प्रति
ज्येष्ठ अधिव्याख्याता,
गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता ,
विस्तार अधिकारी,
केंद्रप्रमुख ,
विषय साधनव्यक्ती,
विशेष साधनव्यक्ती ,
मोबाईल टीचर.
विषय: सेतू अभ्यासक्रमावरील संशोधन 2022-23.
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, सेतू अभ्यास सन २०२२-२३ ची शालेय स्तरावर अंमलबजावणी होणार आहे. यांतर्गत सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्तरावर इयत्ता व विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. तसेच या सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी प्रायोगिक तत्वावर
*1* इ. २ री ते १० वी या इयत्तेतील विद्यार्थ्याचे नमुनाधारित सर्वेक्षण घेण्यात येणार आहे
*2* ज्येष्ठ अधिव्याख्याता अधिव्याख्याता गटशिक्षणाधिकारी यांनी इयत्ता 2 री ते 8 वी इयत्ता निहाय प्रत्येकी 5 विद्यार्थी यांचे तर इयत्ता 9 ते 10 वी इयत्ता निहाय 3 विद्यार्थी सर्वेक्षण करून मंकी सर्व्हे लिंक मध्ये भरावयाचे आहे
*3* विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक, विषय साधनव्यक्ती समावेशीत शिक्षण तज्ज्ञ , विशेष शिक्षक यांनी इयत्ता 2 री ते 8 वी मधील इयत्ता निहाय प्रत्येकी 6 विद्यार्थी सर्वेक्षण आणि इयत्ता 9 वी व 10 वी इयत्ता निहाय प्रत्येकी 5 विद्यार्थी यांचे सर्वेक्षण करून खालील लिंक मध्ये भरावी
*4* सदर लिंक दिनांक 19 जून 2022 रोजी रात्री 12 वाजता सुरू झाली आहे आणि दिनाक 25 जून 2022 रोजी बंद होणार आहे. दिलेल्या वेळेत हे सर्वेक्षण पूर्ण करावयाचे आहे.
*5* व याद्वारे प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करून त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जाणार आहेत.
*6* माहिती संकलित करतांना मराठी माध्यमाच्या सर्व व्यवस्था शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व असावे
*7* माहिती संकलित करतांना प्रत्येक इयत्तेतील मुले व मुली यांचे प्रमाण सम ठेवावे.
*8* समन्वयक यांनी तालुका निहाय विद्यार्थी यादी एकत्रित करून diet mail वर पाठवावे..
त्यासाठी खालील सर्व्हे मंकी लिंकमध्ये देण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची सोबत जोडलेल्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे माहिती संकलित करण्यात यावी. सदर संशोधन हे काल मर्यादित असल्याने पुढील नियोजनाप्रमाणे https://www.research.net/r/Bridgecourseprestudy22 या लिंकद्वारे विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात यावी.
आदेशावरून
*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड*
*शिक्षणाधिकारी प्राथमिक*
*जिल्हा परिषद, नांदेड*
*शिक्षणाधिकारी माध्यमिक*
*जिल्हा परिषद, नांदेड*
No comments:
Post a Comment