Youtube

Youtube
Chanel

Thursday, 20 July 2023

NASA Training programme

*‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी 20 ऑगस्ट रोजी परिक्षा* 
– अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (Pune) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा 20 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे.

भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येत आहे. इयत्ता 6 वी ते 10 वी च्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 20 जुलै 2023 ते 15 ऑगस्ट 2023 अशी आहे.

विद्यार्थ्यांना http://www.swan-foundation.com/ यावर नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती युएस स्पेस अँड रॉकेट सेंटरच्या अँबेसेडर व स्वान फाउंडेशनच्या संचालक सुदेष्णा परमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी स्वान फाउंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलचे संचालक एम. तिरुमल, आयेशा सय्यद, स्वान फाऊंडेशनचे संस्थापक संचालक शशिकांत कांबळे, संचालक अश्विनी सांळुके आदी उपस्थित होते.

सुदेष्णा परमार म्हणाल्या, “स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच ट्रेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये इ. 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यासाठी परिक्षा घेण्यात येत आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल.

यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार असून, येणाऱ्या पिढीसाठी हे महत्वाचे आहे.”

आयेशा सय्यद म्हणाल्या, “ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील (Pune ) शाळांसह जिल्हा परिषद, महानगपालिका, नगरपालिका शाळांचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी 20 जुलैपासून नावनोंदणी करता येणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत नावनोंदणी सुरु राहील.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025