Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 25 October 2022

खंडग्रास सूर्यग्रहण

*आज मंगळवार दि. 25 ऑक्टोबर 2022 रोजी*
 *खंडग्रास सूर्यग्रहण आहे या ग्रहणकाळात, कोणतेही योग्य साधन न वापरता सूर्याकडे थोडा वेळही थेट पाहता कामा नये*

आज खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे.
(सायंकाळी ४ वाजून ४९ मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत )
भारतात या ग्रहणाची सुरुवात सूर्यास्तापूर्वी, दुपारच्या वेळेत होईल आणि हे ग्रहण भारतातील बहुतांश ठिकाणांहून पाहता येईल.

यानंतरचे भारतातून दिसू शकणारे सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. ते खग्रास सूर्यग्रहण असेल.मात्र, देशाच्या सगळ्या भागांतून हे खंडग्रास स्वरूपाचे सूर्यग्रहण म्हणून पाहता येईल.

*अमावास्येच्या दिवशी जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात आणि पृथ्वी व सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. चंद्रबिंबाची सावली जेव्हा सूर्याला अंशतः झाकते तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण घडून येते.*

ग्रहणकाळात सूर्यबिंबाकडे थोड्या कालावधीसाठी देखील योग्य साधन न वापरता थेट पाहू नये. ग्रहण काळात जरी चंद्रबिंबाने सूर्याचा बहुतांश भाग व्यापलेला असेल तरीही अशा वेळी कोणतेही योग्य साधन न वापरता थेटपणे ग्रहण पाहिल्यास डोळ्यांना इजा होऊन अंधत्व येऊ शकते. सूर्यग्रहण पाहण्याची योग्य पद्धत म्हणजे अल्युमिनाईज्ड मायलार, ब्लॅक पॉलिमर, वेल्डिंगसाठी वापरली जाणारी 14 नंबरची काच यांच्या माध्यमातून सूर्याकडे पाहणे किंवा टेलिस्कोपच्या सहाय्याने मिळालेली सूर्याची प्रतिमा पांढऱ्या बोर्डवर प्रक्षेपित करणे.

*ग्रहण, ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे. या काळात  कोणतीही धोकेदायक किरणे निर्माण  होत नाहीत. त्यामुळे वातावरणात किंवा  सजीवांच्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. साहजिकच  ग्रहणकाळाचा आणि अन्नपाणी दूषित होण्याचा तसेच शुभ-अशुभ किंवा वाईट घटना घडण्याचा काहीएक संबंध नाही.*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025