Tuesday, 14 February 2023
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहे. इयत्ता आठवीपर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना रिमोट सेन्सिंग आणि जिओ-इन्फॉर्मेशन सायन्स शिकण्याची इच्छा आहे आणि विज्ञान आणि गणिताची मूलभूत माहिती आहे, असे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. इस्रोच्या स्पेस क्युरिओसिटी (स्पेस क्युरिओसिटी) चा उपक्रमाचा एक भाग म्हणून हा अभ्यासक्रम दिला जातो. त्याचप्रमाणे NCERT च्या अभ्यासक्रमानुसार रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील. इस्रोच्या विविध केंद्रातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक हे वर्ग घेणार आहेत. (ISRO Antriksh Jigyasa) शालेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण व्याख्यानांच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आणि पृथ्वी आणि त्याच्या पर्यावरणाच्या अभ्यासासाठी त्याचा वापर याची माहिती देणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दीष्ट आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना सहज अवगत होईल अशी सोपी भाषा चित्र आणि अॅनिमेशनचा वापर या अभ्यासक्रमात केला जाणार आहे. यात रिमोट सेन्सिंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (ईएमआर), जिओस्टेशनरी आणि सूर्य-समकालिक उपग्रह, रिमोट सेन्सरचे प्रकार आणि मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर या सारख्या विषयांचा समावेश असेल.इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी jigyasa.iirs.gov.in/login या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. त्याचप्रमाणे तिथे तुम्हाला विचारलेली काही महत्वाचे तपशीले भरायची आहेत. विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहितीबरोबरच शाळेचा तपशीलही विचारले जातील. तुमची निवड झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख आणि अभ्यासक्रम तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre
No comments:
Post a Comment