Youtube

Youtube
Chanel

Friday, 1 July 2022

*बदली अपडेट*


 *बदली अपडेट* 
 ➖➖➖➖➖
*प्राथमिक शिक्षकांच्या  प्रोफाईलवर हरकत घेताना  ...* 

*सर्वसाधारण बदल्या २०२२*

*बदली पोर्टल वर सर्व शिक्षकांची जिल्हा निहाय व तालुका निहाय माहिती कुठे पहावी ?*

 *शोशल अपील कसे करावे ?* 

१} सर्वप्रथम बदली पोर्टल ला जावे.

*बदली पोर्टलची लिंक*

.   👇🏻 👇🏻 👇🏻

https://ott.mahardd.in/

२}  बदली पोर्टल ला लॉगिन केल्यानंतर डिरेक्टरी या टॅब वर क्लिक करावे.

 ३} क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जिल्हा, तालुका, सर्च विथ नेम/ स्कूल नेम ही ऑप्शन्स आपल्याला दिसतील.
 प्रथमतः आपल्याला हवा तो जिल्हा निवडावा. त्यानंतर हवा तो तालुका निवडावा व त्यानंतर नाव / शाळेचे नाव/UDISE टाईप करावे व सर्च करावे. 

४} सर्च केल्यानंतर आपल्यासमोर शिक्षकांची यादी दिसेल. 

५} आपल्याला ज्या शिक्षकाची माहिती चेक करायची आहे, त्या शिक्षकाच्या नावावर क्लिक करावे.

६} प्रथम त्या शिक्षकाची सर्व पर्सनल डिटेल्स आपल्याला दिसतील, सदर माहिती पाहून नेक्स्ट करावे.

७} त्यानंतर त्या शिक्षकाची  एम्प्लॉयमेंट डिटेल्स आपल्याला दिसतील. तीही चेक करावी.
 त्याच्याखाली सोशल अपील नावाचा टॅब दिसेल अपील खालील प्रमाणे वाचावे.

I wish to appeal against this teacher to the CEO as I have found discrepencies in his profile I agree and accept that i have all relevant documents to prove my case and I will present the Document in person when ever called for by the CEO. Incase the documents or my claim is found to be wrong I am aware that there will be a disciplinary action on me.


 *अपील करावयाचे असल्यासच  चेक बॉक्स वर क्लिक करावे. विनाकारण करू नये.*

आपल्याला अपील कशा संदर्भात करायचा आहे त्याचा विषय व कमेंट त्या ठिकाणी टाकून आपल्याला अपील सबमिट करायचं आहे.

 परंतु अपील सबमिट करताना त्या शिक्षकाच्या माहिती संदर्भात योग्य पुरावा आपल्याकडे असणे गरजेचे आहे,अन्यथा चुकीचे अपील केले म्हणून आपल्यावरच कारवाई होवू शकते.त्यामुळे खात्री असेल,पुरावा असेल तरच काळजी पूर्वक अपील करावे .


.   🌻💐🌹🌷

   *फेज -१ मधील टप्पे*

    💠 *पहिला टप्पा*

सर्व कार्यरत 100% शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करणे व Verify करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे Submit करणे.

   नवीन वेळापत्रकानुसार

*कालावधी-13 जून ते  27 जून*

    💠 *दुसरा टप्पा*

गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षकांचे प्रोफाईल तपासणे व Verify करून Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.

*कालावधी-13 जून ते  29 जून*


💠 *तिसरा टप्पा*

गटशिक्षणाधिकारी यांनी Verify केलेली किंवा बदल केलेली माहिती शिक्षकांना मान्य नसेल तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे appeal करणे.

*कालावधी-14 जून ते  01 जुलै*

💠 *चौथा टप्पा* 

शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी शिक्षकांचे शिक्षकांचे appeal तपासून Verify करणे व Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.

*कालावधी-14 जून ते  03 जुलै*

  *पाचवा टप्पा*

गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांनी Verify केलेले प्रोफाईल शिक्षकांनी Accept करणे.शिक्षकांनी प्रोफाईल Accept केल्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत पुन्हा कोणत्याही टप्प्यावर बदल करता येणार नाहीत.

*कालावधी-14 जून ते  05 जुलै*

💠 *सहावा टप्पा*

जे शिक्षक जाणीवपूर्वक बदली प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी प्रोफाईल अपडेट करणार नाहीत किंवा वरील टप्प्यांमध्ये सहभागी होणार नाहीत, आशा शिक्षकांचे प्रोफाईल गटशिक्षणाधिकारी सक्तीच्या स्वीकृतीने (Force Acceptence)  Accept करतील.

*कालावधी-06 जुलै ते 08 जुलै*

 💠 *सातवा टप्पा*

वरील 6 टप्पे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रोफाईल Acceptence 100 % पूर्ण झाल्यानंतर शिक्षक इतर सर्व शिक्षकांचे प्रोफाईल पाहू शकतील.चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर आक्षेप घ्यायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे Social appeal करता येईल.

*कालावधी-24 जून ते  10 जुलै*

 💠 *आठवा टप्पा*

शिक्षकांनी केलेल्या Social appeal वर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय घेतील.

*कालावधी-11 जुलै ते  13 जुलै*

अजून नवीन माहिती आल्यास तात्काळ कळवले जाईल.



➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025