*चला शिकूया प्रयोगातून विज्ञान*
**** प्रयोग क्रमांक - 30 ****
दिनांक - 26 फेब्रुवारी 2022
*प्रयोगाचे नाव - पाण्याची घनता बटाट्याच्या साह्याने अभ्यासणे*
*साहित्य -*
स्वच्छ पारदर्शक काचेचा ग्लास, पिण्याचे पाणी,बटाटा,चमचा, इत्यादी..
*विद्यार्थी कृती -*
🌾एका काचेच्या ग्लासामध्ये पिण्याचे पाणी घ्या व त्यात एक बटाटा टाका व निरीक्षण करा.
🌾 आता ग्लासातील पाण्यात चमच्याने मीठ टाका व ढवळा व निरीक्षण करा.(दोन ते चार चमचे)
*अनुमान व निष्कर्ष -*
पिण्याच्या पाण्याची घनता ही बटाट्याच्या घनतेपेक्षा कमी असल्यामुळे बटाटा ग्लासात बुडतो. मात्र मीठ कालवल्यानंतर मीठामुळे पाण्याची घनता वाढते व बटाटा पाण्यावर तरंगतो.
मृत समुद्रात मिठाचे प्रमाण सर्वाधिक आहे.(Dead Sea) त्यामुळे मृत समुद्रातील पाण्याची घनता ही इतर समुद्रातील पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्यामुळे पोहणारी व्यक्ती (Swimmer) बुडत नाह
🌾गोडेतेलाचे पाउच /पाकीट पाण्यावर तरांगेल का बुडेल??
🌾बर्फ पाण्यावर का तरंगतो ??
🌾सूर्य समुद्रात बुडेल का ??(घनतेनुसार)
🌾 पेट्रोल पाण्यावर तरंगते म्हणजेच....
*आपल्या परिचयाची इतर उदाहरणे सांगा...*
*DIET Nanded*
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
No comments:
Post a Comment