*प्रति,*
उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण(सर्व),
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व ),
शिक्षणाधिकारी प्राथ. व माध्य. (सर्व)
प्रशासन अधिकारी, मनपा (सर्व)
*विषय :-राष्ट्रीय विज्ञान दिन २०२३ निमित्त "कृतियुक्त खगोलशास्त्र" या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानाबाबत....*
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२३ च्या निमित्ताने दि.२८ फेब्रुवारी, २०२३ रोजी *सोनल थोरवे*, खगोल-अभ्यासक, तथा तांत्रिक अधिकारी (विज्ञान शिक्षण), आयसर, पुणे यांचे *कृतियुक्त खगोलशास्त्र* या विषयावर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
*वार व दिनांक*
*दि.२८ फेब्रुवारी, २०२३*
*वेळ :दुपारी 3 :00 वाजता*
परिषदेच्या पुढील *यु ट्यूब लिंकद्वारे* या व्याख्यानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.
*यु-ट्यूब लिंक*
*https://youtube.com/live/E1yAdI9h4e4?feature=share*
शिक्षण विभागातील सर्व अधिकारी ,कर्मचारी तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित रहावे.
आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शाळा,शिक्षक, विद्यार्थी यांचेपर्यंत ही माहिती पोहचवावी.
*कौस्तुभ दिवेगावकर*
*(भा. प्र. से.)*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.*
No comments:
Post a Comment