🍀आपटा🍀
आपटा हे एक झाड आहे. आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa आहे. या कुलातील झाडांना दोन दले असलेली पाने असल्यामुळे बौहिनिया हे नाव सोळाव्या शतकातील वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन व कॅस्पर बौहिन या दोन भावांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे.
आपटा
आपटा पानझडी वनांत आढळणारे झाड आहे. प्रामुख्याने भारत, श्रीलंका व चीन या देशांतील जंगलात आपट्याची झाडे आढळून येतात. हे झाड भारतभरात सर्वत्र आढळते.
आपट्याचे झाड सरळ न वाढता वेडेवाकडे वाढत असते. याला भरपूर फांद्या असतात. याची पाने जुळी असतात, ती काळसर हिरव्या रंगाची असतात. याच्या शेंगा या लंबगोल व चपट्या आकाराच्या असतात. पाने साधी, दोन भागात विभागलेली असून वरून हिरवी तर खालून पांढऱ्या रंगाची असतात. फेब्रुवारी ते मे या काळात या झाडाला लहान, पांढरी, पिवळसर फुले येतात. फुलाला पाच पाकळ्या आणि दहा पुकेसर असतात. शेंगा चपट्या आणि वाकड्या असून १५ ते २५ सेमी लांबीच्या आणि १.८ ते २.५ सेमी रुंदीच्या असतात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शेंगा पिकतात आणि उन्हाळ्यात गळून पडतात.
बौहीनिया जातीतील झाडांची पाने एकाच आकाराची असतात. कांचन हे झाडसुद्धा याच प्रजातीतील आहे.
उपयोग
आपटा (बाउहिनिया रेसिमोसा) हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते. गुजरातमध्ये पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो. जुन्या काळात तोटयाच्या बंदुका वापरत, त्यासाठी लागणाऱ्या वाती या झाडाच्या आंतरसालीपासुन तयार होत असत .
No comments:
Post a Comment