Youtube

Youtube
Chanel

Sunday, 23 October 2022

Greatest work

इसरो ने केली खरी दिवाळी साजरी.... 

इसरो ने मध्यरात्री आपल्या नॉटी बॉय म्हणजेच LVM3 M2 या सगळ्यात शक्तिशाली रॉकेटने Network Access Associated Limited (OneWeb) या लंडन स्थित कंपनीचे ३६ उपग्रह त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रक्षेपित करून दिवाळी साजरी केली आहे. या सर्व ३६ उपग्रहांच एकत्रित वजन तब्बल ५७९६ किलोग्रॅम इतकं होतं. हे उपग्रह इसरो च्या रॉकेट ने पृथ्वीपासून १२०० किलोमीटर उंचीवर त्यांच्या निर्धारित कक्षेत स्थापन केले आहेत. या रॉकेटची क्षमता Geo Transfer Orbit (GTO) मधे ४००० किलोग्रॅम तर Low Earth Orbit (LEO) मधे ८००० किलोग्रॅम उपग्रह प्रक्षेपित करण्याची आहे. 

 (OneWeb) ही कंपनी तब्बल ६४८ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार असून त्यातून ब्रॉडबँड सेवा जगभर देणार आहे. त्यापैकी जवळपास ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा करार भारताच्या इसरोच्या व्यवसायिक शाखा NewSpace India Limited (NSIL) शी झालेला आहे. या उड्डाणातून तब्बल १००० कोटी रुपयांपेक्षा जास्ती उत्पन्न इसरो ला मिळणार आहे. जे लोक इसरो आणि रॉकेट उड्डाणात देश पैसे का खर्च करतो यावर शंका घेत होते. त्यांची तोंड गप्प करण्यास हे उत्पन्न पुरेसं आहे. 

व्यावसायिक रॉकेट उड्डाण क्षेत्रात भारताने आपली शाखा उघडली असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. आजवर भारताने कोणत्याही देशासाठी प्रक्षेपित केलेले उपग्रह हे पी.एस.एल.व्ही. रॉकेट ने केलेले होते. पण पहिल्यांदा भारताने आपल्या शक्तिशाली रॉकेटचा वापर व्यावसायिक प्रक्षेपणासाठी केला आहे. भारत सुद्धा स्वबळावर व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित करू शकतो हे या उड्डाणातून सिद्ध झालं आहे. 

चंद्रयान ३ हे सुद्धा उड्डाणासाठी सज्ज असल्याचं इसरो ने स्पष्ट केलं आहे. जून २०२३ ला त्याच उड्डाण अपेक्षित आहे. 

इसरो च्या सर्व वैज्ञानिक, संशोधक, कामगार तसेच लघु आणि मध्यम कॉन्ट्रॅकर यांच यशस्वी उड्डाणाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढल्या उड्डाणासाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!  

फोटो शोध सौजन्य :- इसरो, गुगल

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025