राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ,पुणे
📖 *१०० दिवस वाचन अभियान* 📖
नमस्कार!
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात १ जानेवारी २०२२ पासून *शंभर दिवस वाचन अभियान (Reading campaign)* हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्य व अभिरुची विकसित होण्यासाठी दर आठवड्याला बालवाटिका ते इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी वाचन संदर्भाने वेगवेगळे उपक्रम घेणे अपेक्षित आहे. नियोजनानुसार इयत्ता निहाय विद्यार्थ्यांना खालील उपक्रम करण्यास प्रोत्साहित करावे.
🌀 *आठवडा सातवा* 🌀
दि.१२/२/२०२२ ते १८/२/२०२२
गट -१
*बाल वाटिका ते इयत्ता दुसरी*
*उपक्रम* - मी कोण आहे?
विद्यार्थ्यांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकातील कथेतील पात्र व त्या पात्राची वैशिष्ट्ये ओळखण्यास सांगावे आणि ती सर्व विद्यार्थ्यांसमोर वर्गात कथन करण्यास प्रोत्साहित करावे.
गट -२
*इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवी*
*उपक्रम*- एकमेकांशी बोलणे (संवाद)
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जोड्या करून घेणे .जोडीतील एक विद्यार्थी सदर पुस्तकाचा लेखक असेल व विद्यार्थी पुस्तकातील एखादे पात्र असेल असे अशी भूमिका देऊन एकमेकांना पुस्तकाविषयी विषयी पाच प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे.यासाठी स्थानिक कथांची निवड करावी.
गट -३
*इयत्ता सहावी ते आठवी*
*उपक्रम* - पुस्तक निवड
आपल्या मित्राला पुस्तक वाचण्यासाठी शिफारस करण्यासाठी विद्यार्थ्यांना वाचन सूचीतून /शालेय वाचनालयातून पुस्तक निवड करण्यास सांगावे .तसेच सदर पुस्तकातील / कथेतील कोणत्याही एका पात्राचे /व्यक्तीचे वर्णन सारांश स्वरूपात लेखन करण्यास सांगावे.
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
No comments:
Post a Comment