Sunday, 30 June 2019
झाडे लावा झाडे जगवा
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
*सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ........*
झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂
पाण्याचे डबे आणून सोडी 🚎
वाळकी झाडे पाहू या 🎍🌾
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाचा गाव मोठा 😆
पाण्याचा लय तोटा 🚱
हंडा रांगेत लावु या 🏮🏮
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाची बायको सुगरण 💃🏻
पाण्यासाठी फिरते वणवण 😰
बिनआंघोळीचे राहू या 😝
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाची बायको गोरटी ☺
म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜
पाण्यासाठी भांडु या 😡
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामा मोठा तालेवार 👳🏻
आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार 💊
कोरड्या पाण्याने न्हाऊ या 🗑
मामाच्या गावाला जाऊ या 👫
😝😂😆
*झाडे लावा, झाडे जगवा*
deepakdambalekwt@gmail.com
😂😂😂
Saturday, 29 June 2019
1li nutan pravesh
*इयत्ता पहिली नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी*
*हस्त व नेत्र कौशल्य विकसनासाठी*
१)टायर फिरवणे (निर्णयक्षमता विकास)
२)गादीवर कोलांट्या उड्या
३)झोका खेळणे
४)एका पायावर तोलणे
५)शांत संगीतावर हलचाल
६)तीन बोटांचा वापर करून कागद फाडणे
७)सरळ रेषेत कागद फाडणे
८)घडी घालून कागद फाडणे
*निर्णयक्षमता विकसनासाठी*
९)ठसेकाम
१॰)बाटल्या,बरण्यांची झाकणे काढणे लावणे
११)बाटलीत बरणीत माती भरणे
१२)कडधान्ये निवडायला देणे
(एकाग्रता ,बोटांना वळण लावण्यासाठी)
*समजपूर्वक ऐकण्यासाठी*
१३)गाणी गोष्टी ऐकवणे
१४)टी व्ही वरील संवाद ऐकवणे
१५)एका वाक्याची सूचना देणे
१६)छोटी शब्दकोडी सोडवायला देणे
१७)मातीकाम
१८)धावदोरा घालणे (स्नायुंची मजबुती )
१९)दोर्यांची रंगीत डिझाईन बनवणे
२॰)खडूने चित्र काढुन रांगोळी सोडणे
२१)मुठीने हात न उचलता षटकोन काढणे
२२)वेणी घालणे
२३)आकार काढुन बिया,खडे लावणे
२४)वाचनपूर्व तयारी श्रवण
गोष्टींच्या पुस्तकावर गप्पा मारण
२५)एक काम१५ मिनिटांसाठी देवून बैठक वाढवण्यास मदत
वरील सर्व सुरवातीचे उपक्रम पहिलीच्या वर्गात घेवून मुलांची मेंदुला निर्णयक्षमता विकसनास मदत होते
या मुलांना स्नायु विकसीत होतील असे खेळ '
गोलाकार उभे राहून मुक्त हालचाली
उलटे चालणे
कांदा फ़ोड
डोक्यावर वस्तू ठवून चालणे
पाण्याने भरलेला ग्लास घेऊन चालणे
फिरत्या टायर बरोबर फिरणे
उंच उडी .
लांब उडी .
दोर उडी .
गादीवर कोलांटी उडी .
दोरीवर चढणे .
घसरगुंडीवर चढणे उतरणे
एका पायावर उभे राहणे
एका हाताने चेंडू फेकणे
दोन्ही हातानी चेंडू झेलणे .
झोक्यावर बसून झोके घेणे
घडी काम
मातीकाम
लोकरीचा धावदारा घालणे
लेखन पूर्वतयारी
तीन बोटांचा वापर करून कागद बारीक फाडता येणे
सरळ रेषेत कागद फाडणे
खळ लावून चित्र चिटकविणे.
खडूने चित्र रंगविणे
भेंडी , बटाटा ' दोरा ठशांतून चित्र काढणे .
बाटल्यांची टोपणे लावणे काढणे
तालावर सावकाश व भरभर हालचाल करणे
बाटलीत माती भरणे ओतणे
कडधान्ये निवडणे
शेंगा सोलून दाणे काढणे .
पाणी गाळणे
गाणी _ बडबड गीते .
विनोदी आशयाची गाणी ऐकवावीन . शक्यतो संगिता सह गाणी ऐकू या
गोष्ट _ १० मिनीटाच्या भावविश्वाशी निगडीत गोष्ट ऐकविणे . मजेशीर गमतीदार गोष्टी .
नाटयीकरण ऐकविणे
माहीती ऐकविणे -वर्तमानपत्र गावातील कार्यक्रम इ घटनावर चर्चा घ्यावी .ऐकवावी
श्रवण्
आवाज ऐकणे प्राणि वाहने पक्षी यांचे आवाज ऐकविणे .
आवाज काढायची संधी देणे .
आवाज निर्माण करणारी साधने वापरून आवाज ऐकवणे
उद्देश्य = आवाजातील साम्य भेद ओळखता येणे .
सूचना -एका वेळी एक सूचना देणे .कृती करतात का बघणे शब्द ऐकणे _हेतू पूर्ण निवडक शब्द ऐकविणे .समान अक्षराने सुरु होणारे व शेवट होणारे शब्द
श्रवण्
आवाज ऐकणे प्राणि वाहने पक्षी यांचे आवाज ऐकविणे .आवाज काढायची संधी देणे .आवाज निर्माण करणारी साधने वापरून आवाज ऐकवणे
मुले काय करणार _
१-ऐकलेले सोपे शब्द व वाक्य सांगणे
२_नविन शब्द छोटी वाक्ये बिनचूक बोलणे मोठी मुले व्यक्ती शिक्षक यांच्याबरोबर संभाषण करणे
छोटी व_ सोपी शब्दकोडी चित्र कोडी सोडविणे. गाणी म्हणण्यास संधी देणे चित्र व स्कू यांच्याबद्दल बोलता येणे .
गोष्टीतील विनोदी प्रसंग सांगता येणे
मुलांनी सूचना देणे
: गोष्टी क्रमवार सांगता येणे . चित्रक्रमवार लावता
deepakdambalekwt@gmail.com
Wednesday, 26 June 2019
Chatrapati shahu maharaj
*26 जून ,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 145 व्या जयंति निमित्त*
छत्रपती शाहू महाराज (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४-१९२२ दरम्यान छत्रपती होते. शाहू महाराज सुधारणावादी समाजसुधारक होते.
शाहू महाराज
छत्रपती, राजर्षी
Maharajah of Kolhapur
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ
इ.स. १८८४ - इ.स. १९२२
अधिकारारोहण
एप्रिल २, इ.स. १८९४
राज्यव्याप्ती
कोल्हापूर जिल्हा
राजधानी
कोल्हापूर
पूर्ण नाव
छत्रपती शाहू महाराज भोसले
जन्म
जून २६, इ.स. १८७४
लक्ष्मी-विलास राजवाडा, कागल
मृत्यू
मे ६, इ.स. १९२२
मुंबई
पूर्वाधिकारी
छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी)
'
राजाराम ३
उत्तराधिकारी
छत्रपती राजाराम भोसले
वडील
आबासाहेब घाटगे
आई
राधाबाई
पत्नी
महाराणी लक्ष्मीबाई भोसले
राजघराणे
भोसले
*शाहू महाराजांचे जीवन कार्य*
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो.
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यातला. आज शाहूंची जयंती. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. राजर्षी शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी फार तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. एवढेच नाही तर ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.
मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.
त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अतिशय विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.
तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.
गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करुन समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.
राजषी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.
महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.
*जातिभेदाविरुद्ध लढा :-*
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.
शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.

Tuesday, 25 June 2019
Rajashree chatrapati shahu maharaj
https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmsOgDPwQRzC537-V4bERBHB
Rajashree chatrapati shahu maharaj
https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmsOgDPwQRzC537-V4bERBHB
Monday, 24 June 2019
Heart attack
*एकट्याने ह्रदयविकाराचे रक्षण करावे?*
https://www.uttar.co/question/5cce91a4f7a7072837b59800
*" एकट्याने हृदयविकाराचे रक्षण कसे करावे? "*
*कृपया 2 मिनिटे थांबा आणि हे वाचा:*
1.संध्याकाळचे 7.25 वाजण्याची वेळ आणि आपण नोकरीवरुन कठोर परिश्रमानंतर सामान्यपणे घरी (अर्थातच) घरी परततआहात.
2. आपण खरोखर थकलेले, भागलेले आहात.
3 अाणी अशा वेळी अचानक आपल्याला आपल्या छातीत तीव्र वेदना जाणवु लागल्या ज्या आपल्या बाहूत आणि आपल्या जबड्यात जायला लागल्या असताना व आपण आपल्या घरा जवळच्या हॉस्पिटला पासुन फक्त पाच कि.मी दूर अंतरावर आहात.
4. दुर्दैवाने आपण ते अंतर पार करण्यास सक्षम अहात की नाही हे आपल्याला कळत नाही/ कल्पना नाही
5. सदर बाबतीत आपणास सीपीआरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे, परंतु ज्याने प्रशिक्षण दिले त्याने आपल्या स्वत: वर वेळ अाल्यावर त्याचा उपयोग कसा करावा हे सांगितले नाही/ शिकवले नाही.
6. एकट्याने हृदयविकाराचे रक्षण कसे करावे? बहुतेक लोक जेव्हा मदतीशिवाय हृदयाचा वेदना सहन करतात तेव्हा,म्हणजे ज्याचे हृदय अयोग्यरित्या धडधड त असल्याने बरे वाटत नाही तसेच चेतना हरवण्यापूर्वीची फक्त 10 सेकंद बाकी असतात.
7. अशा हृदय विकाराच्या व्यक्ती वारंवार आणि अत्यंत जोरदार खोकला काढुन स्वत: ला मदत करू शकतात. प्रत्येक खोकल्यापूर्वी एक गहन श्वास घ्यावा आणि खोकला खोल आणि लांब काढावा, परिणामी छातीच्या आत खोलवर स्त्राव तयार होतो. मदत येईपर्यंत प्रत्येक श्वासात श्वास आणि खोकल्याची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे जोपर्यंत हृदयाची धडधड पूर्ववत होत नाही तोपर्यंत असे करावे.
8. गहरी श्वास घेतल्याने फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन मिळतो आणि खोकल्याने हृदयाची हालचाल अाणी हृदयाचे रक्ताभिसरण होते व सामान्य लय पुन्हा मिळविण्यात मदत होते. अशा प्रकारे खोकला हृदयविकारा पासुन होणारी हानी कमी करण्यास मदत करतो
9. याबद्दल शक्य तितक्या इतर लोकांना हे समजावुन सांगा.
10. कार्डियोलॉजिस्ट सांगतात की ज्यांनी हा मेल प्राप्त केला आहे त्यां प्रत्येकाने हा मेसेज कमित कमी 10 लोकाना पाठवला तर आपण हे वचन देऊ शकता की आम्ही कमीत कमी एक आयुष्य वाचवू.
11. विनोद पाठविण्याऐवजी, कृपया या मेसेजला/संदेशाला अग्रेषित करुन योगदान द्या जे व्यक्तीचे जीवन वाचवू शकते.
12. जर हा संदेश तुम्हाला आला असेल तर ..किंवा. एकापेक्षा जास्त व्यक्ति कडुन आला तर.. कृपया त्रास वाटुन घेऊ नका ... त्याऐवजी आपण आनंदी असले पाहिजे, की तुमच्या ब-याच मित्रांना तुमची काळजी वाटते आणि म्हणुन त्यानी काळजी पोटी तो पाठविला अाहे.व ताे संदेश हृदयविकाराचा झटका आल्यास तो कसा हाताळावा ह्याची आपल्याला आठवण करून देत राहिल.
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-
deepakdambalekwt@gmail.com
QR code
*एका D.Ed.शिक्षकाची कमाल......*
जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीची शाळा.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडीची. तालुक्यालाच जिथं शहर म्हणता येणार नाही, अशी स्थिती तिथे गावची काय कथा?
पण *रणजितसिंह डिसले* या स्मार्ट शिक्षकाने या शाळेचं नाव जगाच्या कानाकोप-यात पोहोचवले आहे.
फळा आणि खडूत अडकलेलं परंपरातगत शिक्षण त्यांनी बदलून टाकलं.
‘क्युआर कोड’ आणि ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप’च्या स्मार्ट उपक्रमातून त्यांनी शिक्षण पद्धतीला डिजिटल रूपडं दिलं. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन जगप्रसिध्द मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांना ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटेड एज्युकेशन एक्सपर्ट’ या किताबाने गौरविलं आहे.
हा पुरस्कार पटकाविण्याची त्यांची ही पहिली दुसरी वेळ नव्हे, तर चक्क चौथी वेळ आहे.
त्यांचा पहिला प्रयोग होता तो
‘क्यु आर कोड’चा.
आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुस्तकातील प्रत्येक धड्यावर त्यांनी क्यु आर कोड चिकटवला. जगात पहिल्यांदाच असा अभिनव शैक्षणिक प्रयोग परितेवाडीच्या शाळेत राबवत त्यांनी त्या पुस्तकातील धड्यांना डिजिटल केले.
या क्युआर कोड समोर विद्यार्थ्याने मोबाईल धरला की धड्याची व्हिडीओ माहिती, कवितेची आॅडीओ क्लिप बोलू लागली. अभ्यासाच्या पद्धतीतील या बदलामुळे मुलांच्या समजण्या-उमजण्याची क्षमता कैक पटीने वाढली. शिवाय मुलांना मोबाईल गेम्ससाठी नव्हे तर अभ्यासासाठी वापरायचा हे नवीन तंत्रज्ञान भावलं.
परितेवाडी जि. प. शाळेचा हा प्रयोग सुरुवातीला माढा तालुक्यातील ३०५ शाळांमध्ये राबविला. त्यानंतर या प्रयोगाची दखल बालभारतीने घेतली आणि २०१६ पासून राज्यातल्या सर्व पुस्तकांतील सर्व धड्यांना क्यु आर कोडने डिजिटल करुन टाकलं.
*आज महाराष्ट्रातील सर्वच इयत्तांची पुस्तकं क्यु आर कोड स्वरुपात छापली जातात, याचं श्रेय डिसले गुरुजींचंच*.
इतकेच नव्हे तर
आता पुढच्या वर्षीपासून एनसीईआरटी हा प्रयोग संपूर्ण देशातील पुस्तकात करते आहे. परितेवाडीसारख्या गावातील शिक्षकाचा प्रयोग देशपातळीवरील अत्युच्य संस्था स्वीकारते करते आणि राबविते ही गोष्ट निश्चितच साधी नाही.
सतत नाविन्याचा ध्यास असलेल्या डिसले सरांनी आता नवा प्रयोग हाती घेतला.
हा प्रयोग होता *व्हर्चुअल फिल्ड ट्रिप* चा.
ही कल्पना अत्यंत अफलातूनच.
समजा इतिहासाचे पुस्तक आहे. चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. हा इतिहास शब्दरुपाने पुस्तकात दिला आहे.
पण फक्त पुस्तक वाचून छत्रपती शिवरायांचे कर्तृत्त्व मुलांच्या नजरेत कसे भरेल? मग त्यांनी त्या गड, किल्यावरील स्थानिक नागरिकांना संपर्क करून स्काइपच्या माध्यमातून तो इतिहास जिवंत केला.
सरांनी शिकविले ते आणि त्यापेक्षा अधिक माहिती विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाईव्ह ऐकली.
अनंत प्रश्न विचारले आणि आपले ज्ञान वाढवून घेतले.
हे फक्त शिवनेरी पुरते मर्यादीत राहीले नाही. पेग्वीन पक्षाची माहिती अभ्यासताना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील सॅनकॉबचा गाईड, आयफेल टॉवरची माहिती सांगायला पॅरीसमधला गाईड, समुद्राच्या तळाचं जग पाहताना सर्बियाच्या अंडरवॉटर लॅबचा गाईड, अमेरिकेतील फक्त कासवांच्या हॉस्पिटलचे डॉक्टर अशा जगभरातील ८८ देशांच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी परितेवाडीच्या मुलांशी लाईव्ह संवाद साधलाय. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंका समाधान केलेय. अशा पध्दतीने ज्ञानदान करणारा भारत आठवा देश आणि भारतात परितेवाडी ही पहिली शाळा होती.
याच साधनांचा वापर करुन सोलापूरच्या विज्ञान केंद्रात बसून त्यांनी आपल्या शाळेसह ३०० शाळांच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे शेकडो प्रयोग दाखविले आहेत. याच प्रयोगाची दखल घेऊन मायक्रोसॉफ्टने त्यांना चौथ्यांदा ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटेड एज्युकेशन एक्सपर्ट’ हा पुरस्कार घोषित केला आहे.
मुलांना ज्ञानदान करताना हे वेगवेगळे प्रयोग करुन त्यांनी वेगळेपण दाखवून दिलेच,
शिवाय पालकांनाही एका उपक्रमातून सामावून घेतले.
त्या उपक्रमाचे नाव आहे *अलार्म आॅफ टीव्ही*
याकरिता शाळेत एक भोंगा बसविला आहे. हा अलार्म रोज रात्री सात वाजता वाजवला जातो. हा अलार्म वाजला की गावातील घरा-घरातील टीव्ही बंद होतात. कारण पालकांना या अलार्ममुळे ही वेळ मुलांच्या होमवर्कची आहे हे कळते.
पालकसभा घेऊन आमचा अभ्यास तुम्ही घरी घ्यायचा हे डिसले सरांनी पालकांवर जबाबदारीने सोपवून दिले. शिवाय अभ्यास कसा घ्यायचा यासाठी पालकांच्या मोबाईलची मदत घेतली. प्रत्येक मुलाच्या पालकाचा मोबाईल नंबर त्यांनी रजिस्टर करुन घेतला असून दुपारीच त्या मोबाईलवर मुलांचा कोणत्या विषयाचा काय अभ्यास आहे याचा संदेश जातो.
उदा. होमवर्कमध्ये कविता असेल तर मुलगा घरात कविता वाचेल किंवा म्हणेल. पालकांनी ऐकायचे, चुका सांगायच्या. शुध्दलेखन असेल तर पालकांनी अक्षरे वळणदार येत आहेत का, चुका होत आहेत का हे पहायचे. सरांच्या अशा उपक्रमांमुळे परितेवाडीत बदल घडू लागला आहे.....
deepakdambalekwt@gmail.com
Sunday, 23 June 2019
1to5 english
*सौजन्य - BCPT*
*DIECPD पनवेल , जि. रायगड*
🏞
*STD-1*
इयत्ता - पहिली
विषय - इंग्लिश
सर्व पाठांचे videos येथे पाहा.
https://www.youtube.com/playlist?list=PLyfblb4NUP1BZg9Rid6D-ZStP5pbb305j
----------------------------------
🏞🏞
*STD-2:*
इयत्ता दुसरी
विषय - इंग्लिश
सर्व पाठांचे VIDEOS येथे पाहा.
https://www.youtube.com/playlist?list=PLyfblb4NUP1BpLsounN9_CFMDOOa2xBIO
-----------------------------------
🏞🏞🏞
*STD-3*
इयत्ता - तिसरी
विषय - इंग्लिश
सर्व पाठांचे videos येथे पाहा
https://www.youtube.com/playlist?list=PLyfblb4NUP1B1yb1o0i2oB9TWZcEnzLrB
----------------------------------
🏞🏞🏞🏞
*STD-4*
इयत्ता - चौथी
विषय - इंग्लिश
सर्व पाठांचे videos येथे पाहा.
https://www.youtube.com/playlist?list=PLyfblb4NUP1D0yN9VpsARQP4a0-uXwA0O
---------------------------------
🏞🏞🏞🏞🏞
*STD-5 ENGLISH*
इयत्ता 5 वी च्या सर्व पाठांचे videos Animated स्वरूपात पाहा.
https://www.youtube.com/playlist?list=PLyfblb4NUP1AghhWFRbeiKHIvfGTiNRdk
---------------------------------
सौजन्य - BCPT मुंबई
---------------------------------
English Dept.
DIECPD पनवेल, रायगड
deepakdambalekwt@gmail.com
Saturday, 22 June 2019
Earthquakes
भूकंपादरम्यान काय करावे? भूकंप परिस्थिती निर्माण झाल्यास अधिकाधिक सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा. कधीकधी सुरुवातीला भूकंपाचा लहान धक्का बसतो व त्यानंतर त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. अशावेळी कमीत कमी हालचाल करुन सुरक्षित स्थळी पोहोचावे आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत घरात/वास्तूत थांबावे व लगेचच बाहेर पडून सुरक्षित जागी जावे.
घरामध्ये असाल तर..
• जमिनीवर बसा; अभ्यासाचं टेबल किंवा कोणत्याही एखाद्या फर्निचरखाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबा. तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्यभोवती गुंडाळून त्यात तुमचा चेहरा झाकून घ्या.
• आतला दरवाज्याची चौकट, खोलीचा कोपरा, टेबल किंवा पलंगाच्या खाली थांबून स्वतःचे रक्षण करा.
• काचा, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि भिंती किंवा कोसळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहा.
• भूकंप आला असेल आणि तुम्ही अंथरुणात असाल तर तेथेच थांबवा. स्वतःचे डोके आणि चेहरा उशीने झाकून तेथेच थांबा. मात्र छतावर असलेली एखादी अवजड वस्तू खाली कोसळत नाहीये याची खात्री करा. अशावेळी एखाद्या जवळच्या सुरक्षित स्थळी जाऊन थांबा.
• जवळ असणाऱ्या एखाद्या प्रवेशद्वाराचा निवाऱ्यासाठी वापर करा. मात्र, या प्रवेशद्वाराचा मजबूत आधार मिळेल ही खात्री करुन घ्या.
• जमिनीची हालचाल थांबेपर्यंत आतच थांबा आणि मग बाहेर जा. भूकंप आल्यानंतर लोक बाहेर पडून इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतानाच जखमी होतात असे अनेक संशोधनाअंती आढळून आले आहे. • भूकंप आल्यानंतर वीज पसरु शकते किंवा स्प्रिंकलर सिस्टम्स किंवा फायर अलार्म्स सुरु होऊ शकतात.
घराबाहेर असाल तर..
• तुम्ही सध्या असाल त्या जागेवरुन कुठेही हलू नका. मात्र, इमारती, झाडे, पथदिवे आणि विजेच्या तारांपासून दूर व्हा.
• जर तुम्ही मोकळ्या जागेवर असाल, तर भूकंपाचे धक्के कमी होईपर्यंत तिथेच थांबा. इमारतीबाहेरची जागा, बाहेर पडण्याची ठिकाणी आणि बाहेरील भिंतीशेजारी मोठा धोका असतो. भूकंपाचा परिणाम म्हणून बऱ्याचददा भिंती कोसळतात, काचा फुटतात आणि वस्तू जागेवरुन पडतात असे आढळून आले आहे.
चालत्या वाहनात असाल तर...
• सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि तुम्हीदेखील वाहनाच्या आत थांबा. मात्र, इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका. • भूकंप थांबल्यानंतर हळूहळू वाहन सुरु करा. भूकंपाचा धक्का बसलेले रस्ते, पूल आणि उतारावरुन जाण्याचे टाळा.
ढिगाऱ्याखाली अडकले असाल तर...
• काडी पेटवू नका.
• धूळीखाली असताना हलू नका किंवा ढिगाऱ्याला लाथा मारु नका
• हातरुमाल किंवा कपड्याने आपले तोंड झाकून घ्या.
• जवळचा पाईप किंवा भिंत वाजवा जेणेकरुन बचावकार्य करणाऱ्या लोकांना तुम्हाला शोधता येईल. एखादी व्यक्ती जवळ असेल तर शिटी वाजवा. शेवटचा उपाय म्हणून आरडाओरडा करा. कारण असे केल्यास तुमच्या शरीरात धोकादायक प्रमाणात धूळ जाण्याची शक्यता आहे.
deepakdambalekwt@gmail.com
Friday, 21 June 2019
21 june
🤔 *जाणून घ्या 21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस का?*
*LetsUp | Special*
योगदिना सोबत आजच्या दिवसाचे आणखीन एक महत्व म्हणजे आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. मात्र यामागे नेमके कारण काय आहे? ते जाणून घेऊयात...
▪ आज सामान्यपणे दिवसातील 24 तासांपैकी 13 तासांहून अधिक काळ दिवस असतो.
▪ आज 13 तास 13 मिनिट कालावधी हा दिवसाचा असतो तर 10 तास 47 मिनिटांची रात्र असते.
▪ आजपासून उत्तरायण संपून दक्षिणायण सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते.
💁♂ *प्रत्येक देशाचं गणित वेगळं* :
▪ 21 जून हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात किती तास सूर्यप्रकाश असणार याची गणितं वेगळी असतात.
▪ काही देशांत 21 जून हा दिवस एखाद्या सणासारखा देखील साजरा केला जातो.
▪ काही ठिकाणी 13 तासांहूनही अधिक काळ सूर्यप्रकाश असतो.
▪ विशेष म्हणजे याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते. तर काही देशांत उन्हाळा सुरु होतो.
👌 *गुगलचे खास डूडल* : गुगलचे आजच्या दिवसाचे खास डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये पृथ्वी दाखवण्यात आली असून तिच्या डोक्यावर नारळाचे झाड आणि एक आसन दाखवण्यात आले आहे. 👉डुडल पहा : http://bit.ly/21junedoodle
🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा* : https://goo.gl/j6pRWY
deepakdambalekwt@gmail.com
Wednesday, 19 June 2019
Class 2
इयत्ता 2 री गणित पाठयपुस्तकात संख्यावाचन पद्धतीत केलेला बदल हा महत्त्वपूर्ण व दशमान पद्धतीस साहाय्य करणारा आहे..विद्यार्थ्यांना संख्याज्ञानात येणारी अडचण ही मुख्यत्वे संख्यवाचनातील (विशेषतः 2 अंकी संख्या) अडचणीमुळे येते...अध्ययनस्तर निश्चिती कार्यक्रमात हा अनुभव आपण नक्कीच घेतला आहे की विद्यार्थी बेरीज, वजाबाकी करतात पण संख्या वाचू शकत नाहीत...बरोबर ना? याचे विश्लेषण केल्यावर लक्षात आले की मराठीतील संख्यानामे दशक व एकक संबोध समजण्यासाठी लाभदायक ठरत नाहीयेत..कारण आपण म्हणतो सत्तावीस ज्यात म्हणतो अगोदर 7 व लिहितो 2..विद्यार्थी ही नावे पाठ करण्यावर भर देतात किंवा शिक्षक बांधव विविध क्लृप्त्या वापरून विद्यार्थ्यांना ती पाठ व्हावीत म्हणून खूप परिश्रम घेतात.पाठ्यपुस्तकातील हा बदल इतर प्रादेशिक भाषा (विशेषतः दक्षिण भारतीय भाषा) नुसार जे बोलतो ते लिहितो याप्रमाणे हा बदल केलेला आहे.शक्य तेवढी जोडाक्षरे कमी करण्याचा हा स्वागतार्ह प्रयत्न आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे दशमान पद्धती अतिशय नैसर्गिक पणे रुजण्यास मदत होते.सोबत आपली पारंपरिक संख्यानामे दिली आहेतच.उद्देश केवळ 27 ही संख्या वीस सात अशी समजली की 2 दशक व 7 एकक सहज समजतील व समजपूर्वक सरावाने सत्तावीस देखील समजेल..
गणित पेटीतील साहित्य नियमित वापरून संख्याज्ञान पक्के केल्यास कोणतीही अडचण येणार नाही हे नक्की ! विशेषतः 1 ली व 2 री च्या विद्यार्थ्यांना जून 2019 मध्ये ससाहित्य 1 व 2 अंकी संख्या घ्याव्यात.विद्यार्थी कृती करतील व शिक्षक सुलभक बनतील हे पाहावे..यामुळे शिक्षकांचे परिश्रम कमी होतील..अखेर शिक्षक हा व्यवस्थेचा कणा आहे.तो समाधानी होणे महत्त्वाचे!
म्हणून नवीन बदल सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकारू व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवू...
सर्वांना शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी शुभेच्छा 🌹🌹
*अतुल कुलकर्णी*
*गणित विषय सहायक*
*DIECPD नांदेड*
Monday, 17 June 2019
Googlesite
https://sites.google.com/s/1H0JriIPA-dhym6qC2EXlhQwDMHJZg0va/p/1LPUblsPpfpdidoOlpKAenYFbMZlZnWft/edit
Sunday, 16 June 2019
Subscribe to:
Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre