Youtube

Youtube
Chanel

Thursday, 15 February 2024

संत सेवालाल महाराज जयंती

बंजारा समाजाचे आध्यात्मिक गुरू संत सेवालाल महाराज यांची आज जयंती.त्यांचे पूर्ण नाव सेवा भीमासिंह रामावत असे होते.त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेश येथील गुलालडोडी ता.गुत्ती जि.अनंतपूर येथे झाला.
                त्यांच्या वडीलांचे नाव भीमासिंह नायक आणि आईचे नाव धरमणीमाता असे होते.ते जगदंबेचे परम शिष्य होते.ते आयुष्यभर ब्रम्हचारी राहिले.
               त्यांची शिकवण ...
१.जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा.
२.भेदभाव करू नका.
३.सन्मानाने आयुष्य जगा.
४.काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड द्या.
५.वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करू नका.
६.वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरूणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा.
७.माणुसकीवर प्रेम करा.
८.कुटुंबातीची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करू नका.
९.आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रध्दायुक्त विश्वास टाळा.
सर्वांना माझा जय सेवालाल.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025