागील चार-पाच वर्षापासून शैक्षणिक संमेलन नावाने शिक्षक एकत्र येऊ लागले होते. त्यानंतर दोन वर्षापासून हेच शैक्षणिक संमलेन शिक्षण परिषद या नावाने घेतल्या जात आहे.
परिषद या शब्दाचा व्यापक अर्थ लक्षात घेऊन शिक्षकांनी एकत्र येऊन अध्यापन कार्यात येणाऱ्या अडचणी, त्यावर शोधून काढलेले काही सोपे उपाय, विविध शाळेत चालणारे उपक्रमांची माहिती, शासनाकडून दररोज काढण्यात येणार नवनवीन अध्यादेश याची माहिती शिक्षकांना व्हावी म्हणून या परिषदेची निर्मिती करण्यात आली. आज कित्येक शिक्षक मंडळी तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन उपक्रमाची निर्मिती करत आहेत, त्यावर देखील येथे चर्चा होणे अपेक्षित आहे. त्याच सोबत काही साहित्यिक शिक्षक मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी जीवन शिक्षण हे पुस्तक गेल्या कित्येक वर्षापासून पुणे येथून प्रकाशित होत आहे. त्याची ओळख देखील यात देण्यात आली तर शिक्षकांकडून अनेक नवीन साहित्य निर्माण होऊ शकते. या परिषदेत DIECPD कडून तयार करण्यात आलेल्या अध्ययन कृती आराखड्यावर केंद्रातील मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयातील काही तज्ञ शिक्षक सर्व शिक्षकांना अध्यापनाचे अनुभव देतात आणि शिक्षक-शिक्षक यांच्यात आंतरक्रिया घडवून आणतात. बऱ्याच वेळा शाळेत अध्यापन करत असताना काही अडचणी येतात. त्याची चर्चा या परिषदेच्या माध्यमातून होणे अपेक्षित असते. एकाची समस्या कधी कधी सर्वांची समस्या असू शकते. केंद्रातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने डिजिटल वर्गात मुलांना ऑनलाईन पद्धतीने कसे अध्यापन करावे ? याचे ही मार्गदर्शन मिळते. DIECPD चे सर्व अधिकारी आणि प्राध्यापक मंडळी जिल्ह्यातील शिक्षकांना अध्यापन क्रिया सुलभ आणि परिणामकारक व्हावी म्हणून अनेक माध्यमातून प्रयत्न करत असतात, हे या परिषदेच्या माध्यमातून दिसून येत आहे. शाळेतील मुलांच्या गुणवत्तेसाठी कोणते उपक्रम आणि प्रयोग करता येऊ शकेल याची सांगोपांग चर्चा या परिषदेत होत असते. काही कल्पक केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी हे शिक्षकांना समृद्ध करण्यासाठी काही शिक्षणतज्ञ किंवा समुपदेशन करणाऱ्या व्यक्तींना परिषदेत आमंत्रित करतात. तसे पाहिले तर काही शिक्षक मंडळी देखील एखाद्या शैक्षणिक विषयावर छान पैकी बोलू शकतात. तेंव्हा अश्या शिक्षकांना एकत्र करून त्यांना त्यांच्या संकुलाबाहेरच्या शिक्षण परिषदेत बोलण्याची संधी दिल्यास शिक्षकांना स्वतःला अभिव्यक्त होण्याची संधी मिळेल, असे वाटते. जिल्हा आणि तालुका पातळीवरील सक्षम अधिकारी या सुचनेविषयी अधिक विचार करून शिक्षण परिषद अजून समृद्ध करतील अशी आशा व्यक्त करण्यास हरकत नाही. ज्ञानासाठी या आणि सेवेसाठी जा असेच काही या परिषदेविषयी म्हणता येईल. महिन्यातून एक दिवस शिक्षकांसाठी भरविण्यात येत असलेले शिक्षण परिषद हे शिक्षकांनी आपल्या हक्काचे व्यासपीठ आहे असे समजून मिळालेल्या संधीचे सोने नक्की करतील, असा विश्वास आहे.
– नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

नागोराव येवतीकर
स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
FacebookTwitterEmailPinterestWhatsAppLinkedInGmailShare
Posted in इतर
Post navigation
मुलांच्या प्रगतीसाठीयशवंतराव चव्हाण सभागृह जि प नांदेड येथे गुणवत्ता आढावा बैठक संपन्न.
COMMENTS

 ATul ASHOKRAO Kulkarni
July 10, 2019 at 3:01 pm
समर्पक शब्दांत लेखन व विषयास न्याय…खूप खूप अभिनंदन!
Reply
 Pralhad sidram Tumedwar
July 11, 2019 at 1:28 am
Very nice Na sa ji yours view of attitude is very broad to others thanks
Reply
LEAVE A COMMENT




ADD COMMENT

Copyright 2016. All rights reserved
DIECPD Nanded | Profitmag by Rigorous Themes

We'd like to show you notifications for the latest news and updates.
ALLOWNO THANKS
Monday, 8 July 2019
Friday, 5 July 2019
Adyayan nishapatti
https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmsMFSE4ukIRSARoG0Ricn34
adyayan nishapatti
Thursday, 4 July 2019
Monday, 1 July 2019
Sundara song
*Sundara Song*
Sundara why dont you come to school - 2
i dont have a shirt
I dont have a skirt
This why i cant come to school
Sundara why dont you come to school 2
I dont have a book
i dont have a bag
thats why i cant come to School
Sundara why dont you come to school 2
I dont Have a pen
i dont have a pencil
thats why i cant come to school
Sundara why dont you come to school 2
i wil give give you a skirt
i will give you a skirt
i wil give you a book
i will give you a bag
I will give you a pen
I wil givd you a pencil
Are you ready to come to school
Sundara now you come to school
deepakdambalekwt: Youtubechanel
deepakdambalekwt: Youtubechanel: https://www.youtube.com/user/deepakkinwat youtube chanel
Googlesite
https://sites.google.com/s/1H0JriIPA-dhym6qC2EXlhQwDMHJZg0va/p/1LPUblsPpfpdidoOlpKAenYFbMZlZnWft/edit
Haritakrantiche janak vasantaraoji naik
आज १ जुलै, महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
नाईक यांनी त्यांचे उभे आयुष्य कृषीक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी खर्ची केले. शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे. हा त्यांचा ध्यास होता आणि त्याच्या पूर्ततेकरिता ते अहोरात्र राबत होते. राष्ट्रीय पातळीवरील कृषी मंत्र्यांच्या व मुख्यमंत्र्याच्या परिषदांमध्ये तर त्यांचे विचार किती प्रभावी असायचे. याबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे म्हणतात की, केंद्र सरकारच्या अन्न व शेती मंत्रालयाच्या वतीने भारतीय पातळीवर वर्षातून एक-दोन वेळा कधीकधी तीनचार वेळाही मुख्यमंत्र्यांच्या परिषदा होत असत. संपूर्ण देशातील बहुतेक सर्व मुख्यमंत्री या परिषदांना हजर असायचे. अशा परिषदेत इतर मुख्यमंत्री प्रामुख्याने स्वतःच्या प्रांतातील प्रश्न मांडत असत. वसंतराव महाराष्ट्राचे प्रश्न प्रभावीपणे मांडीतच परंतु राष्ट्रीय प्रश्नावरही त्यांचा भर असे.
नाईक १९६३ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हा काळ देशातील शेतीच्या आघाडीवरील अरिष्टांचा काळ होता. भारताचा अमेरिकेबरोबर सवलतीच्या अटीवर अन्नधान्य घेण्याचा पी.एल.-480 हा करार झालेला होता. अन्नधान्याचा देशात एवढा तुटवडा होता की बर्याच वेळा अन्नधान्य बोटीतून उतरवून घेतल्याबरोबर सरळ रेशन दुकानात पाठवावे लागत होते. परदेशातून आयात केलेल्या धान्यापैकी 30 ते 35 टक्के धान्य केंद्र सरकारला महाराष्ट्राला द्यावे लागत होते. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने नामुष्कीची बाब होती. याची वसंतरावांना जाणीव होती. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापासूनच देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले पाहिजे, असे ठराव निरनिराळ्या पातळीवर केले जात. तथापि भारतातील अन्न प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने विशेष प्रगती होऊ शकली नव्हती.
नाईकांनी अन्नधान्याचे आव्हान स्वीकारले आणि राज्यभर तुफानी दौरे करुन शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती करुन संकरित बियाणांचाच जास्तीत जास्त पेरा करुन राज्याला व पर्यायाने देशाला अन्नधान्याच्या गंभीर संकटातून बाहेर काढण्याचे कळकळीचे आवाहन केले. संकरीत बियाणांचा वापर करायचे शेतकऱ्यांना केवळ आवाहनच त्यांनी केले नाही. तर त्यांच्या स्वतःच्या गहुली व शेलू येथील शेतीत संकीरत बियाणांची मोठय़ा प्रमाणावर लागवड त्यांनी केली. त्यांच्या या धाडसी धोरणामुळे संकरित बियाणांचा प्रचार तडकाफडकी झाला आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील चित्र बदलले. सुरुवातीला शंभर एकर जमीन संकरित बियाणांच्या लागवडीखाली होती, ती ५०,००० एकरांच्या पुढे गेली व हे प्रमाण सतत वाढत होते. नाईकांच्या प्रयत्नांना मोठय़ा प्रमाणात यश येत होते. याच वेळी अमेरिकेने पीएल 480 करारांतर्गत कुरापती काढून अन्नधान्याचे जहाज रोखून धरल्याबरोबर नाईकांचा प्रखर राष्ट्रीय बाणा जागृत झाला आणि ते पुण्याच्या शनिवार वाडय़ासमोर गरजले, ‘महाराष्ट्र जर येत्या दोन वर्षात अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या.’ त्यांचे हे आवाहन स्वीकारुन सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली. या यंत्रणेतील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी चोखपणे बजावली व महाराष्ट्र आणि पुढे देशसुध्दा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. विदेशातील निकृष्ट दर्जाच्या धान्याची आयात करणे बंद झाले.
जो देश अन्नधान्याच्या बाबतीत सर्वस्वी परावलंबी बनला होता तो स्वावलंबी झाला ही परिस्थिती त्यांच्या हयातीतच आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांनाच निर्माण झाली. हे विशेष महत्त्वाचे आहे. म्हणूनच बांगलादेशाच्या युध्दाच्या वेळेस म्हणजे १९७१-७२ साली बांगलादेशाच्या लक्षावधी निर्वासितांना भारत सरकार अन्न पुरवू शकले. बलाढय़ शक्ती असलेल्या रशियाला अथवा चीनलासुध्दा त्या काळात जे शक्य झाले नाही ते भारताने करून दाखविले. त्यामुळे भारत सर्वत्र कौतुकाचा विषय बनला. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा जागतिक अन्न व शेती संघटनेच्यावतीने व डॉ. बोरलॉग यांच्या मेक्सिकोतील आंतरराष्ट्रीय गहू व मक्याच्या संशोधन केंद्रातर्फे आणि अनेक राष्ट्राच्या वतीने जाहीर गौरव केला गेला. या गौरवात नाईकांचा मोठा वाटा होता.
१९७२ च्या दुष्काळाचा सामना करतांना नाईकांनी जे परिश्रम घेतले. त्याला तोड नाही. या दुष्काळामधूनच क्रांतकारी अशा रोजगार हमी योजनेने महाराष्ट्रात आकार घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय नाईकांनाच जाते. त्यातही रोजगाराची हमी देणारी एवढी मोठी आणि क्रांतीकारी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशपातळीवरचे पहिले राज्य होते. आज तर महाराष्ट्राची ही योजना केंद्र सरकारने जशीच्या तशी राष्ट्रीय स्तरावर नरेगा च्या नावाने सुरु केली आहे. यामागे महाराष्ट्राचे व ही योजना सुरु करणाऱ्या ह्या महान नेत्यांचे कर्तृत्व आहे. विशेष म्हणजे आर्थिक अडचणीत असतानाही एवढी मोठी कोटय़ावधी रुपयांची योजना कशी सुरू करायची असा प्रश्न पडला असतानाही तत्कालीन विरोधीपक्ष नेते कृष्णराव धुळुप आणि इतर सर्व विरोधीपक्ष सदस्यांनी सरकारला करवाढ करायचे सुचवून जगातील संसदीय लोकशाहीच्या इतिहासात एका नवीन घटनेची नोंद झाली.
नाईकांनी महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत. या प्रयत्नातूनच महाराष्ट्रातील ज्वारी खरेदी योजना, कापूस एकाधिकार योजना, वसंत बाध बंधाऱ्यांची निर्मिती, तब्बल चार कृषी विद्यापीठाची निर्मिती, अनेक सहकारी सुतगिरण्या आणि सहकारी साखर कारखान्यांची निर्मिती, सहकारी दुग्ध विकास संघाची निर्मिती, या सारख्या कृषी क्षेत्राशी आणि शेतकऱ्यांशी निगडीत अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्यात. नाईकांचे शेती आणि शेतकऱ्यांवर निस्सीम प्रेम होते. ते त्यांनी स्वतः पुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांना त्यांनी आग्रहाने शेती घ्यायला लावली. नाईकांनी शेती व शेतकर्यांवर जसे प्रेम केले तसेच पक्षातील व विरोधी पक्षातील नेत्यांचाही सदैव आदर केला. आज नाईकांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ह्या महानायकास विनम्र अभिवादन.
#VasantraoNaik #वसंतरावनाईक #हरितक्रांती #कृषीदिन #शेतकरी #AgricultureDay
deepakdambalekwt@gmail.com
Haritkrantiche pranete vasantraoji naik
https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmtatS9QLHQoJbOeo24qj4JA
Subscribe to:
Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre